पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/552

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आगरकरांची श्राद्धतिथि. ५३५ यांचा जो मतभेद झाला तो राजकीय बाबतीत नाहीं आणि शिक्षणाच्या बाबतींतही नाहीं. मनुष्य स्वभावत: कितीही चांगला असला तरी शिक्षणार्ने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नति होत नाहीं, हें तत्त्व दोघांसही पूर्ण मान्य होतें; आणि त्याचा प्रसार करून देशेोन्नतीसाठी आपल्या हातून होईल तितकी खटपट करावी एवढयाकरिता दोघेही आपल्या आयुष्यक्रमारंभी स्वतत्र शिक्षणसंस्था काढण्याच्या उद्योगास लागले. मग एवढे जर दोघामध्यें ऐक्य होतें तर मग पुढे मतभेद कसा झाला ? याचे उत्तर कित्येकास वाटत तितकें कठीण नाहीं. मतभेद धार्मिक आणि सामाजिक बाबतींत उत्पन्न झालेला होता. धर्मदृष्टया आगरकर केवळ बौद्धिकवादी होते आणि तोच पंथ सामाजिक बाबतीतही निदानपक्षीं आपल्या लेखात त्यानीं स्वीकारलेला होता. आगरकराची ही पद्धत टिळकांसच नव्हे तर त्यांचे जे दुसरे मित्र केसरीच्या चालकवगत होते त्यासही पसंत नव्हती; व त्यामुळेच अखेर केसरतूिन निघून गोपाळरावजींस सुधारक काढावा लागला. सुधारणा नको असें केसरीचे म्हणणें केव्हाही नव्हर्ते, पण केवळ बौद्धिकदृष्टया किंवा तर्कदृष्टया सुधारणेचा विचार करण्यास केसरी तयार नव्हता. अर्थात् होच पद्धत स्वीकारणें असल्यास आगरकरांस दुसरे वर्तमानपत्र काढणें जरूर होर्ते व तें त्यांनीं काढलेंही. सुधारणांचा केवळ तर्कदृष्टया विचार करणें योग्य नाही हें मत आता सुधारलेल्या राष्ट्रातही ग्राह्य झालेले आहे. राजकीय बाबतीत राजसतेच्या अस्तित्वा मुळे केवळ तर्कवश होऊन लिहिता येत नाहीं असा आगरकरासही अनुभव आलला होता; पण हिंदू-समाज अधिकारहीन आणि पगू असल्यामुळे तशा प्रकारचा अनुभव सामाजिक बाबतीत सध्या आमच्याकडे येत नाहीं. तथापि तेवढ्यामुळे प्राचीन परंपरा, देशकाल किंवा सद्यःकालीन सामाजिक परिस्थिति यास सोडून केवळ तार्किकरीत्या सामाजिक सुधारणेचा विचार करणे युक्त आहे असें सिद्ध होत नाहीं. समाजावर तार्किक हल्ले करणे म्हणजे केवळ पाडापाडीचे काम करणे होय. त्याने समाजाची बंधने शिथिल होतात, पण नवीं मात्र उत्पन्न होत नाहीत. मिल्लसारख्या तत्त्ववेत्यासही ही गोष्ट कबूल करावी लागली आहे. आणि कॉट या फ्रेंच ग्रंथकाराने जेव्हा निव्वळ आधिभौतिक पायावर समाजरचना कशी करावी याचे विवेचन केलें, तेव्हा त्यास चातुर्वण्यासारखीच एक पद्धत पसंत पडून ती अमलांत कशी आणावी याचा त्यानें आपल्या ग्रंथात सांगोपांग विचार केला आहे. मिल्लला ही पद्धत पसंत पडली नाहीं; पण अशी पद्धत पाहिजे ही गोष्ट त्यार्ने प्रांजलपणें कबूल केली आहे व या पद्धतीचे विवेचन केल्याबद्दल त्याने कॉटचे अभिनंदन केले आहे. असो; या विषयाचे समग्र विवेचन करण्याचे हें स्थल नव्हे. सागण्याचे तात्पर्य एवढेच कीं, * केसरी' आणि * सुधारक ’ यांचा जो मतभेद होता तो तत्त्वाचा होता; आणि * तर्कटी, ? * माथेफिरू, '* गांवाबाहेरचा ? किंवा * सवंगलोकप्रियतेच्छु’ इ० वाक्शस्त्रे या ६६