पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/573

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.a ली० टिळकांचे केसरींतील लेख راما निर्बन्ध ठेवावा लागेल. कारण विवाह हा एक करार आह, ता पाचदहा वर्षाचा किंवा आजन्म करारही होऊं शकल, खुषीचा सौदा आहे, धर्मबधन नव्हे इत्यादि विचित्र कल्पना अद्याप खिस्ती राष्ट्रातही रूढ झाल्या नाहीत; मग हिंदुधर्माची गोष्ट कशाला ? सकर ज्ञातीतील विवाहाकरितां कोणता सस्कार उपयेोगात आणावा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे; पण त्याचा विचार शास्री लोक करतील. सध्या आमचे एवढेच म्हणणे आहे कीं, विवाह हा हिंदुधर्म చ - ابي शास्राप्रमाणें एक धर्मसस्कार आहे व ब्राह्मणत्वादि विशिष्ट जातीची अपक्षा नसली तरी हिदु ज्याला राहावयाचे आहे त्याने विवाहसंस्काराबद्दलचे हे धर्ममत झुगारून देऊन चालावयाचे नाही, जो आपले विवाहादि संस्कार हिंदुधर्मशास्राप्रमाणे करीत नाहीं तो हिदु कसला ? हिंदुसच नव्हे तर खिश्वन आणि मुसलमान म्हणवून घेणा-यासही हाच नियम लागू होतो; आणि याच हतूने नुसत्या नोदणीने विवाह लावणा-यास ** न हिंदुर्न यवन: * असा प्रतिज्ञालेख १८७२ च्या कायद्याने लिहून देण्यास सागितलेले आहे. नोदणी हा धर्मसंस्कार नव्हे, दिवाणी करार आहे; तेव्हा प्रत्येक हिंदु म्हणविणारान केवळ या करारावर अवलबून न राहता आपले विवाहविधि धर्मसस्काराने उरकले पाहिजेत असे उघड प्राप्त होते. संकर जातीकरिता जो हा विवाहसस्कार करावयाचा ती ज्या दोन जातीचा संकर झाला त्यापैकी कोणत्याही जातीचा असू शकेल, पण तो संस्कार त्या रीतीनें उरकल्याखेरीज त्याची संतति हिदुधर्मशास्त्राप्रमाणे हिदु मानली जाणार नाहीं. मग हे हिंदु परपरागत असोत किवा वैद्याच्या मिशनरी हिदुधर्माप्रमाणे हिंदु करून घेतलेले असोत; जो कोणी हिंदु आह त्याचा विवाहसस्कार हिंदुधर्मसंस्काराप्रमाणें झाला पाहिजे; मग त्या विवाहाची तुम्ही पुढे नादणी करा अगर न करा, तो प्रश्न निराळा. वरील सर्व गोष्टीचा विचार करत ना. पटेल याचे बिल अपुरेच नव्हे तर पुष्कळ अंशीं हिंदुधर्माच्या विरुद्ध आहे असे दिसून येईल. हे बिल पुढे आणताना ज्या लोकाची गैरसोय किवा अडचण ना. पटेल याच्या डोळ्यापुढे होती, त्यांच्याबद्दल आम्हांसही सहानुभूति आहे. किंबहुना त्या लोकाची अडचण दूर करू नये असे हिंदु समाजही म्हणणार नाही. पण ज्या लोकाकरिता हे बिल आणावयाचे तें बिल फक्त जातिदृष्टया निषिद्ध विवाहापुरतेच असावे; नीदणी होवी किंवा न होवो, विवाह धर्मसंस्काराप्रमाणे झाले पाहिजेत; आणि विवाहित दपत्यास किंवा त्याच्या संततीस जे वारसाचे हक्क मिळावयाचे ते सकरविवाह करणा-या इसमास मूळ पुरुष कल्पून त्याच्या पुढच्या संततीपुरतेच पाहिजेत, इतराचा वारसा या संततीस मिळू नये; एवढे तरी निबंध या बिलात अवश्य असले पाहिजेत असे आमचे आज म्हणणे आहे. किंबहुना हे निर्बन्ध घातल्याखेरीज अशा प्रकारचे विवाह हिंदूचे आहेत किंवा त्यापासून होणारी संतति हिंदू आहे असें हिंदुसमाज कबूल करणार नाही असे आम्हास वाटतें. सकरजाती