पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/533

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५१६ लो० टिळकांचे केसरींतील लेख. आहे कीं, गीतेवर जीं भाष्ये व टीका सध्यां उपलब्ध आहेत त्या निरनिराळे सांप्रदायिक आचार्य व त्यांचे अनुयायी याच्या आहेत; व त्यामुळे ज्यानें त्यानें गीतार्थ आपल्या सांप्रदायास अनुकूल होईल अशा रीतीनें निरूपिला आहे. उदाहरणार्थ श्रीमत् आद्य शंकराचार्य यांच्या भाष्यांत गीतेचा अर्थ अद्वैतपर व संन्यासप्रतिपादक लावला असून रामानुजाचायांच्या मतें तीच गीता विशिष्टाद्वैतपर व भक्तिप्रतिपादक आहे; आणि मध्वाचार्याच्या मतें गीर्तेत भक्ति प्रधान असली तरी ती द्वैतमूलक आहे. किंबहुना श्रीशंकराचार्यानी आपल्या भाष्याच्या आरंभीच असें म्हटले आहे कीं, “ गीतेवर अनेकानीं पूर्वी टीका केल्या, पण त्यास गीतेचा अर्थ नीट कळला नसून सर्वकर्मसंन्यासपूर्वक ज्ञानानेंच मोक्ष मिळतो हेंच काय तें खरें गीतेचे तात्पर्य होय, हे सिद्ध करण्यासाठीं हें भाष्य लिहिले आहे.” वल्लभ व निंबार्क यांच्या साप्रदायांच्या गीतेवर ज्या टीका आहेत त्यांत अशींच विधानें केली आहेत. कोणी कर्मसंन्यासपूर्वक अद्वैत तर कोणी विशिष्टाद्वैत व भक्ति, कोणी द्वैतीभक्ति तर कोणी ज्ञानपूर्वक पार्तजलयोग, कोणी सगुणभक्ति तर कोणी ज्ञानभक्ति यांचा मिलाफ गीतेंत प्रतिपाद्य आहे असें म्हणतात. केवळ माझेंच असें मत आहे असें नाहीं, तर प्रसिद्ध मराठी कवि वामन पंडित यांची गीतवर यथार्थदीपिका नामक जी टीका आहे; तिच्या आरंभीं ** या कलियुगामाजि ॥ जेो तो गीतार्थ योजी । मतानुसार । ” असें म्हटले आहे. यावरून गीतेवरील सर्व टीका प्राय: त्या त्या टीकाकाराचा जेो सांप्रदाय त्याला अनुसरून आहेत. साप्रदायनिरपेक्ष म्हणजे कोणत्याही सांप्रदायाचा आग्रह न ठेविता केवळ सर्व गीता वाचून तिचा सरळ अर्थ काय लागतो हें सागण्याचा या टीकाकाराचा हेतु नाहीं, असे दिसून येईल. साप्रदायिक दृष्टया गीतेचाँ ही जीं निरनिराळीं तात्पर्ये ठरविलेली आहेत ती त्या त्या साप्रदायातील लोकास मान्य असल्यास त्यांत काहीं नवल नाही. प्रस्थानत्रयींतील सर्व ग्रंथ आपल्याच सांप्रदायास अनुकूल आहेत असें दाखविल्याखेरीज लोकात कोणताही सांप्रदाय मान्य होत नाहीं, त्यामुळे असे अर्थ लावणें भाग पडतें. पण हे सर्वच यथार्थ असणें ज्याअर्थी शक्य नाहीं त्या अर्थी त्या सर्वोची छाननी करून गीतेचे कोणतें तात्पर्य यथार्थ आहे हें पाहणें जरूर आहे. ही शंका माझ्या मनात येऊन आज बरीच वर्षे झालेली आहेत व या कालांत मनांत घोळत असलेले विचार व्यवस्थित रीतीनें एकत्र करून माझ्या गीतारहस्य नामक ग्रंथांत नमूद केलेले आहेत. माझे सिद्धांत एकदमच सर्वास ग्राह्य होतील, असें मी म्हणत नाहीं. पण गीतार्थासंबंधानें विचार करण्यास आधुनिक चिकित्सकदृष्टया त्यांचा बराच उपयोग होईल अशी मला आशा आहे. सांप्रदायिक दृष्टि सोडली तर ग्रंथाचे परीक्षण कसे करावें हा या पुढला प्रश्न होय. ग्रंथपरीक्षण दोन प्रकारचे असतें; एक अंतरंगपरीक्षण व दुसरें बहिरगपरीक्षण.