पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/514

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाराष्ट्र भाषेची वाढ. ४९७ बेळगांव किंवा धारवाड जिल्ह्यांत आजमितीस मराठी भाषा लोकांस समजते याचे खरें कारण असें आहे कीं, मराठी अमदानींत या जिल्ह्यांतील लोक किंवा त्यांचे पुढारी मराठी भाषा बोलणे हे संभावितपणाचे किंवा प्रतिष्ठितपणाचे लक्षण समजत. कोणाही सुशिक्षित मनुष्यास, मराठी कळत नाहीं, असें त्या वेळीं म्हणण्याची लाज वाटे. याचा असा परिणाम झाला कीं, या लोकांच्या घरांतून स्रिया देखील मराठी बोलणें हें कुलीनत्वाचे लक्षण आहे असे समजू लागल्या. हल्लीं इंग्रजी राज्यांत इंग्रजी भाषसंबंधानें आमच्या देशांत जेो प्रकार होत आहे तो लक्षांत आणला म्हणजे आम्हीं वर केलेलें वर्णन कोणासही असंभवनीय वाटणार नाही. महाराष्ट्र देशाच्या इतिहासांतील हा काळ अशा रीतीनें राष्ट्राभ्युदयाचाच नव्हे तर भाषाभ्युदयाचाही झाला होता आणि यांत गद्य ग्रंथ नवीन निर्माण झाले इतर्केच नव्हे तर पद्य ग्रन्थांसही नवें वळण लागलें, हें मोरोपंतादिकांच्या काव्यावरून दिसून येईल. हाच काल पुढे अबाधित राहिला असता तर काय झाले असतें हें सांगण्याची गरज नाहीं. आमच्या दुर्दैवानें म्हणा कीं, सुदैवानें म्हणा, शै-दीडशें वर्षे आम्हीं या कालाचा अनुभव घेतों न घेतों तोंच ही परिस्थिति जाऊन दुसरी परिस्थिति प्राप्त झाली. या दुस-या परिस्थितीत आमच्या भाषेची वाढ कशी कायम ठेवतां येईल याचा विचार आपणास मुख्यत्वेकरून करावयाचा आहे. पण पूर्वपरंपरा लक्षात आल्याखेरीज तसा विचार पूर्णपणें करणें अशक्य असल्यामुळे एवढी प्रस्तावना करणे जरूर पडले. वरील मुख्य मुद्दयांचा विचार पुढील खेपेस करू.

  • महाराष्ट्र-भाषेची वाढ नबर ३.

या विषयावरील गेल्या दोन लेखांत पेशवाई बुडेपर्यंत मराठी भाषेच्या वाङ्मयाची व स्थानिक व्याप्तीची वाढ कशी झाली याचे योडक्यांत विवेचन केले आहे. त्यावरून स्वराज्यांत स्वभाषेस कशा प्रकारै उत्तेजन मिळतें हें वाचकांच्या लक्षात आलेंच असेल. मराठी भाषेतील पहिलें वाङ्मय धर्मविषयक असण्याचे कारण काय, ऐतिहासिक पवाडे किंवा बखरी पहिल्या कालात का निर्माण झाल्या नाहीत, आणि इंदुरापासून तंजावरापयत मराठी भाषेचा प्रसार कसा झाला या गोष्टींची उपपति दुस-या कोणत्याही प्रकारें लागत नाहीं. मराठी भाषेच्या वाढीच्या ऐतिहासिक विवेचनाची ही पद्धत लक्षांत ठेऊनच इंग्रजी अमदानींत तिची वाढ कशी, किती व कोणत्या प्रकारची होईल याचा विचार केला

  • { केसरी, ता. १९ माहे जून १९०६ )