पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/572

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदू-हिंदूचे संकरविवाह , धरावी याचा निर्णय कायद्यानें करणे अशक्य आहे. इतकेंच नव्हे तर अशा संततीस आपल्या पित्याच्या पूर्वजातींतील आप्ताचे वारसही ठरवितां येणार नाहीं. अशा त-हेचा विवाह करणारा पुरुष हा पुढे होणाच्या आपल्या संकर-संततीचा मूळ पुरुष होऊँ शकेल व या मूळ पुरुषाच्या इस्टेटीचा वारसा त्याच्या संततीकडे जाईल. पण अशा प्रकारच्या संकर-विवाहानें आपल्या मूळ जातींपासून भ्रष्ट झालेल्या पुरुषाचे मूळच्या जातींतच राहिलेले आप्त या नव्या संततीस आपल्या सपेिंडात किंवा समानेोदकांत समाविष्ट करण्यास कधीही राजी होणार नाहींत. आणि कायद्याने अशी स्थिति केल्यास तो कायदा जातिभ्रंशकर व जुलमाचा समजला जाईल हे नेहमीं लक्षात ठेवले पाहिजे. मनुष्याला व्यक्तिस्वातंत्र्य असले तर त्यानें इच्छेस येईल त्याप्रमाणें लग्न करावें एवढी गोष्ट आम्ही कबूल करूं. पण या व्यक्तिस्वातंत्र्याचा, त्याच्या दृष्टीनें नाही तर आमच्या दृष्टीने, त्यानें दुरुपयोग केल्यावर आम्हीं त्या मनुष्याची संतति आम्हास पिंड देण्यास किंवा आमची क्रिया करण्यास आणि तदनुषंगानें आमच्या इस्टेटीचा वारसा घेण्यासही लायक झाली असे आम्ही कधींही समजणार नाहीं. व्यक्तिस्वातंत्र्य ज्याचे त्यार्ने पाहिजे तर आपल्या व्यक्तीपुरतें वापरावें; पण हे त्याला स्वातंत्र्य आहे म्हणून त्या स्वातंत्र्याचे परिणाम धर्मशास्त्रानुसार वागणाच्या आपल्या दुस-या बांधवांवर लादणें कधीही न्याय्य मानले जाणार नाहीं. विवाह सवर्ण असावे म्हणून हिंदुधर्मशास्त्र सागर्ते, आणि अशा विवाहापासून होणारी संतति ** बीजमुत्कृष्टमुच्यते ” या न्यायानें पेित्याची होते असें मनु म्हणतो. याला प्राचीन काळीं कहीं अपवाद असत. उदाहरणार्थ, क्षत्नज पुत्राची गोष्ट ध्या. हा क्षत्रज पुत्र बीज दात्याचा न मानतां “ बीजाद्योनिर्बलीयसी ” या न्यायानें क्षत्राच्या मालकाचा मानला जात असे, असें मनून म्हटले आहे. पण या दोन गोष्टीखेरीज इतरत्र म्हणजे संकर विवाहात होणाच्या संततीत वरील दोन्ही न्याय लागू न होता म्हणजे ती पित्याच्या अगर मातेच्या वणीची गणली न जाता संकरविवाहापासून होणारी संतति तिसयाच एक जातीची होते असें मनूचे म्हणणें आहे. उदाहरणार्थ ब्राह्मणापासून वैश्यकन्येच्या ठिकाणीं अबष्ठ जातीची संतति होते, आणि क्षत्रियापासून ब्राह्मण स्त्रीच्या ठिकाणीं म्हणजे एक प्रकारच्या प्रतिलोम विवाहापासून सूतजाति निर्माण होते असे त्यानें लिहिले आहे. पण या गोष्टीची सध्या तरी विशेष चर्चा करण्याची जरूरी नाहीं. समाजात रूढ असलेला सध्याचा आचार पाहिला तरीही तो मन्वादि स्मृतीतील धर्मशास्राला धरून आहे असे दिसून येईल. संकरजातीची गणनाही हिंदूंतच होत असल्यामुळे उद्या एखाद्या ब्राह्मणानें शूद्रस्रीशी विवाह केला, तर तो ब्राह्मण्यास मुकला तरी हिंदू राहातो, असे म्हणण्यास काही हरकत नाहीं. पण ज्याला हिंदुधर्मात राहावयाचे आहे त्यानें आपला अगर आपल्या संकरजातीचा विवाहही हिंदुधर्मशास्त्रदृष्टया धर्मसंस्कारपद्धतीनें केला पाहिजे, कराराप्रमाणे नुसती नोदणी करून करूं नये, असा