पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/524

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायण हा इतिहास का गप्पा ? A০৩ गोष्ट म्हटली म्हणजे ही कीं, अशा प्रकारचीं नांवें मेक्सिकोच्या प्राचीन इतिहासांत आढळतात. * सालकटकटा ’ या नांवाशीं वर्णत: साम्य असणारें मेक्सिकोमधील नांव सीकोटेंकटल हें होय. या वर्णसादृश्यावरून लंकेंतील राक्षस मेक्सिकोतील राक्षसाचेच जातभाई होते असें मि. वैद्य यांनी अनुमान केले आहे. नरमांसभक्षणाची चाल दोघांहो जातींत होती हें तर उघड आहे. पण भाषसंबंधानें या दोघाचे नाते दाखविण्यास सालकटकटा या शब्दापेक्षां जास्त पुरावा रा. ब. वैद्य यांनी दिला नाही. त्याच्या मर्त रावण, बिभीषण, विद्युत्केश हीं राक्षसांचीं नावें राक्षसी भाषेतील नसून त्याच्या गुणांवरून आर्य लेोकानों ही नांवें त्यांस दिलीं असावीं. ग्रीक लोक जेव्हां हिंदुस्थानांत आले तेव्हां आमच्या देवतांचीं नावें त्यांनीं अशाच प्रकारे फिरविल्याचे त्यानीं लिहिलेल्या इतिहासावरून स्पष्ट होत आहे. उदाहरणार्थ, श्रीकृष्णास त्यानीं हक्र्युलस बनविले आहे. राक्षसांचीं नांवें अशाच प्रकारें वाल्मिकी आदि ऋषींनीं बनविलीं असावीं असे मानण्यास हरकत नाहीं. तथापि आम्हांस असें वाटतें कीं, रावण, बिभीषण वगैरे शब्द मूळ या राक्षसी भाषेतील शब्दाचीं संस्कृत भाषांतरें असावीत. मेक्सिको लोकांच्या प्राचीन भार्षत * क्वटसालकटल ? म्हणजे प्रकाशणारा सर्प अथवा रेचदेही आणि कर्जवश अथवा गरुडावास अशा प्रकारचीं जीं नार्वे आहेत त्यांच्या अर्थीवरून आमच्या म्हणण्यास बळकटी येते. आमचे असेंही मत आहे कीं, लंका हा शब्दही प्रायः राक्षसी भाषेतला असावा; व वर सागितलेल्या सिक-लंक लोकांच्या नांवावरून या कल्पनेस आधार मिळतो. आतां एवढी गोष्ट खरी कीं, सालकटकंटा किंवा लंका या दोन शब्दांचे जुन्या मेक्सिको भाषेतील शब्दाशीं जें साम्य आहे त्यापेक्षां भाषाविषयक अधिक पुरावा सध्यां उपलब्ध नाहीं, व कदाचित् मिळणेही शक्य नाहीं. तथापि, नरमांसाशन आणि नरमेध या दोन क्रूर चालीसंबंधाने वर जें साम्य सागितले आहे तेवढ्यावरूनच लंकंतील राक्षस हे मेक्सिको येथील प्राचीन राक्षसाचे भाऊबद असावे असें सध्या अनुमान करण्यास आम्हास हरकत दिसत नाहीं; व रा. ब. वैद्य यांनी हें साम्य प्रथमत: लोकांपुढे मांडून रामायणातील गोष्टी इतिहासपर आहेत असें मानण्यास आधार दाखविला याबद्दल त्याचे आम्ही अभिनंदन करतों. रावणाचा जेो पराभव झाला त्यास रामचंद्राचा पराक्रम हें तर कारण खरेंच, पण त्याहून भिन्न दुसरीही दोन कारणें होती, असें जें रा, ब. वैद्य यांचे म्हणणें आहे तेंही आमच्यामतें यथार्थ आहे. सुधारणेत कमीजास्ती सरसावलेल दोन जातींचे लोक जेव्हां एकत्र येतात तेव्हां कमी सुधारलेल्या लोकांत असलेली फूट आणि शस्रास्राबद्दलचे अज्ञान हींच त्यांच्या नाशास कारण होतात अशी आधुनिक इतिहास हीच साक्ष देत आहे. राम आणि रावण यांच्यामधील संग्राम भयंकर खरा; पण धनुर्विद्येत रामचंद्र जर राक्षसांपेक्षां अधिक निष्णात नसते व बिभीषणानें जर घरभेदीपणा केला नसता, तर रावणाचे राज्य लयास गेले असतें कीं नाहीं याची शंकाच आहे. बिभीषण फुटला हें कळल्यानंतर राव