पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/532

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीभगवद्गीतारहस्य. ५१५ म्हणून हातांत रुमाल घेऊन तें द्रव्य घ्यावयाचे म्हणजे सॉवळेपणाचा रिकामा व फाजील डौल मारणें होय. रांडांचा धंदा अनितीचा आहे हें कोणीही नाकबूल करणार नाहीं; पण सदर धंदा करणाच्यास इतर नागरिकांप्रमाणेच आपल्या पैशाचा सद्वय करण्याचा कायदशीर हक्क असते, हें विसरता कामा नये. दारू पेिणारा गृहस्थ उद्यां जर एखाद्या उपयुक्त विषयांवर व्याख्यान देऊं लागला तर ज्याप्रमाणे त्याच्या व्याख्यानास जाण्यास धार्मिक लोकांस हरकत नाहीं, तद्वतच नायकिणीशीं अनीतीचा संबंध न ठेवणाच्या लोकांस तिचे गाणें ऐकण्यास किंवा त्या गाण्याचे उत्पन्न एखाद्या सत्कार्यास घेण्यास आमच्या दृष्टीनें कांहीं हरकत दिसत नाहीं. विलायतॆतील नाटकगृहांत गाणाच्या सर्वच स्रिया सर्वोशीं शुद्ध असतात असें कोण म्हणेल ? पण सुधारलेल्या राष्ट्रांतही जर त्यांची गाणीं सर्वमान्य असतात तर नव्या सुधारलेल्या नीतिशास्राच्या आधारावर-धर्माची बाब सोडून द्या, कारण त्याप्रमाणें मद्यपानही महापातक आहे. सुधारक म्हणविणाच्या आमच्यातील आधुनिक गृहस्थांनीं फाजील सोवळेपणाचा डौल मारावा हें आमच्या मर्त अलाध्य होय. कायदा, नीति आणि व्यवहार यांच्या मर्यादा भिन्न भिन्न आहेत व एखादी गोष्ट यांपैकी एका दृष्टीनें अशास्र असली तर ती दुस-या बाजून नेहमीं तशीच असली पाहिजे, ह्या म्हणण्यांत कांहीं जीव नाहीं. ५ श्रीभगवद्गीतारह्रस्य (गीतारहस्यावर ली. टिळक यांचीं येथील गणेशोत्सवात यंदा जी चार प्रवचनें झालीं त्याचा त्यानीं स्वत: सांगितलेला साराश खाली दिला आहे. ). गीता सांगण्याचे कारण. गीतारहस्यासंबंधीं मी जें प्रवचन केले तें * गीतारहस्य ’ नामक मीं लिहिलल्या नव्या ग्रंथाचा साराश होय. या ग्रथात प्रथम पंधरा सोळा प्रकरणात गीतारहस्याचा शास्त्रीयरीत्या सागोपांग विचार केल्यावर मग या प्रकरणांत गीतेचे जें तात्पर्य निश्चित केलें त्यास अनुसरून गीतेचे मराठी भाषातर जोडलेले आहे. एवढ्या समग्र ग्रथाचा पुरा सारांशही तीन चार प्रवचनात सागणें शक्य नव्हतें. तथापि एकंदर ग्रंथाचे मुख्य धोरण काय असा मला पुष्कळांनीं प्रश्न केला असल्यामुळे तोच विषय प्रवचनासाठीं मी घेतलेला होता. या प्रवचनांनी माझ्या ग्रथांतील मुख्य मुद्दा कळला तरी त्यावरील शंका व त्याची समाधानें कळण्यास मूळ ग्रंथच पाहावा लागेल हें सांगावयास नको. गीतेवर अनेक भाषेत टीका व निरूपणें झालीं असतां तुम्ही गीतेसंबंधानें नवें असें काय सांगणार ? असा पहिल्यानेच प्रश्न निघणे अगदीं साहजिक आहे. या प्रश्नास माझे असे उत्तर (વેસરી, તા. ૧૧-૧-૧૨૧)