पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/548

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आगरकरांची श्राद्धतिथि. ५३१ आमचे सांगणें आहे. देशासाठीं जें काम करावयाचे आहे, ते अत्यन्त महत्त्वाचेच नव्हे तर अत्यंत कठीणही आहे. एकाच प्रयत्नान एकाच वेळी किंवा एकाच पुरुषाचे हातून ते सिद्ध होण्यासारखें नाहीं, त्यासाठीं या सर्व गोष्टींची परंपरा कायम राखली पाहिजे; आणि ती राखणें सर्वस्वी पुढाल पिढीच्या हाती आहे. गोपाळराव गोखले याना जें काही कर्तव्य वाटल तें ते करून गेले; आणि त्याच्या कृत्याप्रमाण त्यास परलोकी सद्गति मिळल, याबद्दल धर्मदृष्टया काही शंका नाही. पण त्यानी आपले कर्तव्य केले किंवा त्यांना सद्रति मिळाली, येवढे म्हणूनच मागे राहिलेल्या लोकाचे कर्तव्य संपत नाही. त्याच्या मृत्यूने जें नुकसान झाले आहे, ते सर्व देशाचे असून विशेषतः त्याच्या आप्तइष्ट वर्गावर व त्याच्या शिष्यावर हा एक मोठा कठीण प्रसगच गुदरला आहे, असे म्हटले पाहिजे. पण ह्या अशा स्थितीतही शातता आणि समाधान राखून येनास्य पितरो याता येन याता: पितामह्ाः । तेन यायात्सता मार्गे तेन गच्छन्न दुष्यति । ज्या मार्गानें गुरु किंवा त्याचेही गुरु गेले तोंच लोककल्याणाचा मार्ग पुढे चालवावा, त्यातच आपलें क्षेम आहे, हे मनुवचन लक्षात आणून व शेोक विसरून पूर्वीचायांनी देशाच्या अभ्युदयार्थ जा मार्ग आखून दिला आहे तोच पुढे उत्साहाने, उमेदीने, धैर्यानें आणि नेटानें चालविण्यास सर्वानीं प्रवृत्त व्हावें, एवढेच अखेर या दु:खदायक प्रसंगीं आमचे सर्वोस दुखवट्याचे सागणे आहे. पुढचे पडले तर मागच्यानी आपले कतव्य बजावणे यातच खरे समाधान आहे, रडण्यात नाही. حسمه مستمحماس تیمه سمبسیابسر میه

  • आगरकरांची श्राद्धतिथि

क्षुद्राः सति सहृस्रश: स्वभरणव्यापारमात्रेीद्यताः । स्वार्थो यस्य परार्थ एव स पुमानेकः सतामग्रणीः । --भर्नुहरि. कै. प्रि. गोपाळ गणेश आगरकर यास ता. १६ जून १८९५ रोजी देवाज्ञा झाली. तेव्हापासून २१ वर्षांनी त्याचे निधन-दु:ख वयात येऊन गेल्या रविवारी मुंबईकरानी त्याच्या स्मरणार्थ मोठा उत्सव, राष्ट्रीय जेवणाची त्याला पुरवणी देऊन, साजरा केला. ही कालातराने घडून येणा-या अपूर्व गोष्टींपैकींच एक गोष्ट आहे. हा उत्सव करण्याची कल्पना रा. रा. नाईक व अळतेकर याच्या मनात प्रथम येऊन मुंबईच्या सुधारकसंघाची मदत मिळाल्यावर परवा तिला व्यक्त स्वरूप

  • (केसरी, ता. ४ माहे जुलै १९१६)