पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/526

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पैसा-फंड. ५०९ ¥पैसा-फंड गेल्या महिन्याच्या दहावे तारखेस मुंबई पैसा-फंडाचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध करण्याकरिता ना. दाजी आबाजी खर यांच्या अध्यक्षतेखालीं जावजी बिलिंडगमध्यॆ जी जाहीर सभा भरली तिची हकीकत त्या वेळीं केसरींत प्रसिद्ध झालीच आहे. हा वार्षिक रिपोर्ट छापला असून त्याच्या प्रती पैसा-फंडाचे सेक्रेटरी रा. रा. शंकर दामोदर बापट अथवा अंताजी दामोदर काळे,गिरगाव,याच्याकडे मागितल्यास मिळतील. पैसा-फडाचा हा पहिला वार्षिक समारंभ होय. पहिला असें म्हणण्याचे कारण १९०५ च्या आक्टेबर महिन्याच्या सोळाव्या तारखेस पैसाफंड ही संस्था १८६०च्या २१ व्या अॅक्टाप्रमाणें रजिस्टर करण्यांत आली. त्या वेळी पैसाफंडाची शिल्लक एकंदर २ १५९ रु. होती, सप्टेबर १९०६ अखेर ७५२२ रुपये झालेली आहे. म्हणजे एक वर्षात खर्च वजा जाता सुमारे पांच साडेपाच हजार रुपये गोळा झालेले आहेत. सप्टेंबर १९०६ नंतर जानेवारी १९०७ अखेर म्हणजे चार महिन्यातली फंडाची जमा १८६९ रुपये आहे; व आजमितीस एकंदर जमा जवळजवळ दहाहजार रुपये आहे. दहाहजार रुपये जमा झाले म्हणजे या फडाचा विनियोग लोकास औद्योगिक शिक्षण देण्याच्या कामी करावयाचा आहे. व या फंडास कायदेशीर व्यवस्थित स्वरूप देऊन त्याबद्दल पैसाफंडाची मुंबई येथील कमिटी तजवीज करीत आहे. एक वर्षाचा याप्रमाणे अनुभव आहे. हा अनुभव मोठासा उत्साहजनक नाहीं हे खरें आहे. दर माणशी दरसाल किमानपक्षी एक पैसा या मानाने दहा लक्ष वस्तीच्या मुंबई शहरात दरसाल पंधरा साडेपंधरा हजार गोळा झाले पाहिजेत. मुंबईच्या बाहर दरएक जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ८ ॥ १० लाखच असते; व पैसाफडाचा जारीने वसूल झाल्यास दर जिल्ह्यात दहा पंधरा हजार रुपये दरसाल गोळे झाले पाहिजेत. परतु एक सालचा किंवा सोळा महिन्याचा हिशोब पाहाता सरासरीनं दरमहा सुमारे ४५० रु, पेक्षां जास्त वसूल आलेला नाही. माणशीं पैसा या प्रमाणाने लोकसंख्येवरून केलेला अंकगणिती हिशेब आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिति यांच्यामध्ये एवढे मोठे अंतर का पडाव, याचा कमिटीनें व विशेषत: लोकांनीं अवश्य विचार केला पाहिजे; व तसा विचार व्हावा म्हणूनच आजचा लेख आम्ही मुद्दाम लिहित आहों. पैसा-फंडाची कल्पना काहीं नवी नाही; आणि खानेसुमारीचा रिपोर्ट हातात घेऊन दर माणशीं एक पैसा याप्रमाणे अमुक लोकसंख्येकडून दरसाल किती रुपये वसूल होतील हा हिशेब करणेही कठीण नाही. पैसाफंडास पुरे यश येण्यास या अंकगणिती विद्येपेक्षां अधिक जेोमाची, अधिक शिस्तीची, अधिक कळकळीची आणि स्वार्थत्यागाची जरूर आहे. पहिल्यापहिल्यानें कित्येकाची तर अशी समजूत होती (केसरी, ता. १९ मार्च १९०७.)