पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/568

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदू-हिंदूचे संकरविहाह. ५५१ त्याबरोबरच संन्याशार्ने समाजांत राहून समाजसेवा करावी-कर्मयोगी व्हार्वे-अशी त्यास दिशा लाविली. बौद्धधर्म व खिस्ती धर्म या दोहोची तुलना करून पाहतां खिस्तीधर्म हा केवळ श्रद्धेवर अवलंबून आहे; परतु बौद्धधर्म विचारप्रधान आहे. ऐतिहासिक भौगोलिक, वॆांशिक केोणत्याही दृष्टीनें विचार करून पाहिले असतां वैदिकधर्म व बौद्धधर्म हे जात्या भिन्न धर्म नसून बौद्ध धर्म हें हिंदुधर्माचेच रूपातर आहे. आपले धर्मप्रसारक देशोदेशीं पाठवून धर्मप्रसार करण्याची कल्पनाही बौद्धधर्मानें नवी काढिली नसून वैदिकधर्माचाही अशा रीतीनें पूर्वी परराष्ट्रात प्रसार झालाच होता. तथापि बौद्धधर्मामुळे वैदिकधर्मातील अनेक अनवश्यक आचारांची छाटाछाट होऊन वैदिकधर्माचे स्वरूप जास्त शुद्ध व जेोमदार झालें हें मान्य केले पाहिजे. याप्रमाणें व्याख्यान झाल्यानंतर श्रेोत्यांच्या आग्रहावरून ना. खापडे व बाबू बिपिनपाल यांचीं भाषणे झालीं आणि व्याख्याते व अध्यक्ष यांचे आभार मानण्यात येऊन सभेचे काम आटपले. x·

  • हिंदू-हिंदूचे संकरविवाह

ना. पटेल यानी वरिष्ठ कायदेकौन्सिलात यासंबधानें एक कायद्याच बिल आणल्याचे गेल्या अंकींच आम्हीं प्रसिद्ध केले आहे. हे बिल मागे सहा वर्षापूर्वी ना. बसूनों आणलेल्या बिलापेक्षा निराळ्या तन्हेचे आहे. तथापि त्यामुळे हिंदुसमाजांत बरीच चळवळ उपस्थित होऊन या बिलाविरुद्ध लोकमत क्षुब्ध झाल्याखेरीज राहाणार नाही. निदानपक्षी हे बिल हल्ली ज्या स्वरूपात पुढे आले आहे त्या स्वरूपात पुष्कळ फेरफार झाल्याखेरीज तें हिंदुसमाजास मान्य होणे शक्य नाही असें आम्हास वाटते. कलियुगात वर्णसकर होणार हे पुराणातले भविष्य जरी कदाचित् खरे व्हावयाचे असले, तरीही अशा बिलाचा विचार करतांना ते सुधारकाच्या केवळ तार्तिक दृष्टीनें न करिता हिंदुसमाजाची हल्लींची स्थिति काय, हिंदुलोक कोणत्या शास्त्राधारे या बाबर्तीत वागतात, अगर लोकामध्यें हल्लीं या संबंधाच्या कोणत्या रूढी प्रचलित आहेत आणि त्या हल्लींच्या परिस्थितीने किती शिथिल झालेल्या आहेत इत्यादि व्यापक दृष्टीनेंच म्हणजे एकप्रकारें केवळ कायद्याच्या दृष्टीनेच हे कोणीही समंजस मनुष्य कबूल करील; व त्याच दृष्टीनें आजचा हा प्रास्ताविक लेख आम्ही लिहीत आहों. हें बिल घाईनें पास करण्याचा विचार नसून हें प्रांतिक सरकाराकडे किंवा पुढाच्याकडे आभप्रायाथै पाठविलें जाईल, आणि ही सर्व मते गोळा झाल्यावर मग म्हणजे ( केसरी, ता, १७ माहे सेंष्टबर सन १९१८ ) ६९