प्रो. वासुदेवराव केळकर यांचा मृत्युलेख लिहून पुरे पांच आठवठेही झाले हीत तोच प्रि. गोपाळ गणेश आगरकर याच्या मृत्यूची बातमी आमच्या वाच- कांस कळविण्याचं आमच्या कपाळी आले आहे याचे आम्हास अत्यंत दुःख तें! हल्ली चतु:श्रृंगीच्या मैदानावर जी भव्य इमारत उभारली आहे, व ज्या इमारतीच्या आवारातच त्याच्या फारा दिवसांच्या इच्छेनुरूप गोपाळरावजींचे देहा- सान झाले, ती इमारत आपल्या आयुष्यात केव्हां तरी उभी करण्याच्या उद्यो- लागावें व त्याकरिता आपले सर्व आयुष्य खर्च करावें असा ज्या थोड्या गृहस्थांनी सन १८७९ सालीं पुष्कळ विचाराअंती निश्चय केला होता त्यांपैकीच प्रे. आगरकर हे एक होते; व तेव्हांपासून त्याचा व प्रस्तुतच्या केसरीच्या एडि. हराचा जो निकट संबंध जडला होता त्यामुळे त्यांचा मृत्युलेख लिहिण्याचें दुर्घट काम आपल्या हातून कसे काय निभावेल याची केसरीस बरीच शंका वाटत आहे. गेल्या पाचसहा वर्षांत याच्या व आमच्या दरम्यान असलेला मतभेद बराच लोकां- पुढे आलेला आहे; पण मृत्यूचे स्वरूप इतकें उम्र व भयंकर आहे कीं, त्यामुळे बारिकसारिक गोष्टी विसरून जाऊन प्रथमत: दृढनिश्चयाने त्यांनीं व आम्हीं काहीँ विशिष्ट लोकोपयोगी कार्ये करण्याचे मनात आणले व त्यानंतर ती कार्ये सिद्धीस नेण्याकरिता एकदिलाने घरी, दारी, किंबहुना कारागृहीं जे बेत व उद्योग केले त्याचे तीव्र स्मरण पुनःपुन्हा जागृत होऊन आमची बुद्धि व लेखणी गोंधळून जाते. एका विद्यालयात एका प्रकारच्या विशिष्ट शिक्षणाचा संस्कार झाल्यामुळे पुढे आयुष्य कोणत्या तऱ्हेने घालवावे याचा विचार करता करता एक विशिष्ट उद्योग करण्याचे व त्यात आपले सर्व आयुष्य घालण्याचें ठरवून ज्यानीं आपल्या आयुष्यातील उमेदींची पहिली दहा बारा वर्षे आपले इष्ट हेतु तडीस नेण्याकरिता केवळ आपण आरं- भिलेले कार्यापासून होणारे परिणामावर नजर देऊन दुसऱ्या कोणत्याही गोष्टींकडे व संकटाकडे लक्ष न देतां खर्च केलीं, त्यापैकीं एकास अकाली मृत्यूने ओढून नेल्यामुळे दुसन्याचे मन विषाद आणि दुःख यांनी भरून अगदी वेडावून जाणें हैं स्वाभाविक आहे. पण त्याहून विशेष दुःखकारक गोष्ट ही होय कीं, ज्या महाराष्ट्रातील लोकाची सेवा करण्याचा प्रि. आगरकर व आम्हीं निश्चय केला
(केसरी ता. १८ जून १८९५ ).