पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/543

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२६ लो० टिळकांचे केसरींतील लेख. संग्रहासाठीं शास्त्रतः प्राप्त होणारें आपलें कर्तव्य तुम्ही केलेंच पाहिजे असें गीतेचे सांगणे आहे. नुसती भक्ति या दृष्टीनें पाहिले तर नामस्मरण करण्यांतच सर्व वेळ घालविणें हाच भक्तीचा परम उत्कर्ष ठरतो. पण कर्मावांचून अशा त-हेची भक्ति करण्याबद्दल गीतेमध्ये कोठेही वचन नाहीं. हे जग काहीं आम्हीं केलेले नाहीं. म्हणून यातील व्यवहारही आमचे नसून ईश्वरानर्मित आहेत असें म्हणावें लागते. हे व्यवहार काम्यबुद्धीने, अभिमानार्ने किंवा स्वार्थबुद्धीनें केले म्हणजे बधाला कारण होतात. पण उत्कट भगवद्भक्तीबरोबर जगातील सर्व कार्म परमेश्वराचीच आहेत, किंवा त्यांतील काही विशिष्ट भाग करण्याकरिताच ईश्वरानें मला जन्म दिला आहे, या भावनन म्हणजे आपण जें काही करतो ते परमेश्वरार्पण करून जगाचे सर्व व्यवहार चालविणें हें प्रत्येक मनुष्याचे काम आहे, असा गीतेचा उपदश आहे. किंबहुना विराटरुपी परमेश्वराची ही एक उपासनाच हेोते असे म्हटले तरी चालेल; व याच हेतूनें * स्वकर्मणा तमभ्यच्र्य सिद्ध विंदति मानवः ’ हा श्लोक गीतेच्या अखेर आला आहे. * सर्व भूताच्या हितामध्ये रत ? होऊन स्वार्थाचा सर्वस्वीं पराथीत लय करणे व अशा आत्मौपम्य बुद्धीनें फलाशाविराहत जगातील कर्म करणे हा भक्तियोग सवै भक्तियोगामध्ये श्रेष्ठ होय व हाच गीर्तेत प्रतिपाद्य आहे. लोककल्याणाची किंवा परोपकाराची उपपति इतक्या सुंदर रीतीनें पाश्चिमात्य पडित म्हणतात त्याप्रमाणें नुसत्या आधिभौतिक मार्गाने कधीही लागत नाही. म्हणून गीतेतील कर्मयोग पाश्चिमात्य कर्मयोगापेक्षा अधिक श्रेष्ठ व उदात्त आहे असे माझे मत आहे. अर्जुन अशा तन्हेनें कर्म करण्यास तयार झाल्यावर ज्याप्रमाणे भगवंताने त्याचे सारथ्य केले त्याप्रमाणें तुम्हीही हा योग आचरण्यास लागल्यावर तुमचे भगवान सहाय्य करतील यात शंका नाहीं. ज्ञान आणि काम्य कर्म याचा विरोध आहे खरा; पण ज्ञान व निष्काम कर्म यात कोणताही विरोध नाही. म्हणून निष्काम कर्म हें ज्ञानप्राप्तीचे नुसत साधन न मानता ज्ञानेोत्तर कर्म गीर्तेत विहित धरले आहे. सर्वोभूर्ती समबुद्धि झाल्यानें कुलाभिमान, देशाभिमान वगैरे सद्गुण नाहीसे होतात असा कित्येकाचा आक्षप आहे पण तोही माझ्या मतें खरा नाही. गाय व ब्राह्मण याच्या ठिकाणीं समबुद्धि झाल्यावर गाईच्या पुढला चारा ब्राह्मणास व ब्राह्मणाचे अन्न गाईस ज्याप्रमाणे कोणी घालीत नाहीत, तद्वतच सर्वभूतात्मैक्यबुद्धि व देशाभिमान याची गोष्ट आहे. स्पेन्सर वगैरे आधुनिक आणि भौर्तक पंडितही सर्वभूतात्मैक्यबुद्धि हेंच इहलोकीचे परम श्रेय मानतात. पण ही बुद्धि कायम ठेवूनही प्रसंगविशेषी सारासार विचाराती देशाभिमानच पतकरावा लागतो, असे जे त्यानीं प्रतिपादन केले आहे त्यास कोणी हरकत घेत नाही. मग वेदान्तासच ती हरकत लागू का करावयाची ? वेदान्त तुम्ही देशाभिमानानें वागता किंवा कुलाभिमानानें वागता हे पाहात नाहीं. सारासार-विचाराती ज्या प्रसंगीं शास्रतः जें योग्य दिसेल तें तुम्ही करा, त्यास वेदान्त नको म्हणत नाहीं. पण या