प्रवास करून बेहरिंगच्या सामुद्रधुनीच्याद्वारे आशियांत येऊन व कांहीं दिवस इजिप्तमध्ये राहून पॅलेस्टाईनमध्ये गेल्याचे वर्णन आहे ! मेक्सिकोमधील प्राचीन लोक मोठमोठ्या इमारती बाधण्याच्या काम जरी कुशल होते तरी देवतेस मनु- घ्याचा बळी देणे किंवा प्रसंगविशेषीं नरमांस भक्षण करणे या राक्षसी चाली त्यांच्यामध्ये प्रचलित होत्या व भोसेसचा देव जो जिहोवा ( यव्ह ) हाही याच वर्गातला होता असे त्याच्या वर्णनावरून दिसते, यावरून आणि भाषासाम्यावरून यहुदी लोक हे मूळचे मेक्सिकोमधील प्राचीन मानव जातीच्या वर्गापैकींच असावे व त्यामुळेच मेक्सिकोमधील नव्हतील भाषेमधील जुन्या कथा आणि बायबलांतील कथा यामध्ये साम्य आहे असें आता कित्येकांचे म्हणणे आहे. हैं म्हणणें साधार असो वा नसो एवढी गोष्ट निर्विवाद आहे कीं, उत्तर अमेरिकेत मेक्सिको प्रांतात फार प्राचीन काळीं नरमास खाणारे व नरमेध करणारे, सूर्योपासक, शरिरानें मज- बूत व उंच बांध्याचे बलाढ्य लोक राज्य करीत असून त्यानीं त्या वेळी तेथे मोठ- मोठी शहरे बाधली होती. हे लोक ख्रिस्ती शकापूर्वी तेथे होते, एवढे स्पष्ट आहे. पण ख्रिस्ती शकापूर्वीचा पक्का काल समजत नाही. स्पेन देशातील लोक अमे- रिकेत गेले तेव्हा याच्याच जातीचे ' ॲस्टेक' नांवाचे लोक तेथे राज्य करीत होते. पण त्याच्या नरमेधाच्या रानटी चाली पाहून स्पेन देशातील योद्धा कोर्टेंस यास त्वेष आला आणि त्याने ' ॲस्टेक' लोकाचा पूर्ण उच्छेद करून त्याची शहरे, गावें व इमारती सर्व जमिनदोस्त केल्या आणि मेक्सिको देशात स्पेनच्या ख्रिस्ती राज्याची स्थापना केली. हल्ली मेक्सिको देश स्वतंत्र झाला आहे, तरी तेथील राज्य ख्रिस्ती धर्माचेच आहे.
वरील हकीकत आज सागण्याचे कारण असें कीं, रा. ब. चिंतामण विनायक वैद्य यांनी नुकतेच ' रामायणाचे गूढ' म्हणून जे रामायणावर एक पुस्तक लिहिले आहे त्यात याचा उपयोग केला आहे. रा. ब. वैद्य यानी महाभारतावर जे पुस्तक केले आहे त्याचे परीक्षण मागे केसरीत आलेच आहे. 'रामायणाचे गूढ' हें सध्यांचे पुस्तक त्याच मासल्याचे आहे. याचे दोन भाग आहेत. एकात रामा- यणाच्या ग्रंथरचनेचा विचार केला असून वाल्मिकी रामायण वेळोवेळी कसें वाढत गेले, व तुळशीदासापर्यंत त्यात अधिकाधिक अद्भुत गोष्टींचा संग्रह कसा होत गेला याचे विवेचन केले आहे. हें विवेचन मार्मिक आहे; आणि काहीं किरकोळ बाबतींत जरी मतभेद होणे शक्य असले तरी सामान्यतः रा. ब. वैद्य यांचा सिद्धांत सर्वमान्य होण्यास आमच्यामतें कांहीं हरकत नाही. मूळ वाल्मिकी रामायण महाभारताच्या पूर्वीचे असून त्यांत पुढे कालाने काही फेरफार झाले असावे व त्यामुळेच बुद्धाबद्दलचे श्लोक त्यांत आले असावे असें जें रा. ब. वैद्य यांचे म्हणणें आहे तें आमच्या मर्ते सयुक्तिक आहे. परंतु हल्लींच्या ग्रंथांत विशेष महत्त्वाचा भाग म्हणजे दुसरा होय. यांत सुरासुरांचा सुरेश म्हणजे दारूशी जो संबंध दाखविला आहे तो पुराणात दिला असला तरी काल्पनिक आहे असे
पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/521
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०४
लो० टिळकांचे केसरीतील लेख.