Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/574

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुमजली इमारतीचा पुंडावा.

५५७

निर्माण करून देणाऱ्या पहिल्या संकर विवाहाची अशास्त्रता कायद्याने आरंभी दूर करितां येईल; पण अशा तन्हेचा विवाह करणारांस व त्याची पुढील संतति यांस, संकीर्ण का होईना, पण हिंदुत्व जर पाहिजे असेल तर त्यांनी संकरजातीस उक्त असलेले विवाहाचे धर्मसंस्कारही पाळले पाहिजेत, एन्हवीं त्यांचे हिंदुत्व नष्ट होईल असे न्यायतः व हल्लींच्या कायद्यानेही प्राप्त होतें. असो, दें बिल ना. पटेल यानी परत न घेतल्यास याबद्दल पुढे पुष्कळच भवति न भवति होणार आहे, व या भवति न भवतींत आणखी काय मुद्दे निघतात हे आजच सागता यावयाचे नाही. म्हणून आज वादातील मुद्दयांचा वर लिहिल्याप्रमाणे फक्त उपन्यास करून आजचा हा लेख येथे पुगकरतो. पुढे जरूर पडेल त्याप्रमाणे जास्त चर्चा करू.


* दुमजली इमारतीचा पुंडावा.

स्वराज्य-मग ते स्थानिक असो, प्रातिक असो अथवा सार्वदेशिक असो- स्वराज्य प्राप्त झाल्यावर वादग्रस्त मुद्द्याचा निर्णय कसा करावयाचा याचा एक घोटाळा परवा येथे किलोस्कर नाटकगृहात प्रो. शकरराव भागवत याचे अध्यक्षते- वाली पुणे शहरातील मतदाराची म्हणून जी एक जाहीर सभा भरली होती तीत चागल्या रीतीने निदर्शनास आला. आजपर्यंत म्हणजे नोकरशाहीच्या अमलात सर्व सत्ता वरिष्ठ प्रतीच्या गो-या नोकराच्या हातात असल्यामुळे कोणत्याही बाब तति तवितील ती पूर्व दिशा असा व्यवहार होता व काही थोड्या बाबी खेरीज- करून अद्यापही आहे. या नोकरशाहीच्या विरुद्ध जर कोणाचे काहीं मत असेल तर ते लोकाच्या ठिकठिकाणी जाहीरसभा भरवून त्या सभेमार्फत किंवा ज्या ठिकाणी लोकाचे प्रतिनिधि जमतात अशा कॉंग्रेससारख्या संस्थामार्फत नोकरशाहीस कळवावे लागे; आणि त्याचा पाडाव करण्याकरिता नोकरशाही काहीं लोकास दार्ती घरून त्याच्याद्वारा लोकमत आपल्याच बाजूचे आहे असे जगास भासविण्याचा प्रयत्न करी, हिंदूंनी काही गोष्ट मागितली की, मुसलमानानीं नाहीं म्हणावें, आणि हिद मुसलमान एक झाले तर हिंदू-हिंदूंतच ब्राह्मण व ब्राह्मणेतर किंवा मागसलेले व पुढारलेले असा नवा मतभेद घडवून आणवावा, अशा प्रकारे नोकरशाही वेळ मारून नेत असे; व अद्यापही नेत आहे. स्वराज्याचे हक्क प्राप्त झाल्यानतर हे प्रकार चालतील की नाहीं; न चालल्यास त्याला दुसरे कोणते स्वरूप येईल आणि त्या स्वरूपाचा उपयोग कसा करावा लागेल याचा विचार करणे आता जरूर आहे. लोक म्हणजे सामान्यतः सर्व जनसमूह असा नेहमी आपण अर्थ समजतों, व एका दृष्टीनें तो खराही आहे. किबहुना पूर्ण लोकसत्तात्मक स्वराज्य म्हणजे


केसरी तारीख १० माहे फेब्रुवारी सन १९२०