पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/523

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ખ ૦ ૬ ली० टिळकांचे केसरींतील लेख. कुंभकर्णाची झॉप, सीतेची जमिनीपासून उत्पात वगैरे अद्भुत गोष्टींचा यानें खुलासा होत नाहीं हें खरें; पण इतर दृष्टीनें पाहिले तर मेक्सिको देशांत स्पॅनिश लोकांनीं तीन चार शतकापूर्वी जे पराक्रम केले त्यांत आणि रामायणांतील कथेत रा. ब. वैद्य यांनी दाखावलेले साम्य पुष्कळ अंशीं यथार्थ आहे असें त्यांचा ग्रंथ वाचल्वावर आमच्याप्रमाणें दुस-या कोणासही वाटल्याखेरीज राहणार नाहीं. परंतु साम्य किंवा उपमा हा कांहीं ऐतिहासिक पुराव्याचा मार्ग नव्हे असा एक आक्षेप या कल्पनेबर येण्याचा संभव आहे. सकृद्दर्शनीं हा आक्षेप योग्य वाटतो. पण जरा विचार केला तर असल्या बाबतींत या आक्षपास फारसें महत्त्व देतां येत नाही असेंच म्हणावें लागतें. हजारों वर्षापूर्वीच्या मानव जातीचा इतिहास समजण्यास आजपर्यंत भारत--रामायणादि ग्रंथ किंवा पुराणें यांखेरीज दुसरें काहींच साधन नव्हत. भारत आणि रामायण हे इतिहास ग्रंथ आहेत. अशी आमची फार प्राचीन काळापासून समजूत आहे, व आतां एवढेच पाहाणें आहे कीं, नवीन शोधानें ही समजूत कितपत खरी ठरते अशा दृष्टीनें विचार केला म्हणजे रा. ब. वैद्य यांची वर सागितलेली कल्पना कोणासही असंभवनीय वाटणार नाहीं. आर्य लोक पंजाबाकडून हिंदुस्थानांत येऊन उत्तर हिंदुस्थानांत त्याच्या वसाहती पूर्णपणें स्थापन झाल्यावर मग ते इळुहळू दक्षिणेंत शिरले, ही ऐतिहासिक गोष्ट आतां बहुतेक सर्वमान्य झालेली आहे. ही गोष्ट निदान उत्तर हिंदुस्थानांत आर्य लोक पहिल्यानें असून नंतर दक्षिणेत आले एवढे कबूल केलें म्हणजे दक्षिणेत जे त्या वेळीं कोणी रानटी लोक असतील त्याचा त्यांनीं पराभव करून तेथे आयाँचे राज्य स्थापिलें असावें असे मानणें भाग येतें. प्रश्न एवढाच राहिला की, त्या वेळचे हे दक्षिणेतील लोक कोणत्या प्रकारच्या मनुष्यजातीचे असावेत ? या प्रश्नाचा मेक्सिकोचा हल्लीं उपलब्ध झालेला प्राचीन इतिहास आणि रामायणांतील इतिहास यांतील साम्यावरून करता येतो. मेक्सिको आणि पेरू या देशातील प्राचीन लोकांप्रमाणें फार पुरातनकाली पॅसिफिक महासागरातील बेटांतही नरमांसभक्षक व नरमेध करणाच्या लोकांचीं मीठीं राज्ये असलीं पाहिजेत असे हल्लीं उपलब्ध झालेल्या माहितीवरून दिसून येतें; व रामचंद्र अयेोध्येहून निघून वनवासार्थ जेव्हां दाक्षणेत आले तेव्हां तेथे अशाच प्रकारचे लोक होते असें रामायणात वर्णन आहे. या दोहोंचा मेळ घातला म्हणजे राक्षसांची जात ही एक प्राचीन मनुष्य जातीपैकींच जात होती असे दिसून येतें; व रामायणाच्या उत्तरकांडांत राक्षसांची जी उपपत्ती सागितली आहे तीही अशाच प्रकारची आहे. सालकटेकटा या नांवाच्या राक्षसीशीं विद्युत्केशाचा विवाह होऊन त्यापासून सुकेश, सुकेशापासून सुमाली, सुमालीपासून कैकसी आणि कैकसीपासून रावण अशी परंपरा तेथे दिली आहे. यांतील * सालकटकटा ’ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. हा शब्द संस्कृत भाषॆतला नाहीं असें त्यांतील वर्णनावरूनच उघड होतें. परंतु याहीपेक्षां विशेष महत्त्वाची