पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/589

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५७२ लो० टिळकांचे केसरींतील लेख. तही यांनीं चांगल्याप्रकारें काम करून लौकिक संपादला होता. रे म्यूझियम, इंडस्ट्रियल कान्फरन्स आणि एक्झिबिशन हीं तर सर्वाशीं त्यांच्या उद्योगामुळेच निर्माण झालीं होतीं व इतके उद्योग संभाळून एक मोठा मराठी कोश करण्याचे कामही त्यांनीं अगावर घेऊन बरेंच पार पाडले आहे. नामजोश्याजवळ त्यांच्या अचाट बेताप्रमाणे जर द्रव्यसंचय असता तर त्यांनी पुण्याचा राजकीय बाबतीत जेो लौकिक आहे त्याचप्रमाणें औद्योगिक बाबतीतही त्यांनीं तो लौकरच पूर्णपणें स्थापित केला असता. यांचा हुरूप आणि उमेद हीं नेहर्मी कायम असत; व तीं अमक्या एका विशिष्ट कामांतच नजरस येत होती असें नाहीं. न्यूस्कूल फग्र्युसन कॉलेज, म्युनिसिपालिटी, तांबेपितळची गिरणी, रे म्युझियम, इंडस्टियल एक्झिाबेशन आणि कान्फरन्स वगैरे सर्व कामें ते सारख्याच उल्हासानें, हुषारीनें, बाणेदारपणाने आणि धैर्यानें चालवीत असत. हातीं घेतलेलें काम कोणत्या रीतीनें तडीस जाईल हें त्यांस ताबडतोब कळत असे; व कोणावरही आपली छाप ठेवून त्याजकडून आपलें काम करून घेण्याचा गुण यांच्या मध्यें अपूर्व होता. थोडक्यांत इतकंच सांगतो कीं, सन १८८० सालीं ज्या पांचसात मंडळीनें लोकसेवा करण्याचे काम पत्करलें त्यांच्यांत नामजोशी नसते तर त्यांचीं कामें इतक्या लौकर खचित भरभराटीस आलीं नसती. स्वत:च्या उद्योगानें, हिमतीनें आणि हुषारीनें अगदीं गरीब मनुष्यही किती लोकोपयेोगी होऊं शकतो याचे माधवराव नामजोशांचे चरित्र हें एक उत्कृष्ट उदाहरण आहे; त्याचा कित्ता जर इतर लोक घेतील तर पुणे शहराची व महाराष्ट्राची सुधारणा होण्यास फारसा विलंब लागणार नाहीं. पुण्यासारख्या शहरांत माधवरावजींसारख्या गरीब गृहस्थानें सार्वजनिक काम चालविणें हें किती कठिण आहे, त्यांत किती येतात वगैरे गोष्टींची कल्पना देखील परक्यास होणें कठिण आहे. सरकारी नौकरीत असलेल्या आमच्या कांहीं मंडळीस हा आयुष्यक्रम मोठ्या मौजेचा वाटत असेल, पण या कामास गेल्या पंधरावर्षात जे बळी पडले आहेत त्यांच्या अनुभवावरून आम्ही खात्रीनें असे सांगू शकतों कीं, हें काम अतिशय दगदगीचे आहे. आपण उभारलेलीं दहापांच कामें कशीं तडीस जातात, त्यांत अनेक लोकांनी अनेक कारणासाठीं आणलेल्या अडचणी कशा निवाराव्या, त्यांच्याकरितां पैशाचा पुरवठा अगर कायमचा फंड गोळा करण्याची काय तजवीज करावी वगैरे गोष्टींच्या विचारांनीं मन व डोकें किती वेडावून जातें हें प्रत्यक्ष अनुभवावांचून समजणें कठीण आहे. माधवराव नामजोशी यांचे वय ४२ वर्षापेक्षां जास्त नव्हतें; व ते पिंडानेंही चांगलें खबरदार होते. तथापि वर सांगितलेले अनेक प्रकारचे उद्योग व काळज्या यांचा अखेरीस त्यांच्या शरीरावर परिणाम होऊन येथवर मजल येऊन ठेपली. गेल्या तीनचार वर्षे त्यांची प्रकृति नीट नव्हती; तथापि त्यांनी आपलीं सर्व कामें तशींच नेटानें चालविलीं होतीं. पण ही दांडगाई कोठवर चालणार ? कामाचे प्रकृतीचे समीकरण जें एकदां बिघडलें तें पुनः कांहीं ताळ्यावर आले नाहीं, आक्टोबर महिन्यांत रेमाकंटांत जी