कोलंबो येथे ता. ३ एप्रिल रोजी क्रायटेरिअन नाटकगृहांत सर पी. अरुणा- चलम् यांच्या अध्यक्षतेखालीं लो. बाळ गंगाधर टिळक याचे वरील विषयावर व्याख्यान झाले. श्रोतृवृंदास व्याख्यात्याची ओळख करून देतांना सर पी. अरुणा- चलम् म्हणाले, लो. टिळकांचा श्रोतृगणास परिचय करून देण्याचें कारणच नाहीं इतकें लोकमान्यांचे नाव सर्वतोमुखी झाले आहे. रा. टिळकांचा बहुतेक सर्व वेळ राजकारणात जातो, तरीपण त्यांच्या मनाचा नैसर्गिक कल वाङ्मयाकडे आहे. प्रोफेसर, ग्रंथकार, वृत्तपत्रकार अथवा राजकारणी पुरुष यांपैकी कोणत्याही नात्यानें पाहिले तरी त्यानी आपले आयुष्य देशसेवेलाच वाहिले आहे. ज्या संकटानें इतर लोकांचे मन खचून गेले असते अशा संकटांतदेखील त्याचे धैर्य अढळ राहिले आहे. ओरायन व गीतारहस्य या अप्रतिम ग्रथांवरून यांची तीव्र बुद्धिमत्ता सर्वास दिसून आली आहे. अशा विख्यात विद्वानाचे व्याख्यान आज आपणास ऐकावयास मिळत आहे हे आपले सुदैवच होय.
यानंतर लो. टिळक हे भाषण करावयास उठले. ते म्हणाले आज तीन महिने मी राजकीय विषयावर बोलून बोलून कंटाळलो आहे म्हणून मी आज हा धार्मिक विषय घेतला आहे. हा विषय निवडण्यात माझा दुसरा एक हेतु असा आहे कीं, बौद्ध धर्माविषय येथील विद्वानाचे विचार मला कळतील. असो. कित्ये काच्या मतें बौद्धधर्म हा सर्वांत जुना धर्म आहे व दे पंडित असेही म्हणतात कीं, पालीभाषा ही संस्कृत भाषेच्या आधींची होय ! युरोपिअन तज्ज्ञात दोन वर्ग आहेत. कित्येकानीं आर्धी ख्रिस्तीधर्मांचे अध्ययन करून नंतर बौद्धधर्मांचे अवलोकन केलें, तर इतरानीं आधीं वैदिकधर्माचा अभ्यास करून नंतर बौद्ध- धर्माकडे दृष्टि वळविली. या रीतीनें ज्याचा जसा अध्ययनक्रम तसा त्याचा दृष्टिकोण बदललेला दिसतो. मला या सर्व मताचा विचार आज कर्तव्य नाहीं. वैदिकधर्म व बौद्धधर्म याचा परस्परावर कोणता परिणाम घडला एवढेच आपणास आज पाहावयाचे आहे. वैदिकधर्म, वैदिक- आचारविचार आणि वैदिक-तत्त्वज्ञान या सर्वोचा उगम व प्रचार बौद्धधर्माच्या अगोदरचा आहे ही गोष्ट ऐतिहासिक
सिद्ध झालेली आहे. बौद्धधर्माचा उदय होण्यापूर्वीच्या वैदिकधर्मात यश- यागविचार आणि तत्वज्ञानविचार असे जे दोन भाग होते त्यांतील यज्ञ- यागादी भागाला सक्षेप देऊन बौद्धिक, अध्यात्मिक, नैतिक उन्नतीकडे बौद्ध- ant अधिक लक्ष पुरविले आणि या बौद्धधर्माचा वैदिक धर्मावर बराच परिणाम झाला. बौद्धधर्माने आत्म्याच्या अस्तित्त्वाचा निषेध केला आहे असे नसून त्या भान- गडीत न पडतां त्या धर्मानें केवळ नैतिक उन्नती व सामाजिक कर्तव्य यांकडे लक्ष पुरविले. बौद्धधर्माने वैदिक धर्मातली संन्यासाची कल्पना स्वीकारली परंतु
*( केसरी, ता. १६ एप्रिल १९१८ )