Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माधवबागेंतील सभेवरील आक्षेप. ३९ डित्य निरर्गलपणें सभांतून व समाजांतून प्रगट केलें; आपली थेोरवी वर्णितांना व आपल्या अप्रतिम धैर्याची, श्रेष्ठतेची, सदयतेची, परोपकारित्वाची बडिजाव मिरविताना, ते वस्तुस्थिति अगदीच विसरून गेल; व मनेोराज्याच्या परमभरांत, शहाणपणांत, दूरदर्शित्वात, शक्तिमत्वात आपण ईश्वरतुल्यच आहों, असेही पण त्यास बहुतेक वाटू लागले. “कर्तुमकर्तुमन्यथा कर्तुम्” असें आपल्या अगों सामथ्र्य असता हिंदु समाजास आपण शडी धरून का वाकवू नये अशी त्याच्या मनांस साहजिकच वीरश्री उत्पन्न झाली, व त्याच्या वल्गना प्रत्यही अधिकाधिक बीभत्स स्वरूप धारण करू लागल्या; त्याची प्रकृति व प्रवृति दिवसानुदिवस अधिकाधिक जाज्वल्यता प्रगट करूं लागली, व प्रत्येक वार आत्मबहुमानानें आपल्या नावाचा डंका वर्तमानपत्रातून मिरवून सुधारकाचा अग्रणी होण्याची अत्याशा बाळगू लागला. याप्रकारे सर्वत्न निस्सोम कलकलाट उडून गेल्यावर, स्थिर व गंभीर असा आमचा हिंदु समाजहा फार वेळ तटस्थवृति धारण करील, हें शक्य नव्हते. त्याने अखेरीस आपलें अक्राळविक्राळ स्वरूप प्रगट करण्याचा निश्चय केला. त्या ची वार्ता पसरते न पसरते तोच आमच्या साहसैा सुधारकाच्या तेोडचे पाणी पळाल; त्याच्या शक्ति विगलित झाल्या ! त्यांची हृदय निराशेर्ने पूर्णपणे ग्रासून टाकिली; व विराटपुल उत्तर याहूनही ज्याचा वायतिरेक विशेष, असे सुधारकाचे मोहेरे, कंाणी बृहन्नडा आपणास या प्राणातिक संकटातून वाचवील काय या विचारात पडले ! माधवबागेतील टोलेजग सभेमध्ये जेो ठराव होणार होता, त्यातील शब्दमात्रासही सभेत विरोध करण्याची ज्याची प्राज्ञा नव्हती, अशी ही भकड मंडळी आतां काय युक्ति लढवितात, हें आम्हास पाहाण्याचा फार उत्कंठा होती; व त्यानी सर्वानुमतें जी अजब युक्ति काढिली ती आता जगत्प्रसिद्ध झालीच आहे, तेव्हा त्यांच्या अकलेची व धूर्ततेची वाचकास कल्पना आलीच असेलू. सरकारनें हिदुधमातील लग्नकार्यादि विषयात हात घालू नये, अशा अर्थीचा अर्ज करायाचा हें कर्तव्य जाणून हजारो लोक एकत्र होतीलं, माधवबार्गेतील विस्तीर्ण जार्गेतही मावायचा नाहीं, असा अफाट लोकसमुदाय जमेल, व आ. रा. सा. मंडलिक यानी अध्यक्षस्थान स्वीकारले असतां त्याच्या प्रसिद्ध लोककल्याणकारित्वामुळे मुंबईतील लहान मोठे सर्व व्यापारी, कामदार, व वजनदार लोक-याच्या पक्षास बळकटी देण्याकरितां एकजूट होतील, व आजपयेत अपशब्द, मिथ्याराप, व अमगल वल्गना असह्य होईपर्यंत सह्न केल्यान, प्रतिपक्ष बळावले की काय या भीतीनें, सर्व विचारी व समंजस लोक आपले विचार एकवेळ प्रगट करण्याचीही संधि घेतील,-ह्या सर्व गोष्टी जाणून, व आपली अल्पसंख्या लक्षांत आणून आमच्या उत्कट सुधारकांनी अर्जाचे अक्षरास हात न लावतां त्यांत आपलें कार्य होईल, अशा तन्हेचे एक वाक्य घालण्याचा निश्वय केला व त्याबद्दल सूचना करण्याकरितां मि. तेलंग याची उठावणी केली. या सूचनेचा पूर्ण