पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/515

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

??と लो ० टिळकांचे केसरींतील लेख. पाहिजे. मराठीस मातृभाषा किंवा मायभाषा म्हटल्यानें मराठी भाषेच्या अभिवृद्धीत काहीं भर पडते असे नाही. मागे आम्ही सांगितलेंच आहे कीं, भाषा ही राष्ट्राच्या स्थितीचे निदर्शक आहे. राष्ट्र जर उदयोन्मुख असेल तर त्यांतील भाषाही वाढीस लागलेली असावयाची; आणि राष्ट्राचे व्यापार किंवा व्यवहार जर संकुचित असले तर त्याप्रमाणेच भाषेची व्याप्ती किंवा वाढ ही मर्यादित रहावयाची, हा सिद्धात अबाधित आहे. करिता याच दृष्टीनें हल्लींच्या कालातील मराठी भाषेच्या अभिवृद्धीचा विचार करूं. इंग्रजाचे राज्य हिदुस्थानात झाल्यावर अर्थातच मराठी भाषेस राजकीयदृष्टया पूर्वी जे महत्त्व होत ते कमी झालें. अव्वल इंग्रजीत पहिल्यापहिल्यानें देशी भाषातून दप्तर ठेवीत असत, व जिल्हाकोटौतील कामही देशी भाषातून चाले. परंतु इग्रजी शिक्षण वाढून इग्रजी भाषा शिकलेले नोकर जसजसे जास्त मिळू लागले तसतसा देशी भाषाचा राजकीय बाबतीत कमी कमी उपयोग होऊ लागला; आणि राज्यव्यवस्थेचे महत्त्वाचे सर्व काम इंग्रजीत चालू लागले. मराठी ही गुजराथीप्रमाणे व्यापाराची भाषा कधीच झालेली नव्हती. त्यामुळे गुजराथी भाषेची व्याप्ती कायम राहाण्यास हल्लीं जी सवड राहिंली आहे तीही मराठी भाषेस प्राप्त झाली नाहीं. गुजराथी भाषेत तीन दैनिक वर्तमानपत्रे आज बरेच दिवस चालत आहेत याचेही मुख्य कारण हेंच होय. शिवाय पारशी लोकानी गुजराथी भाषेचा जसा स्वीकार केला तशा प्रकारे मराठी भापस महाराष्ट्राखेरीज दुस-या कोणत्याही मोठ्या ज्ञातीचा पाठिबा मिळाला नव्हता. यामुळे मराठी राज्य गेल्याबरोबर महाराष्ट्रातील राज्यकारभारात मराठी भाषेचे प्राबल्य नाहीसे झालें इतकंच नव्हे, तर महाराष्ट्राच्या बाहेरही तिचा पूर्वी झालेला प्रसार उत्तरोत्तर नाहीसा होत चालला. तजावर प्रातात पूर्वी जे लेोक महाराष्ट्रातून गेले आहेत ते अद्याप आपल्या घरीं ज्ञानेश्वरीच्या पद्धतीचे मराठी बोलतात. परंतु सस्थानच्या किंवा जिल्ह्यातल्या दरबारात त्या देशाची भाषा वापरण्यात येत असल्यामुळे तिकडच्या मराठीचा प्रघात अजिबात बंद पडला. म्हैसुराकडे हीच व्यवस्था झाली; आणि बेळगाव--धारवाड जिल्ह्यातील लोकानीं कर्नाटक विद्यावर्धक संघ काढून राज्यकत्यांच्या जोरावर मराठी भाषेस शह देण्याचे काम सुरूं केलें. ग्वाल्हेर व इंदूर संस्थानात वास्तविक दूट्ले म्हणजे मराठी भाषा कायम ठेवावयास पाहिजे होती. पण इंग्रजी राज्यकत्याचे संस्थानातून अनुकरण झाल्यामुळे मराठी भाषेस तेथूनही आपला पाय माघारा घ्यावा लागला; आणि गायकवाडीत तिला आपल्याबरोबर गुजराथीस अधं स्थान द्यावे लागले. निजामशाहींत मराठवाडीत लोकाची भाषा जरी मराठी आहे तरी दरबारी भाषा फारशी पडल्याने मराठीस कोणत्याही प्रकारें उत्तेजन मिळत नाही. साराश, स्वराज्यात मराठी भाषेची व्याप्ती महाराष्ट्राबाहेर जी वाढली गेली होती ती इंग्रजी राज्य झाल्याबरोबर पुन्हा संकुचित होऊन मूळ पदावर आली. वन्हाडांत मराठी भाषा प्रचारांत