पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/571

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.लो० टिळकांचे केसरींतील लेख به ادامها हल्लीच्या कालीं आक्षेपार्ह वाटत नाही. पण मनु काय किंवा नित्शे काय या दोघांनाही खालच्या जातीच्या पुरुषानी वरच्या जातीच्या स्रीशी विवाह करणें इष्ट वाटत नाहीं. कारण त्यामुळे अशा विवाहापासून झालेल्या संततीच्या अंगीं गुणोत्कर्ष होत नाहीं असे त्यानीं ठरविले आहे; व निग्नी व गेोरे लोकांचा ज्या देशात म्हणजे अमरिकेत संकर होत आहे तथेही हाच न्याय स्वीकारला जाते. सांप्रतकाळीं म्हणजे कलियुगात प्रतिलोमाप्रमाणें अनुलेोम विवाहही निषिद्ध मानले जातात, त्यामुळे विवाह होणे ते सवर्णात व्हावे, भिन्न वर्णीत होऊं नयेत, भिन्न वणीत विवाह झाल्यास त्यापासून हंाणारी संतति संकरजातीची होते, आणि संकरजातीची झाल्यामुळे ती आपल्या आईच्या व बापाच्या मिळून दोनही जातींस मुकते, असा सध्याचा नियम आहे. इतर्केच नव्हे तर अशा संकरविवाहापासून झालेल्या संततीची गणना औरस संततींत होत नाहीं, व त्यामुळे विवर्णविवाह करणाच्या आपल्या मातापितरांच्या किवा त्यांच्या आसांच्या इस्टेटीसही हिंदुधर्मशास्त्रदृष्टया अशी संतति वारस होऊं शकणार नाहीं. कारण शास्रसिद्धविवाहाचे मुख्य हेतु दोन प्रकारचे असतात-(१) सवर्ण औरस संतति उत्पन्न करणें, आणि (२) विवाहित दंपत्याच्या कुलांतील इतर पुरुषाच्या इस्टेटीचा वौरसा ज्यास मिळेल असे सपिड किवा समानोदक बांधव कुलवृध्यर्थ निर्माण करणें. थोडक्यांत सांगावयाचे असल्यास केवळ आपल्यास संतति व्हावी इतकेंच नव्हे तर आपलें कुल व जातही वाढावी असा या सवर्ण विवाहाचा हेतु असतो. पण हल्लींच्या परिस्थितींत पुष्कळाना हे सवर्ण विवाह पसंत नसून वर्णावणीत अंतर्विवाह व्हावे व त्यामुळे जातिभद नष्ट व्हावा अशी भावना होऊं लागली आहे. अशानें जातिभेद् खरोखरच मोडेल किंवा फक्त एखादी नवी संकर-जात उत्पन्न होईल हा एक मोठाच सामाजिक प्रश्न आहे. पण त्याचा विचार सध्यां न करता हल्लीं जें व्याक्तिस्वातंत्र्य चेहाँकडे माजलेले आहे त्याला अनुसरून अशा प्रकारचे वर्णसंकरकारक विवाह कोणी केल्यास त्याला हिंदुसमाजानें कोणत्या रीतीनें वागवावें, एवढ्याच गोष्टीचा आपण सध्यां विचार करू. समजा की, एका ब्राह्मणानें शुद्र स्रीशी विवाह केला. हा अनुलेोमविवाह झाला, व प्राचीन काळीं तो निषिद्ध मानला जात नसे. पण त्याच्या संततीचा मात्न ब्राह्मणज्ञातींत शास्त्रतः समावेश होत नव्हता असें स्मृतिग्रंथावरून दिसून येतें. इतकेच नव्हे तर अशा विवाहापासून झालेली संतति ब्राह्मण पित्याच्या कुलातील इतर लोकांच्या इस्टेटीचीही वारस होत नसे असे दिसून येईल, तात्पर्य, पूर्वकाळीं असा विवाह जरी निषिद्ध नसला तरी या विवाहापासून झालेल्या सततीस आपल्या पित्याच्या इस्टेटीपलीकडे जास्त वारसा मिळत नसे, आणि अशी संतति पितृसदृश असली तरी पित्याच्या जातीची न होतां तिची गणना सकर-जातीत होई असे सिद्ध होतें. हे विवाह आता निषिद्ध आहेत खरे; पण हे निषिद्ध नसावे असें मानून त्यांस जरी कायद्याने परवानगी दिली तरी अशा विवाहापासून होणाच्या संततीची जात कोणती