पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/531

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ १४ लो० टिळकांचे केसरीतील लेख. अशाच प्रकारचा वाद एकदां उपस्थित झाला होता. येथील शुक्रवार पेठेत तेव्हां चालू असलेल्या प्लेगच्या जुलमी व्यवस्थेचा प्रतिकार कसा करावा याचा विचार करण्याकरितां सार्वजनिक सभेच्या नव्या दिवाणखान्यांत पेठेतील लोकांची सभा भरली होती. शुक्रवार म्हणजे नायकिणींची पेठ, तेव्हां पेठेतील एका घरवाल्या- लंडनच्या प्रदर्शनास जाऊन आलेल्या-नायकिणीस सर्भेत बोलण्याची परवानगी देण्यांत आली. याबद्दल पुढे येथील ‘सुधारक'कारांनी बरेंच लेखणी पाडित्य करून सदर सभेच्या अध्यक्षास दोष दिला. त्या वेळी, नायकिणी झाल्या तरी त्यांस सामान्य नागरिकांचे हक्क असतात कीं नाहीं, म्युनिसिपालिटीत मेंबर म्हणून निवडून जाणारे लोक त्यांची मतें मिळविण्याकरितां त्यांचीं आर्जवें करतात कीं नाहीं, वैगर प्रश्नांची चर्चा होऊन येथील डेक्कन ऐज्युकेशन सोसायटीनें-म्हणजे त्यांत डॉ. भाडारकर चअरमन आहेत अशा संस्थेने-गाण्याचा गुण नसणा-या एका नायकिणार्ने मृत्युपत्रानें ठेविलेले पैसे मध्ये ट्रस्टीचा पडदा ठेवून संस्थेच्या फायद्याकरितां घेतल्याची हकीगत प्रसिद्ध झाली होती. ही हकीगत लक्षांत आणून सुबोधपात्रकेनें वरील वाक्य लिहिलेलें आहे; व त्याचा हेतुही उघड आहे. सामाजिक परिषदेचे दोन अध्यक्ष डॉ. भांडाकर आणि ना. पारख हे या दोन प्रकरणात अशा रीतीनें गुंतलेले असल्यामुळे न्या. चंदावरकर यांचे सध्यांचे वर्तन किती योग्य आहे, हाही एक प्रश्नच आहे. सदाचार म्हणजे काय ? आणि अनीतीचे वर्तन करणाच्या लोकांशीं इतरांनीं किती संबंध ठेवावा हा नीतीच्या आणि धर्माच्या दृष्टीनें मोठा गूढ प्रश्न आहे. आमच्या धर्मशास्रात व्यभिचारापेक्षां किंवा नायकिणीच्या धंद्यापेक्षां सुरापानाचे पातक शतपट अधिक होय असे कंठरवानें सांगितले आहे, व सामान्य लोकांचा समजही असाच आहे. सुधारकांच्या मतें सुरापानापेक्षां नायकिणीचे तेंड पाहणें हें आता अधिक गह्य झाले आहे, आणि सामाजिक परिषदंत मोठ्या गंभीरपणानें नायकिणीच्या नाचाविरुद्ध टाळ्यांच्या गजरांत ठराव मंजूर् होत असतात. गाणे या लोकांस प्रिय नाहीं असें नाही, पण तो धेदा गरतैो बायकांनीं करावा अशी यांची समजूत असल्याचे दिसतें. कसेही असेो; सुधारकांचा हा सॉवळेपणा फाजील होत चालला आहे अशी आमची समजूत होती, व सर फेरोजशहा सारख्यांचीही समजूत निदान कांहीं अंशीं तरी अशाच प्रकारची आहे ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी होय. आपणास सुधारक म्हणवून घेणा-या एकंदर वर्गापैकीं नायकिणीच्या प्रत्यक्ष किंवा परोक्ष संसर्गापासून किती अलिप्त असतील हा एक स्वतंत्र-मुद्दा आहे; पण त्याचा विचार सध्यां करण्याची जरूर नाहीं. स्वत:चे आचरण अंतर्बाह्य शुद्ध असल्यावर सांगितलेल्या प्रकारचा नायकिणीचा संसर्ग कोणासही निंद्य वाटण्याचे कांहीं कारण नाहीं, परमेश्वराला आपलें द्रव्य अर्पण करण्याची जर त्यांस मोकळीक आहे तर एखाद्या चांगल्या कामास त्यांनीं मदत केल्यास सदर संस्थेच्या व्यवस्थापकांनी आपल्या हातास विटाळ होईल