पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/545

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*ARと लो० टिळकांचे केसरींतील लेख. कोणासही सांगावयास नकोच. किंबहुना, विलायतेतील डॅॉक्टरांनी हीं दुश्चिन्हेंच ठरवून यांतच गोपाळरावजींचा अंत होईल असें भाकीतही केले होतें. पण पथ्यपाण्याच्या बंदोबस्तार्ने, औषधसेवनार्ने आणि * माझें अमुक काम पुरें व्हावयाचे आहे व त्यासाठी मला कांही दिवस तरी जगलेंच पाहिजे ? अशी उद्योगी पुरुषाची स्वसामथ्र्यावर जी एक प्रकारची दृढनिष्ठा असते तीमुळे गोपाळरावजींस इतके दिवस तरी कंठतां आले, असे म्हणण्यास हरकत नाही. त्याचे वय मरणसमयी अवघे ४९ वर्षाचे होतें; व जगाच्या राहाटीप्रमाणे पाहिले तर अद्याप त्यांचे हातून बरीच मोठीं कृत्ये घडण्यासारखी होतीं. पण * संसारांतील उत्तम उत्तम फुलें वेचण्यांत गुंतलेल्यासच मृत्यु घेऊन जातो !’ असें धम्मपदात म्हटले आहे, तेंच या ठिकाणी अक्षरशः खरे झाले. गोपाळरावजीच्या मनातून पब्लिक सर्विहस कमिशनचा रिपोर्ट पुरा करावयाचा होता, आपण काढलेल्या सर्वट्स ऑफ इन्डिया संस्थेची काहीं स्थिरस्थावर करावयाची होती, वरिष्ठ कायदे कौंसिलच्या येत्या बैठकीस हजर राहून तेथील आपले काम करावयाचे होतें,-इत्यादि एक ना दोनअनेक प्रकारच्या गोष्टी त्याच्या मनात घोळत होत्या; व त्यास अशी उमेद होती की, निदान पब्लिक सर्विहस कमिशनचा रिपोर्ट तयार होऊन प्रसिद्ध होईपर्यंत तरी आपल्या आयुष्याची दोरी कायम राहील. पण हे सर्व विचार जागच्या जागींच कायम राहून व्हाइसरायापेक्षाही श्रेष्ठ पुरुपाचे आमंत्रण आल्यामुळे आपले सर्व व्यवसाय बाजूस ठेवून या लेोकींची यात्रा त्यास संपवावी लागली ! असेो; हे खेदकारक प्रसंग आज ना उद्यां सर्वावरच यावयाचे आहेत. गोपाळराव ज्या संघांत वाढले, त्यापैकी आतां किती शिल्लक आहेत हें मोजूं गेले असतां गोपाळरावाच्या मृत्यूबद्दल खेद काही तरी कमी होऊन, त्याच्या हातून जी कामगिरी झाली ती घडण्यापुरतें तरी त्यास परमेश्वरानें आयुष्य दिलें, यांतच समाधान मानून ध्यावें लागेल. आपण काहीं तरी करणे ही आपल्या हातांतली गोष्ट आहे खरी; पण आपण केलेले काम सिद्धीस नेणे, आपण लावलेल रोप आपल्या डोळ्यादेखत मोठे झाड होऊन त्यास पुष्पं व फळे आलेलीं पाहणे, या गोष्टी आपल्या हातच्या नाहीत. हीं कामें होण्यास सर्वोचीच पुण्याई लागत असते; आणि ती जेथे कमी पडली तेथे एकट्यानेंच शाक करून काय उपयोग ? तथापि शोकाच्या प्रसंगी उपयोग आणि अनुपयेोग याचे भान न राहतां मनुष्यानें शेाकाला वश होणें अगदीं स्वाभाविक आहे; आणि तशी हल्लींच्या प्रसंगीं पुष्कळाची अवस्था होईल यात कांहीं संशय नाहीं, आणि झाली तर त्यांत कांही दोषही नाहीं. गोपाळरावजींनी जी कामगिरी केली ती बहुतेक सर्व लोकांस पूर्ण माहीत असून आजच्या दु:खकारक प्रसंगीं तिचे कोणासही स्मरण झाल्याखेरीज राहाणार नाहीं. एका गरीब ब्राह्मणाच्या मुलांनै शाळेत अभ्यास करून परीक्षा पास झाल्यानंतर काहीं थेोड्या वर्षातच हत्ती, घोडे, संपति, सत्ता किंवा अशाच प्रकारची दुसरी बाह्य साधनें जवळ नसतां वयाच्या पन्नासाव्या वर्षापूर्वीच सर्व