पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/528

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पैसा-फेड. ५११ स्थिति आहे. दर गांवांत धर्मखात्याकडून पगार भिळत असणारे पाद्री लोक दर आदितवारीं देवळांत टोपी फिरवून जी वर्गणी जमते ती बिनखर्ची मिशनरी फंडाकडे पाठवून देतात. पंजाबात आर्यसमाजाचे मिशनरी ' आटा फंड ’ ही याचप्रमाणें बिनखची गोळा करतात. थबार्थेबानें तळे साचर्त हें खरै, पण थेब तळ्यांत येऊन पडेल तेव्हां, हे पूर्ण लक्षांत ठेविले पाहिजे. पैसाफंडाच्या संबंधानें ही गोष्ट अद्याप आमच्या लोकाच्या लक्षात आलली नाहीं. पाटील, कुलकर्णी, शाळामास्तर वगैरे सरकारचे जे खेड्यानिहाय कामगार आहेत त्यास फावल्या वेळीं हें काम फुकट करता येईल. पण सरकारी कामगार म्हणून यास सोडून दिले तरी ठिकठिकाणचे सावकार, इनामदार, पेन्शनर किंवा इतर सुखवस्तु लोक, विद्यार्थी आणि रामदासी पंथासारख्या पंथाचे उपदेशक यांस हा उद्योग सहज करता येण्यासारखा आहे. मुंबई, पुणे येथे जे हजारों विद्यार्थी शिकत आहेत त्यानी सुटीच्या दिवसात हा उद्योग केल्यास पैसाफंडाचे उत्पन्न हल्लीं होत आहे त्या पेक्षा निदान दहापट तरी वाढण्यास हरकत नाहीं. प्रत्येक विद्याथ्र्यानें संकल्प मात्र केला पाहिजे की, आपण आपल्या गावची, चाळीची, वाडीची, आळीची किंवा पेठेची वर्षीतून दोन दिवस मोडून कांहीतरी वर्गणी गोळा करू आणि ती पैसाफडाच्या कमिटीकडे बिनखर्ची पाठवू. पैसाफंडास लोकाचे जे साहाय्य पाहिजे ते हेच होय. पैसाफंडाची पुष्कळ शिल्लक का होत नाहीं, पैसे शिल्लक कोणत्या ब्याकेत ठेवतात, त्याचे पुढे काय होणार अशा शुष्क कोट्या शिळेोप्याच्या वेळीं करीत बसण्यात अर्थ नाहीं. पैसा फंडाची सर्व जमा योग्य ठिकाणीं कायदशोर रीतीने व्याजानें ठेवण्याची सर्व व्यवस्था झाला आहे; आणि पैसा फंडाची दहाहजार रुपये रक्कम गोळा झाली म्हणजे आगकाङया, पेन्सली, साबण, कुलप, ब्रश, तेले, बटणे, मेणबत्त्या, तंबाखूचे पदार्थ, वगैरे लहानसहान धंदे येथे क्रमाक्रमाने शिकविण्याची तजवीज करावयाची असून त्याबद्दल प्रो. गजर याच्या रसायनशाळेस जेोडून काहीं व्यवस्था करण्याचा विचार चालू आहे. पैसाफंड वाया जाणार नाहीं, याबद्दल जितकी खबरदारी घ्यावयास पाहिजे तितकी घेतलेली आहे; इतकेंच नव्हे तर या फंडातून बारिक सारिक शेतकीचे व औद्येोगेिक धेदे कोणते शिकविता येतलि याचाही विचार झालेला आहे याबद्दल कोणास शंका असल्यास त्यानें पैसाफंडाचे अध्यक्ष डॉ. देशमूख यास भेटून आपली खात्री करून घ्यावी. उगीच कुतर्क किंवा कुशंका काढून चागल्या उद्योगास आड येऊं नये. पैसाफंड जर यशस्वी झाला नाहीं तर त्याचा सर्व दोष आमच्या लोकाच्या माथीं येणार आहे हें सर्वानीं लक्षात ठेविले पाहिजे. वर्षांतून २ । ३ दिवस या कामाकरता खर्च करण्याइतकी सवड शहरातून व खङयातून हजारो लोकास आहे, नाही असे नाहीं; त्यानीं उद्येाग करण्याचे मनात आणले म्हणजे झाले. अशा त-हेचा उद्येाग सुरूं ६४