पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/588

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माधवराव बल्लाळ नामजोशी यांचा मृत्यु. ५७१ ल्या सात आठ मंडळीपैकीं सहा असामी अकालीं मृत्यूच्या मुखीं पडावे याचे वर सागितलेल्या कारणांखेरीज कांहीं तरी निराळे कारण असावें असा विचार मनांत सहज उद्भवतो; आणि तो उद्भवल्याबरोबर अंत:करण सद्गदित होऊन लेखणीची गति कुंठित होते. संसाराची मजल ज्याप्रमाणें कांहीं आप्तांच्या साहाय्यानें कंठिली जाते, त्याचप्रमाणें सार्वजनिक कामांतही प्रत्येक मनुष्य आपल्या वेळच्या व बरोबरीच्या मित्राच्या साहाय्यानें आपलं कर्तव्य बजावीत असतो. व हे मित्र एकामागून एक पडत चाललेले पाहून शत्रूच्या गोळीबाराखाली आपल्या डोळ्यादखत शिपाई व सरदार पडत चालले असतां सेनेच्या नायकाची किंवा मार्गे राहिलेल्या दुस-या सरदाराची ज्याप्रमाणें स्थिति होते त्याप्रमाणेच प्रस्तुतच्या लेखकाची झालेली आहे, माधवराव नामजेाशी हे आपटे अथवा आगरकर याप्रमाणें एम्. ए. ची परीक्षा देऊन डेक्कन एज्युकेशन सोसायटींत आले नव्हते हें खरें आहे, पण ज्यास या संस्थांची खरी माहिती आहे त्यास नामजोशी याचा या संस्था उभारण्यास किती उपयोग झाला हें सांगण्याची जरूर नाहीं. अलीकडच्या कित्येक मंडळीस ही पूर्वीची हकीगत माहीत नसेल; पण त्यामुळे माधवरावजींनी केलल्या कामगिरीचे महत्त्व कोणत्याही रीतीनें कमी होत नाही. यांस त्यांची मित्रमंडळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे फॉरेन सेक्रेटरी म्हणत असत; व खरोखरच ह्यांच्यासारखा मेहनती पुरुष त्यावेळस मिळाला नसता तर फग्र्युसन कॉलेजची संस्थापना होण्यास आणखी पाचसात वर्षे लागली असती. उद्योग, साहस, हुषारी, धैर्य आणि आभिमान हें गुण माधवरावजींच्या अंगांत जितक्याप्रमाणानेंच वास करीत होते, तितके आमच्या मंडळीपैकी दुस-या कोणाच्याही अंगांत नव्हतें असे म्हटले तरी चालेल प्रेसग कितीही बिकट असेो, माधवराजीचे धैर्य खचलें असें कधींही झाले नाहीं. न्यूस्कूल, मराठा आणि केसरी या पत्राच्या चालकांवर अशा त-हेच प्रसंग गेल्या पंधरा वर्षात बरेच येऊन गेले आहेत व त्या सर्वात माधवरावजीच्या अंगच्या गुणांचा नेहमीं मोठा उपयेोग होत असे. एखादै मोठे काम अंगावर धेऊन स्वत:च्या हिताकडे अगर स्थितीकडे लक्ष न देता ते छातैोनें पार पाडण्याची उमेद धरणें हा कांहीं लहानसहान गुण नव्हे. पुण्यांत आजमितीस जी कांहीं ओद्योगिक चळवळ आहे तिचे सर्व श्रेय नामजोशी यास दिलै पाहिजे. त्यांच्या मनाची अशी खात्नी झाली होती की, आपल्या देशाची उन्नती व समाजाची सुधारणा उद्योगधंदे वाढल्याखेरीज कधीही व्हावयाची नाही; व त्यामुळे अलीकडे ते आपला सर्व वेळ याच कामी खर्च करीत असत. येथील म्युनिसिपालिटींत व्यापारी लोकांनीं मन घालावे म्हणून नामजोशी यानींच प्रथमतः खटपट केली; व पुढे चार वर्षानों स्थानिक स्वराज्याचा कायदा पास झाला. किरण, डेक्कनस्टार आणि त्यानंतर मराठा आणि केसरी ह्या पत्रांचे उत्पादकत्वही ब-याच अशीं माधवरावजीकडे आहे. याखेरीज शिल्पकला विज्ञान आणि इंडास्ट्रयल रिव्यू हीं पुस्तकेंही हेच काढीत होते. येथील म्युनिसिपालिटीं