पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/547

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५३ ० लो० टिळकांचे केसरीतील लेख. गिरी नीतिदृष्टया, देशहितदृष्टया आणि पुरुषार्थदृष्टया अत्यंत महत्त्वाची हेोती, असें केोणासही वाटल्यावाचून राहणार नाहीं. यांचा स्वभाव सैौम्य असल्यामुळे आपल्या ध्येयाप्रमाणे हातीं घेतलेले काम सौम्य उपायांनीच पार पाडण्याकडे यांची प्रवृत्ति असे; आणि आमच्यासारख्या कित्येक लोकांस हे सौम्योपचार अनाठायीं आहेत असे वाटे, पण पथ्य आणि उपचार यांच्या तीत्रातीन्नतेसंबंधानें दोन वैद्यांमध्यें जरी मतभेद झाला, तरी वैद्य या नात्यानें गोपाळरावजींची जी योग्यता होती ती आम्हांसही पूर्णपणे मान्य आहे. आपला देश हल्लीं ज्या स्थितींत आहे ती स्थिति अत्यंत निकृष्ट असून सर्व बाजूंनीं देश वर येण्यास लोकाच्या ठायीं अनेक सद्गुणाचा प्रादुर्भाव झाला पाहिजे, असें जें गोपाळरावजींनी देशाच्या रोगाचे निदान केले होतें, ते अगदीं अक्षरशः खरें आहे. हें निदानच आधीं कित्येकाच्या लक्षात येत नाही; आणि लक्षात येणा-या हजारों लोकापैकीं एखादाच त्यासाठी आपला वेळ मोडून उपचार करण्यास तयार होत असतो. गोपाळरावजी याच्याही पुढे गेलेले होते; आणि अशा त-हेचे पुरुष या देशात सध्या फारच थेोड आहेत, हें लक्षात आणलें म्हणजे गोपाळरावांच्या कामगिरीचे महत्त्व पूर्ण लक्षांत आल्याखेरीज राहणार नाहीं. किंबहुना हल्लीच्या काळांतील ब्राह्मणाचे जर काहीं कर्तव्य असेल तर तें हेच होय, असें आम्हीं म्हणू शकतो. डामडौलास न भुलता, आपण एकटंच निर्धन जन्मलों तसेच एकटे जाणार हें लक्षांत आणून ऐहिक सुखाचा त्याग करणे, आणि केवळ देशहितकारक धर्म आचरणें यातच खरै ब्राह्मणत्व आहे; आणि हा धर्म ज्याने पाळला तो दुसर काहीं करो वा न करो, त्यानें योजलेले उपाय सौम्य असेोत वा कडक असेोत, केवळ वरील धर्म पाळल्यामुळेच तो देशकत्र्या पुरुषाचे वर्गात पडून सद्गति पावते, असें आम्हास वाटत. या सिद्धान्तास नांवे ठेविली तरी त्याची महति कमी समजणारे काहीं लोक आहेत, नाही असें नाहीं. पण अशा लोकांच्या मतांमुळे वरील सिद्धान्ताचे महत्त्व कमी न होता, अपवादाने सामान्य सिद्धान्तास जी बळकटी येते तीच या आक्षपामुळे वरील सिद्धान्तासही येते, असें आमचे मत आहे. असो; विद्यार्थिदशैत असल्यापासूनच मनापुढे उच्च ध्येय ठेवल्यान बुद्धिमान् पुरुषास काय करितां येणे शक्य आहे, याचा धडा गोपाळरावजीच्या चरित्रावरून पुढल्या पिढीनें ध्यावा, असें त्यास आमचे सांगणें आहे; व तो ते घेतील अशी आम्हांस उमेद आहे. या जगांत कोणीही झाला तरी ती आपल्यासाठींच जन्मला आहे असे नाहीं. देश भरभराटीत असता हो गेोष्ट पुष्कळांच्या डोळ्यांपुढे असते. पण त्याला विपन्नावस्था आली म्हणजे विद्वान् पुरुषही या सिद्धान्ताकडे दुर्लक्ष करीत असतात; किंवा अशा दुर्लक्षामुळेच विपन्नावस्था येते, असे म्हटलें तरी साजण्यासारखे आहे. म्हणून ना. गोखले यांच्या चरित्रावरून जेो बेोध ध्यावयाचा तो तरुणानीं होईल तितक्या लवकर घेण्यास मागे सरूं नये, असे त्यांस