पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/516

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाराष्ट्र भाषेची वाढ. ४९९ आहे; पण तो प्रांत आता नागपुरास जेोडल्यामुळे मोडी लिपी दप्तरांतून काढून टाकण्याचा ठराव झाला आहे असें समजतें. हाच जर क्रम पुढे चालला तर या प्रातातील मराठी भाषेच्या अभिवृद्धीस त्यामुळे बराच अडथळा येईल हें सागाययास नको. भाषेच्या स्थानिक व्याप्तीसबंधानें हा विचार झाला. आता राष्ट्राचे व्यवहार इंग्रजी राज्यात मर्यादित झाल्याने भाषेची किती हानि झाली हे पाहू. केोणत्याही देशातील सुशिक्षित वर्ग परकीय भाषेच्या द्वारे ज्ञानसपन्न झालेला राहणे हे देशी भाषेच्या दृष्टीनें राष्ट्राचे दुर्दैव होय, हे तत्त्व मार्गे आम्ही सांगितलेच आहे. इंग्रजी राज्यांत हाच प्रकार माजला आहे. आमचा सुशिक्षित वर्ग बाल्यापासून इंग्रजी भाषेत आपले विचार व्यक्त करण्यास किंवा ज्ञान संपादन करून घेण्यास शिकला असल्यामुळे या बुद्धिमान् वर्गाच्या हातून स्वभाषेची सवा व्हावी तितकी स्वाभाविकरीत्याच होत नाही. शास्त्राचे अध्ययन व अध्यापन जर स्वभाषेत होऊं लागलें तर विद्वानाच्या परिश्रमार्ने भाषेची जी आपेोआप वाढ होत असते त्या वाढीस हिंदुस्थानातील लोक आता अतरले आहेत; किंबहुना असेही म्हटले तरी चालेल की, अशा दृष्टीने पाहिले असता आमच्या दशातील सुशिक्षित वर्ग स्वभाषेचा अहेतुक शत्रु बनला आहे. युनिव्हर्सिटीत एम्. ए.च्या परिक्षेस एक दोन मराठी पुस्तकें ठेवल्यानें मराठी भाषेची वाढ होईल ही समजूत चुकीची आहे. कारण भाषेची वाढ होण्यास मुख्य साधन त्या भाषेत व्यवहार चालणे हे होय. हा व्यवहार जितका जास्ती तितकी भाषेची वृद्धि किवा फैलाव जास्त होतो. उद्या जर व्यापारी लोक व्यापारासाठी मराठी व्यवहार करूं लागले, अनेक जुन्या व नव्या शास्त्राचे अध्ययन व अध्यापन याच भाषेत होऊ लागले, आणि राजदरबारीही सर्व राज्यकारभार मराठी भाषेतच होऊं लागला तर मराठी भाषेचा हा हा म्हणता उत्कर्ष होईल. पण आमच्या दुर्दैवाने सध्या देशाची तशी स्थिति नाहीं. सर्व विद्या व शास्ने इंग्रजीत शिकविली जातात व अशा प्रकारें एकदा इंग्रजीत लिहिण्याची, वाचण्याची व विचार करण्याची संवय लागली म्हणजे मराठी भाषेत लिहिलेले शास्त्रीय पुस्तक वाचण्यापेक्षा तोच ग्रंथ इग्रजीत वाचणें अधिक सुलभ व सोइस्कर वाटू लागते. इग्रजीतील काही शास्रीय प्रथाची मराठीत भाषातरे अलीकडे झाली आहेत; पण वरील कारणामुळे या ग्रंथास चागलासा आश्रय मिळत नाही. शास्त्रीय विषय वाचण्यास योग्य असे पुरुप असले ग्रंथ प्रायः इग्रजीतच वाचतात; आणि ज्यास इग्रजी येत नाही त्यास अशा प्रकारचे प्रथ वाचण्याची प्राय: अभिरुचि नसते. ज्ञानेश्वरीच्या काळीं व त्यानतर मुसलमानी अमदानीत साधुसंतानी ज्याप्रमाणे मराठी भाषेची सेवा केली तसाही प्रकार या साम्राज्यांत घडून येणे शक्य नाही; कारण इंग्रजी शिक्षणार्ने सुशिक्षित वर्गाच्या मनातील धर्मश्रद्धा डळमळीत झालेली आहे. धर्मावरील ज्याची स्वत:ची श्रद्धा डळमळीत तो स्वभाषेत लोकास उपदेश तरी काय