पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/553

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५३६ लो० टिळकांचे केसरींतील लेख. वादांत मौजेसाठीं जरी उपयोगांत आलेली असलीं तरी मुख्य भेद तत्त्वाचा आहे ही गोष्ट खुद्द आगरकरांच्याहि पूर्ण लक्षांत आलेली होती. पण सुधारणेचीच ज्यास री ओढावथाची त्यास या गोष्टी कशा कळणार ? आगरकरांचे तर्कचक्र राजकीय, सामाजिक, शिक्षणविषयक बाबतीत ज्याप्रमाणें एकसारखेच अप्रतिहत चालत होतें, तसे त्याच्या सन्मानार्थ जमलेल्या परवाच्या सभेतील फारच थोड्या लोकाचे चालत असेल. कोणी स्त्रीसुधारणेच्छु तर कोणी प्रार्थनासमाजिस्ट, कोणी विधवाविवाहेच्छु तर कोणी एकेश्वरी, आणि कोणी सरकारी नोकरीत आयुष्य घालवून थकलेले तर कोणी राष्ट्रीय जेवण करून जातिभेद मोडण्याच्या उद्योगास प्रवृत्त झालेले, अशा सरमिसळ समाजांत आगरकराच्या केवळ सुधारणातत्त्वाचा जयजयकार करण्यात यावा यात कांहीं नवल नाहीं. ज्याना बाकीच्या बाबती पाहावयाच्याच नव्हत्या त्यास सगळा आगरकर नको होता,. किंबहुना तो त्यांच्या पचनींही पडला नसता. म्हणून गोपाळरावजींच्या चरित्नापैकी आपणांस पचेल तेवढाच भाग घेऊन त्यानीं गोपाळरावांची श्राद्धतिथि त्याच्या एकविसाव्या वर्षी साजरी करून घेतली. असो; यात एकागीपणा आहे हें खरं, पण गोपाळरावजीच्या अंगच्या गुणाचा एकवीस वर्षानीं का होईना अशा रीतीनें मुंबईसारख्या शहरात आदरपूर्वक सन्मान व्हावा, ही अत्यंत समाधानाची व आनंदाची गोष्ट होय; आणि त्याबद्दल या सभारंभाच्या पुरस्कत्यांचे आम्ही मन:पूर्वक अभिनंदन करितों. आज नाहीं तर उद्या हाच उत्सव अधिक व्यापक होऊन सर्वागसुंदर होवो व त्यामुळे पुढील पिढीस स्वार्थत्यागाचे, मानसिक धैर्याचे व चारित्र्याचे इष्ट वळण लागून तद्वारा हा उत्सव देशोन्नतीस कारण होवो, अशी आमची मनापासून इच्छा आहे. དགས། ། ه. o *सर फराजशहा मथा याचा मृत्यु निश्वयाचे बळ ! तुका म्हणे तेंचि फळ । -लुकाराम, सर फेरोजशहा मरवानजी मेथा यांचे ता. ५ नोव्हेंबर रोजीं मुंबई येथे त्यांच्या बंगल्यांत सकाळीं सुमारें साडअकरा वाजता देहावसान झालें, ही बातमी हिंदुस्थानभर पसरून गेल्या दहा दिवसांत चोहोंकडे जो आक्रेश झाला त्याची कल्पना करणेही अशक्य आहे. सर फेरोजशहा यांच्या वयास गेल्या आगस्ट महिन्यांत सत्तर वर्षे सपून एकाहत्तरावें वर्ष लागले होतें, व तत्पूर्वी कांहीं महिने जरी ते आजारी होते तरी पुण्यास आल्यावर मध्यंतरी त्यांची प्रकृती सुधारून आणखी काही वर्षे तरी देशास त्यांचा उपयोग होईल अशी आशा वाटू लागली होती. पण दुखण्यानें पुन्हा उलट खाल्ल्यामुळे ती सर्व नाहींशी

  • (केसरी, ता. १६ नोव्हेंबर १९१५, )