पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/525

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Կ, o «: लो० टिळकांचे केसरींतील लेख. णार्ने हृत्तीचा दृष्टात घेऊन जे उद्गार काढले आहेत ते फार मार्मिक आहेत. रानटी हत्तीला हस्तगत करण्यास जसे माणसाळलेल इती उपयेोगी पडतात तद्वत् रावण व बिभीषण याचा प्रकार झाला असें खुद्द रावणानच म्हटले आहे; आणि अशा प्रसंगी हत्तींनी आपल्या जातीसंबंधार्ने जे उद्गार काढले तेच त्याच्या मुखातून निघाले आहेत, तेो म्हणतेो: नाग्निनान्यानि शस्त्राणि न नः पाशा भयावहा: घोरा : स्वार्थप्रयुक्तास्तु ज्ञातयो नो भयावहाः । बिभीषणाच्या कृत्याची ही मीमासा ऐतिहासिकदृष्टया अगदी बरोबर आहे. ती रामभक्त असल्यामुळे रामास मिळून चिरजिवी झाला, ही त्याच्या कृत्याची मीमांसा त्याच्या वर्तनापासून ज्यास फायदा झाला त्या रावणास जिंकणाच्या पक्षाची आहे; व ती तशीच असावयाची, संस्कृतातही राजनीतीवर जे ग्रंथ आहेत त्यात बिभीषणचरित्र हें एक भेदाचेच उदाहरण सागितलें आहे. रा. ब. वैद्य याच्या कल्पनेनें वानराची राक्षसाइतकी चागली उपपति लागत नाही. तथापि त्यांनीं सागितल्याप्रमाणें राक्षस दंडकारण्यात येण्यापूर्वी वानर हे तेथील मूळचे रहिवाशी असावे व त्यास हातीं धरून रामचंद्रानीं आपला कार्यभाग करून घेतला, असें मानण्यास हरकत नाहीं. वानराचे साहाय्य मिळण्यास वालीचा वध केला, तो नीतिदृष्टया योग्य कीं अयोग्य याची विशेष चर्चा •करण्याचे कारण नव्हतें. सुधारणेचा प्रसार करण्याच्या निमित्ताने याहूनही भयंकर गोष्टी आज पृथ्वीवर घडत आहेत, एवढ लक्षात ठेवलें म्हणजे बरुस आहे. असो; यासबंधाने लिहावें तितकें थोडेंच आहे. रा. ब. वैद्य यांच्या नव्या ग्रंथातील विचार थोडक्यात वाचकास कळवून अशा रीतीचा रामायणावर चर्चाविषयक ग्रंथ त्यांनी लिहिला याबद्दल त्याचे अभिनंदन करावे, एवढाच आजच्या लेखाचा उद्देश होता. पूर्वी वैद्य यांच्या भारतावरील ग्रथाचे परीक्षण करताना आम्ही लिहिलेच आहे कीं, रामायण-भारतादि ग्रंथाचे अशा रीतीनें परीक्षण करण्याचे काम आमच्यामधील सुशिक्षित लोकानीं युरोपियन विद्वानाच्या हातून आता काढून घेतलें पाहिजे. रा. ब. वैद्य याच्या हल्लींच्या वाचनार्ने आमचे हें मत दृढ झाले आहे; व रामायण-भारताचा अभ्यास करणारांनी हा ग्रंथ वाचावा, इतर्केच नव्हे तर या पद्धतीवर विचार करण्यास शिकावें अशी त्यास शिफारस करून व पुन्हा एकवार रा. ब. वैद्य याचे अभिनंदन करून हा लेख संपवितों.