पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/530

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्फुट–सूचना. ५१३ त-हेच्या उद्योगार्ने एक प्रकारचे देशांतील लोकांस राष्ट्रकार्याकरितां झटण्याचे अल्पस्वल्प शिक्षण मिळेल तें निराळेच, पैसाफंडाची कल्पना नामी आहे असें नुसर्ते म्हणत बसण्यात कांहीं हंसील नाहीं; अथवा बरी म्हणून दुसरे कुतर्क काढण्यांतही कांहीं अर्थ नाही, दरमाणशीं दरसाल एक पैसा बिनखची कमिटीच्या तिजेरीत पडला पाहिजे व तो पडण्याचा वर सांगितल्याप्रमाणें लेोकांनीं अवश्य यत्न करावा अशी त्यांस पुन्हा आग्रहाची विनंति करून आजचा लेख संपवितों, ¥स्फुट-सूचना मुंबईस एका श्रीमान् मारवाडी गृहस्थाने आपल्या घरच्या लग्नकार्यासाठी पंधरा हजार रुपये खर्च करून कलकत्त्यांतील गौहरजान नांवाची एक प्रसिद्ध गाणारी नायकीण आणिली होती. ही नायकीण मुंबईस असतां तेथील लेडी नार्थ कोट ऑर्फनेज म्हणजे अनाथबालाश्रम पाहाण्यास गेली व त्यास मदत म्हणून आपल्या एका गाण्याचे उत्पन्न फुकट देण्याचे तिनें कबूल केलें. तेव्हां शेट रतनसिंग मूळजी यांनी मुंबईच्या टाऊन हॉलांत तिचे गाणें सर फेरोझशहा मेथा यांच्या आश्रयाखाली करविलें. तिकिटाचे दर जबर असल्यामुळे गाणें ऐकण्यास श्रीमंत लोकाचीच गर्दी होती. नामदार गोकुळदास पारखासारखे मुंबईच्या सामाजिक परिषदेचे अध्यक्षही हजर होते, आणि खर्चवेंच वजा जाऊन सहा हजार रुपये शिल्लक राहिली ती अनाथाश्रमास देण्यांत आली. खुद्द गौहरजान इर्ने ५०० रु. पदरचे अनाथाश्रमास दिले आणि तिनें अनाथाश्रमास जी ही मदत केली त्याबद्दल सर फेरोझशहा मेथा यांनी लोकांमार्फत तिला तेथल्यातेथेच एक लहानसा नजराणा दिला. ही हकीकत झाल्यावर मुंबईच्या * राजानें ’ नायकिणीच्या गाण्याचा अशा:रीतीनें गौरव करून तिची अनाथाश्रमास मदत घेतली म्हणून न्या. रानडे यांचे सामाजिक सुधारणेचे उपरणें आपल्या अंगावर पडलें, असे समजणार न्या. चेदावरकर यांनीं सदर ऑफैनजच्या व्यवस्थापक मंडळींतून आपले नांव काढून घेतलें, व मुंबईच्या इंडियन * सोशल रिफार्मर 'नें आणि * पत्रिका ? बाईनेंही याबद्दल त्यांची पाठ थोपटली. पण या सॉवळ्या * पत्रिका ' बाईस एवढी गोष्ट कबूल आहे की, गौहरजानसारख्या ** बाईनें आपण होऊन कांहीं पैसे आपल्या मृत्युपत्रांत ठेविले असतां तिच्या पश्चात् ते घेणें हें संस्थेला फंडाची जर फार गरज असेल तर कदाचित् क्षम्य मानतां येईल. ’ सॉवळ्या पत्रिकें'त हे वाक्य कसें आलें याची मीमांसा ‘केसरी' चीं मागचीं फाईलें चाळल्यास वाचकांच्या सहज लक्षांत येईल. मार्गे पुण्यांत

  • (केसरा, ता.१३ आगस्ट १९०७). ۔-------- --