पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/577

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६० लो० टिळकांचे केसरींतील लेख. एक वर्षी व दुसरे कार्य पुढचे वर्षी करीत असतो, हें कोणाही सांसारिक मनुष्यास सांगावयास नको. हाच न्याय या ठिकाणीं लागू करा. आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या दुमजली इमारतीचा पहिला मजला, म्हणजे अर्थातच मुलांचे सक्तीचे शिक्षण, प्रथम करून घ्या आणि दुसरा मजला पुढे बांधा. तडजेोडीचा हा पक्ष परवाच्या येथील सभेपुढे रा, रा. खाडिलकर यानीं मांडलेला होता. पण मुलींच्या शिक्षणास ऐतिहासिकदृष्टया सर्वत्र जरी मुलाच्या शिक्षणामागून सुरवात झालेली असली तरी स्री-शिक्षणाच्या कैवान्यांस खाडिलकरांनी केलेला हा पूर्वापार भद रुचला नाहीं. आणि प्रि. रेंगलर पराजप यांनी अशी उपसूचना आणली की, सक्तीच्या शिक्षणाचे दोनही मजले एकदम उभारले पाहिजेत, व त्याकरिता कराचा जुलूम झाला तरी हरकत नाहीं. कारण सक्तीच्या शिक्षणक्रमांत मुलांच्या व मुलींच्या शिक्षणास जर एकसमयावच्छेदेकरून सुरुवात झाली नाहीं तर आपण स्वराज्याला नालायक ठरूं व आपल्या देशावर मोटेंच संकट गुदरेल. दोनही मजले एकदम उभारले पाहिजेत यावर तज्ज्ञांची म्हणून एक अशीही काटी करण्यांत आली होती कीं, दोन्ही मजले उभारण्यास पुरेसे पैसे नसतील (आणि पुणे शहरच्या म्युनिसिपालिटीजवळ येवढे पैसे नाहींत ही गोष्ट सवांनाच मान्य आहे.) तर दहा फूट उंच तळमजल्यांतच मध्यॆ पटई घालून पाच पांच फूट उंचीच एकाच मजल्याचे ठेगणे -ठेगणें दोन मजले करा ! पण या पोरकट कोटिक्रमाचा येथे जास्त विचार करण्याची जरूर नाही. कारण, रेग्लरसाहेबाच्या उपसूचनेचा तो कांहीं मुख्य भाग नव्हता. पुणे शहरच्या लोकाची कल्पकता इतकी विलक्षण आह कीं, एकाच परिस्थितींतून जितके पक्ष उपस्थित होतील तितके * अंकपाशार्ने ? म्हणजे उलटापालटीनें केल्याखेरीज ते सोडीत नाहीत. रंगलरसाहेबानंतर प्रो. सहस्रबुद्धे यांनीं जी उपसूचना आणिली ती अशाच प्रकारची होती. ते म्हणाले कीं, दोन मजली इमारत बांधावयाची खरी; पण तितके पैसे तुमच्याजवळ सध्या नाहीत, एकच मजला बाधण्यास पुरेसे आहेत म्हणतां; तर दुसराच मजला (म्हणजे मुलींचे शिक्षण ) प्रथम बाधून घ्यावा. कारण मुलाच्या शिक्षणापेक्षां मुलीच्याच शिक्षणाची आज अधिक जरूर आहे. दुसरा मजला अगोदर बांधून घ्या असे म्हणणाच्या या तरवारबहाद्दरी पक्षाचा उपन्यास झाल्यावर डॉ. लोहकरे यांनी पुढे येऊन चवथ्या पक्षाचा असा उपन्यास केला कीं, सक्तीच्या मुलांमुलींच्या शिक्षणाची इमारत दुमजली पाहिजे हें कबूल आहे तसेच ही दुमजली इमारत बांधण्यास आज आपणजवल पुरेसे पैसे नाहीत हेंही कबूल आहे. पण याची तडजेोड पहिला मजला अगोदर व दुसरा मजला मागाहून अशी न करितां कांहीं सेोपें कर बसवून किंवा या कामाकरितां सरकाराकडून मदत म्हणून अथवा शेटसावकारांकडून देणगी म्हणून अगर दुसरें कांहीं मार्गाने आधीं पैसे गोळा करूं आणि पुरेसे पैसे गोळा झाल्यावर या इमारतीचे दोनही मजले एकदम उठवून देऊं. दोनही