सारासार विचार करणे एवढेच कांही सदाचरणाचे तत्त्व नाही; कारण एखाद्या गरीबाने एखाद्या सत्कृत्याकडे दोन पैसे आणि त्याच कामासाठी एखाद्या लक्षाधी- शार्ने शंभर रुपये दिले तरी त्याची नैतिक योग्यता आम्ही एकच समजतो. यावरून शुद्ध, निष्काम व सर्वाभूती सम झालेली, अतएव फलासंगविरहित बुद्धि, हेंच काय ते गीतेंत वर्णिलेले सदाचरणाचे मूळ होय, असें सिद्ध होतें. 'पत्र पुष्पं फलं तोयं ' याचा भावार्थ हाच असून अशा रीतीनें जो आपले कर्तव्य करतो त्यास कर्माचें बधन न लागता स्वधर्मानें लोकसग्रह केल्याचे श्रेय संपादन करून त्याच कर्माने अखेर यास मोक्ष मिळतो, म्हणून मोक्षासाठीं साधन म्हणूनच नव्हे तर, ज्ञानोत्तरहि निष्काम कर्मों अवश्य केली पाहिजेत असें गीतेचें पुनः पुनः सांगणे आहे व याचमुळे अखेर स्वधमाकरिता युद्ध करण्यास अर्जुन प्रवृत्त झाला आहे.
वर जी बुद्धीची निष्काम अवस्था वर्णन केली ती अव्यात्मविचाराने प्राप्त होते हें खरें पण ती सिद्ध होण्यास अध्यात्मविचार हा मार्ग क्लेशमय असून भक्तिमार्गानें तोच हेतु सुलभ रीतीने प्राप्त होतो, आणि हा मार्ग प्रत्यक्ष असल्या- मुळें त्याचें आचरणही सुखाने घडतें असें गीतेचे यापुढे दुसरे महत्त्वाचें सांगणे आहे. पण यावरून निष्कामकर्मविरहित भक्तीच गीतेंत प्रतिपाद्य आहे, असे होत नाही. भक्ति हे साधन आहे, साव्य नव्हे; व सर्व साधनात हैं साधन जरी सुलभ असले तरी त्याने निष्काम व समबुद्धि संपादन करून कर्मे सोडावी असे सिद्ध न होता उलट त्या बुद्धीने जगातील सर्व व्यवहार करीत रहावें हेंच गीतेचे अखेरचें सांगणें आहे. यानें मोक्षप्राप्ति होते, इतकेंच नव्हे तर जगांतील सुस्थि- तिही कायम रहाते. यासच ज्ञानकर्म - समुच्चयपक्ष असे म्हणतात, व तोच गीते - ती प्रतिपाद्य विषय होय. म्हणजे केवळ कर्मफलत्यागपूर्वक ज्ञान किंवा केवळ भक्ति है गीतेतील अंतिम ध्येय नव्हे. हा ज्ञानकर्म- समुच्चयपक्ष गीर्तेतच नव्हे तर ईशावास्यादि उपनिपदातही वर्णिलेला आहे. किंबहुना गीता है मोक्षदृष्टया संसार कसा करावा यानें शास्त्र आहे. संसार सोडून देण्यासाठीं गीता सांगित- लेली नाहीं. आधुनिक पाश्चिमात्य पंडित आपली संसारशास्त्र आधिभौतिक पाया- वररीत असतात. पण हा पाया अपुरा असल्यामुळे तो सोडून देऊन संसार- शास्त्राचा मोक्षशास्त्राशी म्हणजे अध्यात्मशास्त्राशी गीतेनें उत्तम मेळ घालून दिलेला आहे. गीतेंत जर कांही अपूर्वता असेल तर ती हीच होय. नुसता वेदात किंवा नुसती भक्ति प्रतिपादन करणारे ग्रंथ पुष्कळ आहेत. पण त्यातून प्राय: अखेर कर्मसंन्यासरूपी चतुर्थाश्रम प्रतिपादिलेला असतो. पण गीतेचा कटाक्ष तसा नाही. संन्यास ह्या शब्दाचा अर्थ व्यापक करून कर्माचा संन्यास न करिता फलाचा संन्यास करा, किंवा संन्यासबुद्धी ठेवून केवळ इंद्रियानेंच जगांतील सर्व व्यवहार करीत जा, कर्मे सोडणे इष्ट नाहीं, तीं अवश्य केली पाहिजेत, असा गीतेचा भावार्थ
पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/541
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२४
लो० टिळकांचे केसरीतील लेख.