पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/546

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कै० गोपाळराव गोखले. ५२९ देशांत आपलें नांव आबालवृद्धांचे तोंडीं ठेवून जावें, हें काहीं लहानसहान काम नव्हे; आणि हें काम कोणासही आपल्या बुद्धिमतेर्ने, दीर्घौद्योगाने, सतत उच्च ध्येय मनापुढे ठेवून, केवळ आपल्या कर्तबगारीनें करतां येतें हें गोपाळरावजींच्या चरित्रांतील मुख्य मर्म होय. यांनीं प्रथम न्यूस्कुलात व फग्र्युसन कॉलेजांत अध्यापकाचे काम करून नंतर सार्वजनिकसभेत वेल्बी कमिशनपुढे, मुंबईच्या व पुढे हिंदुस्थानच्या कायदेकौन्सिलात, प्रातिकसभेत, किंवा राष्ट्रीयसभंत, अनेक प्रकारचीं कार्मे केलली आहेत, असें यांच्या चरित्राचे वर्णन करीत असतात; कित्येक त्यांच्या बुद्धिमतेची प्रशंसा करितात, तर कियेक त्याच्या दीर्घाद्येोगाची महती गातात. कित्येक त्यांचा सौम्यपणा वर्णन करितात, तर कित्येक त्याचा निगवीपणा गातात. परंतु आमच्या मते हे बाह्य गुण झाले, आणि यासंबंधानें कांहीं बाबतीत कित्येकांचा नामदार गोखले यांशी मतभेदही असू शकेल. पण हे गुण व ही कामगिरी ज्या एका अन्तर्गुणामुळे उदयास येते त्या गुणाबद्दल मतभेद असणें शक्यच नाहीं, असें आमचे कायमचे मत आहे. तो गुण म्हटला म्हणजे निलोंभ अंतःकरणानें वेळींच आपणास देशकार्यास वाहून घेणें हा होय. बालपणीं अभ्यास व तरुणपणीं संसार यथास्थित करून मंदावलेल्या कायिक व मानसिक शक्ति इतर कर्तव्याभावीं लोकोपयोगास वाहाणारे पुरुष कोठे आढळून आल्यास त्याबद्दल विशेषशी आदरबुद्धि मनात उत्पन्न होत नाही. पण इंद्रियशक्ति शाबूत आहेत, शरीर स्वार्थासाठीं उद्योग करण्यास समर्थ आहे, वार्धक्य अजून दूर राहिले आहे, आणि संसारातील सुखाचे स्वरूप अद्याप मनेोहर असून तिकडे चित्ताची प्रवृत्ति होणें साहजिक आहे; अशा वेळीं आणि विशेषकरून या दिशेनें गेले असता आपणांस यश मिळण्याचा इतरापेक्षा काकणभर अधिक संभव आहे, अशी मनास खात्री वाटत असतांही या सर्व मनोहर देखाव्यावरून दृष्टि मार्गे ओढून यथाशक्ति आपल्यास देशकार्यास वाहून घेणे, त्यात आलेली संकटें सोसण्यास कबूल असणे, किंबहुना त्यातच आनंद मानून त्यासाठीं सतत परिश्रम करण्यास तयार होणें, याला एक प्रकारचा बळकट मनोनिग्रह लागत असतो आणि तो मनेोनिग्रह ज्यानें दाखविला, दाखविलाच नव्हे तर आमरणान्त कायम ठेवला, तोच पुरुष धन्य होय. गोपाळराव गोखले याचे बरोबर पब्लिक सर्विहस कमिशनमध्ये सरकारचे पुष्कळ काळे व गोरे कामगार आहेत; व गोपाळरावजी जें काम करितात तेंच ते करीत आहेत. पण त्याची या कामाबद्दल स्तुति न करिता गोपाळरावजींचीच आम्ही जी प्रशंसा करितों, यांतील बीज हेंच होय. एकाचा उद्योग व परिश्रम हें नोकरीच्या कर्तव्याचे फळ आहे, आणि दुस-याचा उद्योग त्यानें आपणा स्वतःस स्वदेशकायोस वाहून घेतलेल्या स्वार्थत्यागाचे फळ आहे. फळ एकच पण कोणत्या बुद्धीनें मनुष्य त्यासाठीं उद्योग करण्यास प्रवृत्त होतो, हें लक्षांत ठेवून तदर्थ झटणाच्या प्रत्येक पुरुषाची किंमत करावी लागते. आणि या दृष्टीनें पाहूं गेले असता गोपाळरावजींचे उद्योग व त्यानी केलेली काम