पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/522

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायण हा इतिहास का गप्पा ? ادا o ھا आमचे मत आहे; व ती या पुस्तकांत आला नसता तरीही बरें झालें असतें असें आम्हांस वाटतें. परंतु यानें बाकीच्या ग्रंथाची योग्यता कमी होते असें नाहीं. रा. ब. वैद्य याच्या हल्लींच्या ग्रंथांतील विशिष्ट कल्पना म्हटली म्हणजे ही होय कीं, लंका, लंकंतील राक्षस, त्याचा अधिपति रावण, आणि त्यानें सीताहरण केल्यामुळे त्याचा रामचंद्रानीं केलेला वध या गोष्टीं कांहीं काल्पनिक नाहीत. त्यास इतिहासाचा आधार आहे आणि मेक्सिकोमधील नरमेध करणारा शेवटचा राजा मॅटेिझूमा याचा स्पेन देशातील केोर्टझ नावाच्या वीर पुरुषानें कसा फडशा पाडला याची प्रेस्काटसाहेबांनी दिलेली हकीकत जर वाचली तर रामचंद्रांनीं रावणाचा उच्छेद करून अति प्राचीनकालीं भरतभूमींतून नरमास भक्षण करणाच्या लोकास अशाच रीतीनें घालवून देऊन ही घोर चाल या देशांतून अजिबात काढून टाकली असावी, असें कोणाच्याही सहज मनांत येतै. रा. ब. वैद्य याच्या सध्यांच्या ग्रंथांतील उत्तर भाग बहुतेक याच धोरणाने लिहिलेला आहे. त्याचे असें म्हणणे आहे कीं, रावणाच्या ठिकाणीं मॉटेझूमा, बिभीषणाच्या ठिकाणीं इस्टलीलाचतल आणि रामाच्या ठिकाणीं काटेंझ हीं नार्वे घातलीं तर रामायणांतील गोष्टी मेक्सिको देशांत स्पॅनिश लोकांनी केल्या असें आपणास आढळून येईल. युरोपातून स्पॅनिश किंवा इंग्लिश यांनीं अमेरिकेंत जाऊन ज्याप्रमाणे तेथील नरमांस खाणाच्या व नरमेध करणाच्या लोकाचा उच्छेद केला त्याप्रमाणेच आर्यलोक उत्तर हिंदुस्थानात येऊन राहिल्यानंतर त्यांच्यापैकीं प्रथमतः अगस्त्यादि ब्राह्मण आणि तदनंतर रामचंद्रादि क्षत्रिय राजे यांनीं विंध्याद्रीच्या दक्षिणेस येऊन दंडकारण्य व लंका येथे त्या वेळीं राज्य करीत असणा-या नरमांसभक्षक राक्षसी लोकाचा विध्वंस केला आणि भरतभूमीस या पापी आणि क्रूर चालीपासून कायमचे मुक्त केले असें रा. ब. वैद्य याचे म्हणणे आहे. रामचंद्राचा खरा पराक्रम काय तो हाच कीं, त्याने नरमांस भक्षण करणारे, दुष्ट व क्रूर लोक आपल्या सामथ्र्यानें हिंदुस्थानच्या आसपासच्या प्रदेशातून काढून टाकले. हे लोक प्राय: मेक्सिकोमधील प्राचीन लोकाच्या जातीचेच असावेत आणि त्यांच्याप्रमाणेच मोठमोठी शहरें बाधण्याइतके ते सुधारलेलेही होते असें रा. ब. वैद्य याचे म्हणणे आहे. पण हे लोक कितीही कुशल व बलाढ्य असले तरी नरमासभक्षक लोकांचा नायनाट करणे हें वैदिकधर्मी लोकांचे पवित्र कर्तव्य होतें; आणि ती कामगिरी रामचंद्रानीं आपल्या पराक्रमाने बजाविली हेच त्याची कीर्ति अजरामर होण्याचे खरें कारण होय. रामायणात कांहीं ठिकाणीं राक्षसांची काल्पनिक वर्णने आहेत; व मारुतीनें समुद्रउड्डाण केलें अशा प्रकारच्या दैविक व अद्भुत गोष्टींचाही उल्लेख आहे. पण यातील अद्भुत व अतिशयोक्तीचा भाग प्राचीन नसून रामायणांत तो पुढे घालण्यात आला असावा असें रा. ब. वैद्य याचे मत आहे; आणि हा भाग बाजूला ठेविला तर एकंदर रामायणांतील कथा खरी व ऐतिहासिक आहे असा त्यांच्या ग्रंथांतील मुख्य मुद्दा आहे. रावणाचीं दहा तोंडें