Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/561

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४४
लो० टिळकांचे केसरीतील लेख.

वेदाध्यापनाचा तेवढा अधिकार केवळ ब्राह्मणांसच असला तरी ज्याला इल्लीं आम्ही शिक्षण म्हणतों तें कोणत्याही वर्णाला सुलभ होते. म्हणून ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांना शिक्षणरहित ठेवले या म्हणण्यास कांहींच आधार नाहीं. असें असतां शिक्षणाकडे इतर वर्णानी द्यावे तितके लक्ष दिलें नाहीं. याचें खरें कारण त्यानीं आपापल्या धंद्याकडे विशेष लक्ष दिले व शिक्षणाकडे दुर्लक्ष केलें; कारण नुसत्या पुस्तकी व कारकुनी शिक्षणाला त्या वेळीं मान मुळींच नव्हता हेंच होय. आपा- पल्या धंद्याकडे लक्ष देण्यापासून इतर वर्णाचा आर्थिकदृष्ट्या फार फायदा झाला, व ब्राह्मण म्हटले कीं ते निर्धन व ब्राह्मणेतर म्हटले कीं ते सधन असा जो सामान्य भेद दिसतो तो त्यामुळेच उत्पन्न झाला आहे. पण या स्थितीस अनुलक्षून 'आम्हाला द्रव्योत्पादक धंदा इतर वर्णन करूं दिला नाहीं " असे जर ब्राहाण म्हणतील तर ती जशी त्यांची चूक होईल तशीच " आम्हाला ब्राह्मणांनी सुशि क्षित होऊं दिले नाहीं " असे ब्राह्मणेतरानी म्हणणे हीही चूकच आहे. एकानें द्रव्योत्पादक शिक्षण व द्रव्य पसत केले, दुसऱ्याने पुस्तकी विद्या व निर्धनत्व पसंत केलें, अशी केवळ आपखुपीने पूर्वी वाटणी झाली; याबद्दल परस्पर दोष कोणासच लावता येणार नाहीं. बरे, पूर्वी काय झालें असेल तें असो, पण आधु- निक काळात तरी ही स्थिति पालटू लागलीच आहे कीं नाहीं ? महाराष्ट्रांतील ज्ञाने- श्वरादि ब्राह्मण साधु-संतानीं संस्कृत विद्येचे स्तोम कमी करून केवळ जनते- विषयींच्या प्रीतीमुळे मराठीमध्ये वेदविद्या आणण्याचा प्रयत्न केला, हे विसरता कामा नये. आणि आता गेल्या शंभर वर्षांत इंग्रजी अम्मल झाल्या पासून तर विद्या व शिक्षण हैं वाटेल त्याला घेण्यास सुलभ झाले असून ब्राह्मणलोक ब्राह्मणेतराना ती मिळण्यास हरकत करीत नाहींत, इतकेंच नव्हे, तर ब्राह्मणेतराना सुशिक्षित करण्यास ब्राह्मण पुढारीपणाने प्रयत्न करीत आहेत. पण अजूनही पुस्तकी विद्या मिळविण्याचे काम ब्राह्मणेत्तर उदासीन असून त्याच्यावर विद्या मिळविण्याच्या कामी सक्ति व्हावी असे म्हण- यांत ब्राह्मणच पुढारी आहेत. तात्पर्य तुलनात्मकदृष्ट्या ब्राह्मणेत्तर अशिक्षित असल्यास त्याबद्दल ब्राह्मणांच्या नांवानें कोणीही खडे फोडण्याचे खरे कारण नाहीं; व आज सरकारदरबारात लोकसंख्येच्या मानानें ब्राह्मण अधिक असले तर त्याबद्दल त्यांना दोष लावण्याचेही कारण नाहीं. राज्यकारभाराला सुशिक्षण अवश्य असतें, व तें शिक्षण संपादन केल्यामुळे, स्वतः सरकार मनांतून ब्राह्मणांवर रुष्ट असताही, सार्वजनिक कामकाजात केवळ ब्राह्मणांना लोकसंख्येच्या प्रमाणाबाहेर जागा त्यांना द्याव्या लागल्या; या गोष्टीला सरकारचा जसा ना- इलाज झाला तसाच ब्राह्मणांचाही नाइलाज आहे. कौन्सिलच्या निवडणुकीत ब्राह्मण येतात ते काय ब्राह्मणच एकजात मतदार आहेत म्हणून ! कायदे कौन्सि लात गतवर्षी सरकारतर्फे हिंदी लोकांच्या नेमणुका झाल्या त्यांत ना. कामत, ना. साठे, ना. नाईक, ना. बल्लूभाई सामळदास इत्यादि ब्राह्मणांच्या नेम-