पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/529

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५१२ लो० टिळकांचे केसरीतील लेख. झाला म्हणजे मोठमेोठ्या शहरांतून किंवा खेडेगावांतून दरमाणशीं दरसाल किमान एक पैसा बिनखची वसूल होण्यास कधींच पंचाईत पडणार नाहीं. लोकांच्या अगों उत्साह असून स्वयंसेवक होण्यास मात्र त्यांची तयारी असली पाहिजे; व तशी त्यांची तयारी असल्यास त्यांस जरूर तें साहाय्य पैसाफंडकमिटी कडून मिळण्यास कधीही कसूर होणार नाहीं. दरसाल एक पैसा देण्यास कोणासही अवघड नाहीं हें खरै आहे. पण तेो पैसा बिनखर्ची आपण होऊन कमिटीकडे पाठविण्याची बुद्धि सवाँस नसते. ही बुद्धि ज्याच्या मनांत उसन्न झाली आहे अशा लोकांनीं हैं काम फुरसतीच्या वेळी केले पाहिजे; व अशा त-हेचे लोक जेंपर्यंत पुढे आले नाहींत तो पर्यंत रा. रा. काळे याच्यासारख्या एखाद्या माणसार्ने कळकळीनें धडपड केली तरी दरमहा चारपांचशे रुपयापेक्षां अधिक उसन्न होणे शक्य नाहीं, एवढच आम्हास आमच्या वाचकांस पुनःपुनः सांगावयाचे आहे. वर्तमान पत्राच्या वगैणीदारांनीही वर्गणीबरोबर आपल्या गांवांत गोळा केलेल्या पैसाफंडाची रक्कम वर्तमानपत्रकाराकडे पाठविल्यास तीही बिनखर्च पैसाफंडास मिळेल. पैसाफंड गोळा करणे हा राष्ट्रीय कार्याकरितां कळकळीनें काम करणारांचा एक लहानसा धडाच आहे. हा जर आमच्या लोकांच्या विशेषत: करून तरुण पिढीच्या हातून नीट वठला नाहीं तर यापेक्षां अवघड कार्मे पार पाडण्यास आम्ही नालायक आहाँ असें कोणीं म्हटल्यास त्यास कांहीं जबाब देतां यावयाचा नाहीं. यासाठीं विद्यार्थी, पेन्शनर, रामदासीं पंथाचे लोक, फुरसत असणारे सरकारी नोकर, वकील वगैरे सर्व लोकांस आमची अशी सूचना आहे कीं, त्यांनीं आपला अल्प तरी वेळ या कार्यात घालून राष्ट्रीयफंड उभारण्याचे श्रेय संपादन करावें. जिल्ह्या जिल्ह्यांतून निरनिराळा पैसाफंड काढून तुकडे तुकडे करण्यांत कांहीं हंसील नाहीं. पैसाफंडाची वर्गणी फारच थोडी आहे; आणि ती सर्व एका ठिकाणीं गोळा झाल्याखेरीज सर्वोस उपयुक्त असें कोणतेही कार्य होणें अशक्य आहे. तालुकानिहाय किंवा जिल्हानिहाय स्थानिक कामें करण्यास पैसा पाहिजे असल्यास त्याकरितां निराळी वगैणी करा; पण त्यामुळे सार्वत्रिक पैसाफंडास व्यत्यय आणू नका. खुद्द सरकारचीही व्यवस्था याच प्रकारची असते. सामान्य कर हिंदुस्थानच्या तिजोरीत जमा होऊन स्थानिक कारणासाठीं लोकल फंडासारखे कर बसविले जातात. पैसाफेडाची गोष्ट अशीच आहे. सर्व प्रांतांकरितां किंवा इलाख्याकरितां हा फंड आहे, व त्याचा बोजा इतका स्वल्प आहे कीं, त्यामुळे कोणताही स्थानिक फंड गोळा होण्यास हरकत येणारी नाहीं. मग विनाकारण स्थानिक फंडाची सबब सांगून स्थानिकही नाहीं व सामान्य फंडही नाहीं असें करण्यांत कांहीं हंसील नाहीं. सर्व जिल्ह्यांतील लोकांनीं एकदिलानें याकरितां झटले पाहिजे; आणि सर्व लोक याप्रमाणें झटून उद्योग करतील तर प्रारंभीं सागितलेल्या अंकगणिती हिशेबास सोळा आणे नाहीं तरी किमानपक्षीं आठआणे तरी दृश्य स्वरूप आल्यावांचून राहणार नाहीं. शिवाय अशा