४२ लो० टिळकांचे केसरींतील लेख बंदोबस्त होत नसेल तर त्यांनीं खुशाल आपल्या कामाचा राजीनामा देऊन चालतें व्हावे. इ. इ. ’ वरील सर्व आक्षपांस उत्तर देण्यास आम्हांस सवड नाहीं व आमची इच्छाही नाहीं. ज्या लोकांस-मग ते स्वधमीं असोत अथवा परधर्मी असेोत-- हिंदुलोकाच्या रीतरिवाजाची बिलकुल ओळख नाहीं, किंवा असूनही जे विसरल्याचे सोंग आणतात, ज्यास कलियुगातील न्यायाधिशांच्या धर्माचे वाक्य सुचतें पण त्याबरोबरच स्त्रीधर्माचे स्मरत नाहीं, ज्यांची प्रतिभा ऋषेिवर्गाच्या नक्षत्रप्रभेस लाजवून त्याच्या दृष्टीस अगेाचरही विषय आत्मदृष्टि गोचर करूं शकते, ज्यास विवाहसंस्कार व गर्भाधानसंस्कारांमधील भेद कळत नाहीं व ज्याचे वेदव्यास म्हणजे मोक्षमूलर, मोनियर बुइलियम पिन्ह्याचार्यादि महर्षि, अशाच्या विचाराचे निदर्शन हेच त्याचे खडन होय. आमच्या स्त्रियाची उन्नति होणें अलंयंत आवश्यक आहे हे आम्ही कबूल करतो. पण या वृथा सुधारकांस आमचे इतकेंच सागणें आहे की, ती सुधारणा अध्या हळकुंडानें पिंवळी होणाच्या रखमाबाईसारख्या अजाणत्या स्रीच्या हातून कधीही व्हावयाची नाहीं. आज हजारों पुरुष आपल्या अजाणत्या बायकाबरोबर सुखानें नादत आहेत. असे असता एका ज्ञानलवदुर्विदग्ध स्रीने आपला भ्रतार आपणास योग्य नाहीं म्हणून आपणास काडी मोडून द्या अशी कोटीत फिर्याद आणावी ही आश्वर्याची गोष्ट नव्हे काय ? व त्याहूनही आमच्या सुधारणावाल्थानीं तिची टिमकी हाती घेऊन त्यातून हवा तेवढा असंबद्ध प्रलाप व घोष बाहेर काढावा हें अधिक आश्चर्यकारक नाहीं काय ? इंग्रज लोकातही एकदां विवाह झाल्यावर, मग गर्भाधानविधि झाला असेो वा नसो, माझा नवरा मला आवडत नाहीं एवढयाच कारणावरून नवयापासून विभक्त राहण्याचा किंवा काडी मोडून घेण्याचा इक्क स्रोस प्राप्त होत नाहीं; व इंग्लंडांत जर असा खटला उपस्थित झाला असता तर त्या स्रीची तिकडे छीथूच झाली असती. रखमाबाईस काय ती सवड एवढीच कीं, तिचा विवाह इकडच्या रीतीप्रमाणे लहानपणीच झाला असल्यामुळे तिची त्या विवाहास संमति घेतली नव्हती. पण आमच्या मते यात काही अर्थ नाहीं. वधूवरांच्या संमतीनें विवाह व्हावा ही गोष्ट काही वाईट नाहीं, तथापि एकंदर परिणामाकडे लक्ष दिले असता जेथे एकमेकाच्या संमतीने विवाइ होतात तेथेही नवराबायकोंचे किती तंटे होतात हें मनांत आणलें म्हणजे आमच्या देशांत जी आज पूर्वापार चाल चालत आलेली आहे ती बदलण्यापासून आपणास कितपत फायदा होईल याची आम्हांस शंकाच आहे. तशांत समाजाकडे लक्ष दिले असतां त्याची आवश्यकता आज बिलकुल दिसून येत नाही. मग त्यावद्दल एवढी गडबड कां ? बरें क्षणभर हेंही कबूल केलें तरी पूर्वापार चाल सुधारावी कीं नाहीं, ह्याचा विचार करण्याचे हायकोर्टाचे काम नव्हे. लोकांमध्यें जी चाल असेल किंवा जेो कायदा असेल त्याची अंमलबजावणी करणे हें हायकोर्टाचे कर्तव्य आहे, व लोकांत सप्तपदीक्रमणानंतर विवाह
पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/57
Appearance