पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/519

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५०२ लो० टिळकांचे केसरीतील लेख. त्याचप्रमाणे कळकळीनें उद्योग करण्यास आरंभ केला तर गेल्या ऐशीं वर्षात झाली आहे त्यापेक्षां मराठी भाषेची आभवृद्धि अधिक होईल अशी आम्हांस खात्री आहे. या वाढीस मयादा आहे ही गोष्ट खरी. पण या मर्यादेपर्यंतही आम्ही अजून पोचली नाहीं; मग ती ओलांडून पलीकडे जाण्याची गोष्ट कशाला ? युनिव्हर्सिटींत अमक्या एका परीक्षस ज्ञानेश्वरी ठेवल्याने मराठी भाषेची वाढ होण्याची आशा बाळगणें व्यर्य होय. या दिशेने खरा उपाय म्हटला म्हणजे सर्व अभ्यासक्रम मराठींत ठेवणे हा होय. ही गोष्ट -शक्य नसली तर इतर व्यवहार तरी होईल तितका आपल्या मातृभाषेत ठेवण्याचा प्रघात आम्हीं पाडला पाहिजे. त्यातूनही विशेष महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे लोकाची प्रवृत्ति बदलणें किंवा कायम करणें यासाठी कळकळीनें किंवा निष्ठापूर्वक झटणारे पुरुष आमच्यांत निर्माण होऊन त्यानी मराठी भाषा बोलणाराचा व्यवहार व व्याप वाढविला पाहिजे. हा व्याप वाढला म्हणजे त्याबरोबर भाषाही वाढला पाहिजे व वाढेल. कृत्रिम उपायानीं भाषेच्या अंगातील उष्णता काही कालपर्यंत राखता येईल; पण तिच्या आगची नैसर्गिक जीवनशक्ता जर कायम नसेल तर कृत्रिम उपापानीं काय होणार ? ही नैसर्गिक शक्ति हल्लीच्या काळात कोणत्या उपायानीं कायम ठेवतां येईल याचा ऐतिहासिकदृष्टट्या या विषयावरील मागील दोन व आजच्या लेखांत विचार केला आहे; व आम्हास अशी आशा आहे कीं, महाराष्ट्र भाषची अभिवृद्धि करू इच्छिणाच्या लोकाकडून थाचा योग्य विचार होऊन हल्लीच्या काळी शक्य तितकी महाराष्ट्र भाषेची उत्तरेतर वाढ होईल. काल प्रतिकूल खरा, पण त्यातल्यात्यांत अद्यापही ब-याच गोष्टी होण्यासारख्या अाहंत. % रामायण हा इतिहास का गप्पा ? पृथ्वीवरील चारी खंडात कोणकोणत्या प्रकारचीं मनुष्ये आहेत, म्हणजे त्यांचा बांधा, वर्ण, भाषा वगैरे बाबतीत भेद असल्यास तो केोणत्या प्रकारचा आहे; आणि इल्लीं ज्या प्रकारचीं मनुष्यें ज्या ठिकाणीं आढळण्यांत येतात त्या ठिकाणीं पूर्वी कोणत्या जातीचीं मनुष्ये होतीं याचा शोध करण्याकड आधुनिक पाश्चिमात्य विद्वानांची आज बरीच वर्षे प्रवृत्ती झाली असून त्यांच्या उद्योगार्ने सध्यां या विषयाचे एक स्वतंत्न शास्त्र बनले आहे. आजपर्यंत अशी समजूत होती कीं, आफ्रिका किंवा अमेरिका खडांतील मूळचे लोक हे अत्यंत रानटी अर्थात् सुधारणा न झालेले होते; आणि या रानटी लोकांचा उच्छेद करून सुधारलेल्या लोकानीं त्यांच्या देशात वसाहत केल्यानें मानव जातीचे एक प्रकारचे हितच आहे. मानव

  • (केसरी, ता. ३ जुलै १९०६).