पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/590

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

औ० मॅक्सम्यूलंर यांचा मृत्यु. ५७३ जैगी सभा भरली होती त्यांत नामजोशी यांनीं भाषण केलें होतें; पण पुढे लवकरच त्यास ताप येऊन फुप्फुस बिघडलें व क्षयाची भावना होऊं लागली. ह्या रेगानें हे दोन अडीच महिने शरपंजरी पडले होते; पण महाभारतांतील प्रसिद्ध योद्धयाप्रमाणे हे मकर संक्रमणाचीच वाट बघत बसले होते असे कोणासही वाटलें नाहीं. इतक्या आजारांतही कांग्रेसचे मंडपांत एकदा तरी जाऊन यावं असा त्यांचा आग्रह होता; पण वीरराघवाचार्य वगैरे कांहीं प्रसिद्ध मुक्त्यारांच्या भिडनें तो त्यांनींच मोठ्या कष्टानें सोडून दिला. प्रेॉव्हिान्शयल कान्फरन्सचेही याचप्रमाणें अभिमानी होते. यांच्या मार्गे ह्यांचे कुटुंब, दोन मुलगे व तीन मुली आहेत. त्या सर्वावर हा दु:खाचा डोंगर कोसळल्यासारखा आहे. माधवराव येथे किंवा संस्थानांत नौकरी धरून असते तर आज ते दोन पैसे बाळगून राहिले असते; पण सार्वजनिक कामांत आपली सर्व बुद्धि आणि हिम्मत खर्च करण्याचा त्यांचा निश्वय असल्यामुळे त्यांच्या हातून एवढ्या मोठया उलाढाली झाल्या तरी स्वत: करितां किंवा स्वत:च्या कुटुंबाकरितां त्यांनीं अखेरपर्यंत कोणत्याही प्रकारची तजवीज केलेली नाहीं, अशा रितीनें सर्वस्वी लोककल्याणाकरितां वाहिलेल्या माणसाची योग्यता कित्येकांच्या लक्षांत येऊं नये, हें आमच्या देशाचे मोठे दुर्दैव आहे. परंतु आमची अशी आशा आहे कीं, हा काल लवकरच निघून जाईल आणि नामजोशी आणि त्यांचे इतर स्नेही यांनीं जें बीज रुजत घातले आहे त्याचा मोठा वृक्ष होऊन त्याच्या फलाचा आस्वाद महाराष्ट्रातील लोकांस लौकरच घेण्यास सांपडेल. आपलें कर्तव्य आपण करीत आहों हेंच मोठे सामाधान आहे, व हें समाधान मानून घेऊनच माधवराव नामजोशी यांनी आपला इहलोकींचा आयुष्यक्रम पुरा केला. ह्याचे फल त्यांस पुढील लोकीं तरी प्राप्त होवी असें इच्छून हा दुखवट्याचा लेख संपवितो.

  • प्रा. मक्सम्यूलर याचा मृत्यु. स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते ॥

श्रीऋग्वेदभाष्याचे प्रकाशक प्रसिद्ध प्रो. मॅक्सम्यूलर अथवा त्यांच्या संस्कृत ग्रंथांत लिहिल्याप्रमाणें भट्ट मोक्षमूलर यांच्या मृत्यूचे वर्तमान ऐकून हिंदुस्थानांतील नव्याजुन्या सर्व विद्वान्मंडळीस वाईट वाटल्याखेरीज राहावयाचे नाहीं. यांचा जन्म सन १८२३ सालीं डिसेंबर महिन्याच्या ६ वे तारखेस झाला होता तेव्हांपासून तो आतापर्यंत सतत ७७ वर्षे यांचा सर्व काळ अध्ययन, अध्यापन व ग्रंथलेखन यांत गेला, व यांच्या मृत्यूनें जगामधील एक

  • (केसरी, ता. ६ नोव्हेंबर १९०० ).