पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/587

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'A৩ o ली० टिळकांचे केसरींतील लेख.

  • माधवरंाव बल्लाळ नामजोशी यांचा मृत्यु.

मकरसंक्रमणानिमित्त कांहींतरी गोड सुवार्ता कळविण्याऐवजीं आज आमच्या एका जिवलग स्नेहाच्या आणि या शहरांतील एका प्रसिद्ध सार्वजनिक पुढायाच्या मृत्यूची वार्ता कळविण्याचे काम दुर्दैवानें आमचेकडे आहे. सन १८८० सालीं ज्या पांचसात गृहस्थानीं नवी शाळा व नवी वर्तमानपत्रे काढून महाराष्ट्रांत एक प्रकारची नवी चळवळ उत्पन्न करण्याचा उपक्रम केला, त्यांपैकीच माधवराव नामजोशी हे एक होते. तेव्हांपासून त्यांच्याशीं प्रस्तुतच्या केसरीकारांचा जो संबंध जडला तो मध्ये कितीही वावटळे व संकटें येऊन गेलीं, तरी शवटच्या दिवसापर्यंत अगदीं अबाधित चालला होता. यासंबंधाकडे आणि पूर्वीच्या दहापंधरा वर्षाच्या इतिहासाकडे नजर दिली म्हणजे आमचे मन अनेक प्रकारच्या विकारांनीं व्याकुळ होऊन जातें. न्यू इंग्लिश स्कूलचा सोळावा वाढ दिवस नुकताच साजरा करण्यांत आला. ह्या सोळा वर्षात स्कूलचे कॉलेज हेोऊन दोन्ही संस्थांनीं बराच लौकिक संपादला आहे; पण याकरितां किती चांगली माणसें बळी पडली आहेत याचा महाराष्ट्रातील लेोकांनी विचार केला आहे काय ? पेशव्याच्या तोफखान्यावरील एका कामगारास, श्रीमंताच्या सेवेंत आपल्या घरच्या किती कत्या पुरुषांनीं प्राण खची घातले हें मोठ्या हृदयाद्रावक त-हेर्ने दाखविविण्याचा एकदा प्रसंग आला होता, असे सांगतात; व तशाच त-हेचा प्रसंग आज अमिच्यावर आलेला आहे. सन १८८० सालीं ज्या पांचसात लोकांनीं लोकसर्वेत आपलें आयुष्य खर्चण्याचा आपला निश्चय केला, त्यांपैकीं आज हा मृत्युलेख लिहिणाच्याखेरीज दुसरा केोणीही शिल्लक राहिला नाहीं, हें त्याचे व राष्ट्राचे केवढे दुर्दैव आहे याची कल्पना करणे अशक्य आहे. चिपळूणकर, आपटे, आगरकर, धारप, केळकर आणि आता नामजोशी हे सर्व पंधरासोळा वर्षात आणि चाळीस पन्नाशीच्या आंत काळाच्या मुखीं पडावे याचे कांहीं तरी गूढ कारण असले पाहिजे अशी आमची दृढ समजूत होत चालली आहे. कॉलेजांतील अभ्यासामुळे विद्याथ्यांची शरीरप्रकृति बिघडून जाऊन ते अकालीं मृत्यूच्या मुखीं पडतात असे म्हणावें तर माधवराव नामजोशी यांची तशी स्थिति नव्हती. मूळचीच प्रकृति सशक्त अथवा रोगग्रस्त असे म्हटले तर घारप यांचे चित्र डोळ्यापुढे उभे राहते. यांच्याइतके सशक्त व मजबूत न्यू स्कूलच्या मंडळींतच काय, पण इतर विद्वान् मंडळींतही सांपडणे कठीण होतें. प्रकृतीची काळजी घेत नाहीं असे कोणी म्हणेल तर वामनरावजी आपटे यांचे उदाहरण त्याच्या विरुद्ध आहे. सारांश, गेल्या पंधरासोळा वर्षात कांहीं सार्वजनिक कामें करण्यास पुढे आल

  • (केसरी ता. १४ जानेवारी १८९६),