५५९
शक्ति कर दिला काय सारखेंच, उलट फी देणें न देणें हें मुलास आपण शाळेंत घालूं किंवा न घालूं या गोष्टीवर म्हणजे एक प्रकारें आपल्या स्वतःच्या इच्छेवर अवलंबून असते; पण सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याखाली तशी स्थिती न राहता मुलेही शाळेत पाठविलींच पाहिजेत आणि करही दिलाच पाहिजे. म्हणून नाग- रिकांच्या दृष्टीने जेव्हां विचार करावयाचा असतो तेव्हा सक्तीच्या शिक्षणास ' मोफत ' हैं विशेषण जोडणे इष्ट नाहीं असे आम्हांस वाटतें. सक्तीचे शिक्षण आणि तेही शहरांतील लोकावर कर वाढवून दिले जाणारे सक्तीचे शिक्षण, मुंबई- सरकारच्या नव्या कायद्याप्रमाणे पुणे शहरात सुरू करावें कीं नाहीं हा सध्या पुणे शहरांतील लोकापुढे प्रश्न आहे; व पुणे शहर या बाबतीत जो मार्ग स्वीकारील तो इतनी यथासंभव स्वीकारला जाईल हे उघड आहे. कारण पुणे शहर हैं महाराष्ट्रातील मुख्य शहर आहे. इतकेंच नव्हें तर शिक्षणविषयक बाबतीत या शहराने यथार्थ अग्रेसरत्व मिळविले आहे, हेंही काहीं कोणी नाकबूल करणार नाहीं. तात्पर्य, पुणे शहरांत या प्रश्नाचा कसा निकाल लागतो इकडे सर्व लोकाचे लक्ष लागणे अगदी स्वाभाविक आहे, व त्याचमुळे हल्लीं या शहरांत उपस्थित झालेला हा वाद केवळ स्थानिक नसून त्याला निदान महाराष्ट्रापुरते तरी एक प्रकारचे सार्वजनिक स्वरूप आलेले आहे.
स्थानिक कर वाढवूनही सक्तीचें शिक्षण पुणे शहरांत सुरू केले पाहिजे, याबद्दल पुर्णे म्युनिसिपालिटीच्या लोकनियुक्त सभासदामध्ये कोणताच मतभेद नाही ही एक मोठी समाधानाची गोष्ट होय. तसेंच हैं प्राथमिक शिक्षण मुलास व मुलीस मिळून दोघासही देणें जरूर आहे याबद्दलही फारसा मतभेद दिसत नाही. सक्ती- च्या प्राथमिक शिक्षणाची इमारत दुमजली असली पाहिजे म्हणजे मुलास आणि मुलीं- सही तें दिलें पाहिजे ही गोष्ट सर्वास मान्य आहे. मग मतभेद राहिला कोठें ? असा प्रश्न सहाजिकच उपस्थित होतो. याचे उत्तर येवढेच आहे की, ही जी दुमजली इमारत बांधावयाची ती सदर इमारत बांधणाऱ्या नागरिकान्या थैलीकडे लक्ष देऊन बांधावयाची, किंवा एकदम दुमजली इमारत उभारून पुढे पैशासाठी लोकांवर काय जुलूम होईल तो होवो, असें म्हणून तिकडे दुर्लक्ष करावयाचे ! अशा दृष्टीने विचार केला म्हणजे या वादग्रस्त मुद्दयाला चार शिंगे किंवा पक्ष उपस्थित होतात. पहिला पक्ष असें म्हणतो की, 'सर्वारंभास्तंडुलाः प्रस्थमूलाः या न्यायानेच या गोष्टीचा विचार केला पाहिजे. गोष्ट कितीही चांगली असली किंवा जरूर करावीशी वाटत असली तरी व्यवहारांत मनुष्य नव्हे तर सत्ताधारी सरकारही अंथरूण पाहूनच पाय पसरीत असते; किंवा इंग्रजी म्हणीप्रमाणें आपणांस लागणारा अंगरखा आपल्याजवळ असलेल्या कापडाप्रमाणेच बेततों. घरांत दोन मुलींची किंवा मुलामुलींची लग्ने कर्तव्य असल्यास प्रापंचिक गृहस्थ त्यांतल्या त्यांत नडीचे कोणते हें पाहून आपल्या ऐपतीप्रमाणे एक कार्य
७०
,