पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/520

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायण हा इतिहास का गप्पा ? ખ ૦રે जातीची हित करण्याची समजूत खरी असेो वा खोटी असेो; एवढी गोष्ट आतां सिद्ध झाली आहे कीं, कोलंबसानें अमेरिका शोधून काढल्यानंतर स्पेनच्या लोकांनीं उत्तर अमेरिकेंतील मेक्सिको प्रांतांत ज्या लोकांचा नायनाट केला ते सुधारणेच्या कामांत अगदीं मागासलेले होते असें नाहीं. मेक्सिको प्रांतांत आजमितीस ज्या कांही जुन्या इमारती किंवा मनेोरे शिल्लक आहेत त्यावरून हा देश इजिप्त देशाप्रमाणे पूर्वी बराच भरभराटींत होता आणि त्या वेळचे लोक इजिप्त देशांतील पिरामिडप्रमाणें मोठमेोठ्या इमारती किवा कृत्रिम डोंगर बांधण्याच्या कामीं कुशल होते असें स्पष्ट सिद्ध होतें. मेक्सिको आणि पेरू या अमेरिकेंतील दोन देशांचा अशा रीतीनें उपलब्ध होत असलेला प्राचीन इतिहास फार महत्त्वाचा आहे. आशियाखेडात युक्रेतीस नदीच्या काठीं खिस्ती शकापूर्वी सुमारे पांच सहा हजार वर्षे मोठमोठी बलाढ्य साम्राज्यें होतीं असें त्या प्रांतात हल्लीं उपलब्ध झालेल्या जुन्या इमारतींच्या किंवा त्यांतून खणून काढलेल्या (ताम्रपटाप्रमाणें खोदलेल्या) विटांच्या साहाय्यार्ने जसे आता निर्विवाद सिद्ध झाले आहे व त्यामुळे यहुदी धर्माच्या पूर्व पीठिकेस व्यवस्थित रूप आले आहे, त्याप्रमाणेच अमेरिकेंतील मेक्सिको व पेरू या देशाच्या प्राचीन इतिहासासंबंधीं जे शोध झाले आहेत त्याचाही प्राचीन इतिहासावर परिणाम होण्यासारखा आहे. या शोधावरून एवढी गोष्ट निर्विवाद आहे की, पुरातनकालीं मेक्सिको देशांत किंवा त्याच्या उत्तरस एका जातीचे बलाढ्य लोक राज्य करीत होते. हे लोक इजिप्त देशातील पिरामिडप्रमाणें मोठमोठे मनेोरे बाधण्याच्या कामी कुशल हेोते, व त्याचीं शहरें ज्या ठिकाणीं होतीं त्या ठिकाणीं खणले असता अद्याप नक्षीचीं मातीचीं भांडीं वगैरे जिन्नस कधी कधी सापडतात. या प्रातातील हे प्राचीन लोक शरीरानें धिप्पाड, राक्षसी बांध्याचे, ताबूस वर्णाचे आणि शिकार करून उपजीविका करणारे असे होते. त्यास * क्वायनम ’ म्हणत. त्याच्या पाठीमागून * सिकलंक,'* उल्मक ’, ‘मय ’, ‘ ओतोमी ’, ‘सापेोटेक,’ ‘ तोलटेक ' वगैरे जाती एका पाठीमागून एक उत्तरेकडून मेक्सिको देशांत येऊन राज्य करूं लागल्या. या सर्वोस * नव्ह ? असें सामान्य ज्ञातिवाचक नांव होते. त्यांच्या भाषेस * नव्हतल ? म्हणत असून त्या भाषेत चित्रलिपीच्याद्वारें लिहिलेले जे कांहीं पुराणग्रंथ आहेत त्यांत प्रलयकालाच्या व त्यानंतर मनुष्याची वस्ती कशी झाली वगैरे सबंधाच्या जुन्या कथा आहेत. या कथा आणि बायबलांतील नोव्हाच्या कथंत बरेच साम्य असल्यामुळे केव्हां तरी खिस्ती लोकांचा सहवास झाल्यानेतर या कथा लिहिल्या असाव्या असा पहिल्या खिस्ती इतिहासकारांचा समज झाला होता. पण आता कांही ग्रंथकार उलट असे प्रतिपादन करूं लागले आहेत कीं, मोसेसचे चाळीस वर्षाचे जें निर्याण बायबलांत वर्णन केले आहे ते केवळ इजिप्त देशांतून पालेस्टाईनमध्ये झाले नसून मेक्सिके येथील लोकानी चाळीस वर्षे ६ ३