पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/569

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

༦༣ རིང་བརྡ་ ༢ लो० टिळकांचे केसरींतील लेख. सुमारे वर्षभराने तें वादविवादाकरिता पुनः कौन्सिलमध्यें येईल असें सध्यां तरी ठरल्यासारखें आहे. अथातच यासंबंधाने जास्त विचार करण्यास आणखी पुष्कळ सवड आहे हें आम्हासही कबूल आहे व त्या सवडीचा आम्ही व इतर लेाक फायदा घेऊ व घेतीलच. तथापि यासबंधान कोणते मुद्दे विचारार्ह आहेत अणि ती विचार कोणत्या दिशेने केला पाहिजें याबद्दल प्रथमत:च दोन शब्द लिहिणे जरूर असल्यामुळे आज ती विपथ आम्ही हाती घेतला आहे. हिदु लोकांच्या विवाहासबधाने विचार करताना प्रथमतः ही गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे की, विवाह हा आमच्यामध्ये एक धर्म सस्कार आहे; नुसता करार किंवा रजिष्टरची नोंदणी नव्हे. म्हणून अशी नोंदणी जरी कायद्यानें करता आली. आणि कोर्टानेही मान्य केली नरी विवाहाच्या धर्मसस्काराने विवाहित मनुष्यास आपापल्या जातीमध्ये किंवा कुटुबात ज शास्त्रेोक्त स्थान व अधिकार प्राप्त होतो ते स्थान व तो अधिकार कोणत्याही विवाहाच्या कायद्यानें उत्पन्न करता येणार नाहीं. किंवा तोच अर्थ दुस-या भाषेत सांगावयाचा असल्यास अशा तन्हेचा कायदा हिंदुसमाजावर लादणे कधीही न्याय व समजस होणार नाही, इतकेंच नव्हे तर तो मान्य करण्यासही समाज तयार व्हावयाचा नाही. हे तत्त्व आमच्या राजकत्र्यासही कबूल आहे. आणि हे कबूल केल म्हणजे असे कायदे काहीं व्यक्तींच्या अडचणी दूर करण्यापलिकडे अधिक उपयुक्त व व्यापक होऊं शकत नाहीत व करता येत नाहीत हे उघड आह. विधवाविवाद्वाचा कायदा याच तत्त्वावर केलेला आहे. आणि तेंच तत्त्व पटेलसाहेबाच्या बिलातही नर घातले गेल तर एकदर हिंदुसमाजाकडून त्यास फारशी हरकत यावयाची नाही. असे आम्हास वाटते, पण हल्लीच्या बिलाचे सांप्रत जे स्वरूप आहे ते पुष्कळच व्यापक असल्यामुळे त्यापासून गैरसमज उत्पन्न होणे अगदी अपारहार्य आहे. याम्तव ना. पटेल यास आमची पहिली सूचना अशी आहे की, त्यानी या बाबतीत अधिक विचार करून लोकमताचा विरोध जणकरून ठाक्यतेवढा टळेल अशा प्रकारे हें बिल सुधारून लोकपुढे माडावे. त्यामुळे पुष्कळ वादविवाद टळेल. इतकेच नव्हे तर लोकमत विनाकारण क्षुब्ध न होता ना. पटेल याचा उद्देश सिद्धीस जाण्यासही अधिक सोयीचे होईल. असो; आता ना. पटेल याच्या सध्याच्या बिलात जी व्यवस्था करण्याचे त्यानीं योजले आहे, त्यासबंधाने शास्त्रदृष्टया व व्यवहारदृष्टया थोडा विचार करूं. “ हिंदूच्या निरनिराळ्या जातीतील विवाह शास्रसंमत नसल तरी ते कायदशीर समजले जावे, " असा त्यातील आशय आहे. तात्पर्य, हे बिल हिंदू-हिंदूंच्या मकरविवाहाबद्दलचे आहे. हिंद, मुसलमान. पाशीं किवा खिस्ती यांच्या संकरविवाहाबद्दलचे नाही हे प्रथमत: लक्षांत ठेविले पाहिजे,ही मर्यादा लक्षांत ठेविली म्हणजे पुष्कळ घोटाळा दूर होऊन या बाबतीत फक्त हिंदुशास्राचा व हिंदुरीतिरिवाज नाच आपणास विचार कर्तव्य आहे, इतर सर्व गोष्टी अप्रस्तुत होत, असे सहज दिसून येईल.