पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/518

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाराष्ट्र भाषेची वाढ. ५० १ यांची भाषासरणी विलक्षण जोरदार कां यांतील खरें इंगित हेंच होय. ज्याला आपल्या देशबांधवांस स्वभाषेच्या द्वारे कळकळीनें उपदेश करण्याची आवश्यकता वाटत नाहीं त्याच्या हातून स्वभाषेची सेवा तरी काय होणार, आणि जेोरदार भाषासरणी तरी कशी निघणार ! कोणत्याही भाषेतील मोठमोठे प्रसिद्ध ग्रंथकार ध्या, त्यांचीं अंत:करणें त्याचे हृद्रत आपल्या लोकास कळविण्यास अत्यंत उत्सुक असतात असेंच आढळून येतें. आपले विचार खरे आणि देशहिताचे आहेत ही स्वत:ची खात्री अभिते, विचार प्रसृत करण्याकरिताच ईश्वरानें आपणांस जन्मास घातलें आहे असा आपला दृढसमज असल्याखेरीज कोणाच्याही हातून स्वभाषेची खरी सेवा होणे शक्य नाहीं. छापण्याची कला बाढल्यामुळे काहींना कांहीं तरी ग्रंथ दरसाल प्रसिद्ध होत असतात. विलायतेंत इग्रजी भाषेत शेंकडेौ कादंब-या अशा छापतात कीं, पतंगाप्रमाणे त्याचे आयुष्य दोनचार महिन्यापेक्षां अधिक असत नाहीं. भाषेच्या वाढीचा जेव्हा विचार करावयाचा तेव्हां असल्या ग्रंथाचा फारसा विचार करून उपयेोगी नाही. खया चीराच्या सैन्याबरोबर ज्याप्रमाणें बाजारबुणगे असतात त्याप्रमाणे असल्या ग्रंथाची स्थिति होय. हे ग्रंथ सोडून दिले तर मराठी भाषेची अभिवृद्धि इंग्रजी राज्यात फारच थेोडी झाली असें म्हणणें भाग येतें. मनेोरंजनाचे काहीं ग्रथ, जुन्या कवींच्या ग्रंथांच्या शुद्ध आवृत्त्या, ऐतिहासिक बखरी व लेख याचा सग्रह आणि लोको पयोगी इंग्रजी ग्रथांची भाषातरे अथवा शालोपयोगी पुस्तकें आणि काश एवढेच कायते नवीन वाङ्मय शिल्लक राहतें. वर्तमानपत्राच्या द्वारें भाषेची एक प्रकारची वाढ होत आहे हें खरै. कारण वर्तमानपत्रकारास अनेक तञ्हेच्या विपयावर लेख लिहावे लागत असल्यामुळे त्या त्या विषयास लागणारी शब्दसामुग्री वेळोवेळी नवीन तयार करावी लागते. परंतु ही वाढ साहित्यशास्त्रात कोणीही कायमची समजत नाहीं. भाषची खरी वाढ होण्यास ती भाषा वापरणारांचा व्यवहार अधिक वाढला पाहिजे, आणि स्वभाषेत आपले विचार लोकास कळवून लोकांची प्रवृत्ति किंवा मनें फिरविण्याची जरूरही देशांतील पुढायास अधिकाधिक वाटू लागली पाहिजे. असें जेव्हा होईल, जेव्हा विद्वान् लोक अनेक शास्रांचे स्वभाषेत अध्ययन व अध्यापन करतील, जेव्हा सामाजिक, राजकीय, औद्योगिक आणि शास्रीय वाद किंवा चर्चा हरएक प्रसंगीं व हरएक वेळी जेव्हा स्वभाषेत होऊं लागेल, जेव्हां धर्मजागृती किंवा सुधारणा करण्यास स्वभाषेचाच उपयेोग करण्यांत येईल आणि जेव्हा दरबारांत, कचेरीत, बाजारात लष्करांत किंवा विद्यालयांत सर्व व्यवहार स्वभाषेनेंच चालेल तेव्हा स्वभाषेची खरी वाढ होणार ? इंग्रजी राज्यांत या प्रसंगापैकीं पुष्कळ प्रसंग कमी झाले आहेत. तेव्हां अर्थातच त्या मानानें भापेच्या वाढीसही अडथळा येणारच. तथापि आमच्यापैकीं सुशिक्षितवगातील लोकांनीं औदासिन्य टाकून आपणांस मिळालेलें ज्ञान सामान्यजनासं स्वभाषेच्याद्वारें शिकविणें हेंच आपलै कर्तव्य समजून