पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/512

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाराष्ट्र भाषेची वाढ. ४९५ अधिक कारणीभूत झाला असे म्हणावें लागतें. भाषेची मर्यादा किंवा व्याप्ती वाढविण्यास अशा रीतीनें धर्म कारण होत असतो, याचे दुसरै एक कारण आहे. ज्ञानेश्वराचे वेळीं किंवा त्यापूर्वी काहीं वर्षे महानुभवपंथ निघाला आणि तो महाराष्ट्रात निघाल्यामुळे त्या पंथाचे मूळ ग्रंथ महाराष्ट्र भाषेत लिहिले गेल. परंतु या पंथाचा विस्तार महाराष्ट्राबाहेर म्हणज राजपुताना, पंजाब इकडे अधिक झाल्यामुळे व त्याचे मठ सध्या पेशावर व काबूल येथेही असल्यामुळे, त्याच्याद्वारें मराठी भाषा काबुलापर्यंत-निदान त्याच्या मठात तरी-प्रचलित असलेली अढळून येते, भागवतधर्माचे ग्रंथ मराठीत झाले किंवा त्या काळच्या संतमंडळींनी केले, या गोष्टीचा अशा दृष्टीने विचार केला म्हणजे ती भाषावृद्धीस आणि तद्वारा राष्ट्रवृद्धीस किती कारणीभूत झाली, हे चागले दिसून येते. अग्निहोत्रादि श्रौतकमीत निमग्न झालेल्या विद्वान् मडळीचा या संतमंडळीवर राग होता, आणि त्यांना असे वाटत असे की, सस्कृताचे अध्ययन करून पंडिन झालेल्या मनुष्याने वेदवाणीचे अर्थ मराठीत कुळेब्यामाळ्यास सागणें म्हणजे भ्रष्टाकार होय. एकनाथ व तुकाराम याचा शास्रीमंडळीने छळ केला होता इतकेच नव्हे तर पुढेही संस्कृत वाणी सेोडून मराठीत काव्य करण्यापूर्वी महाराष्ट्र कवीस अपवादापासून पहिल्याने आपल्या कृतीचे मडन करावें लागते. संस्कृत ही भाषा आम्हास परकी नाहीं, किंबहुना ती मराठी भाषेची आई नसली तरी निदान आजी खास आहे. तथापि संवय आणि अभ्यास यानें जडलेला दुराग्रह इतका बलवत्तर असतो की, वीस वीस पचवीस पचवीस वर्षे संस्कृतांत घटपटादि खटपट करणारास कुळेब्याच्या मराठी भाषेत आपले मनेोविकार व्यक्त करणे हलकेपणाचे वाटे. कॅोणत्याही राष्ट्रातील विद्वत्समूह अशा रीतीनें देशभाषेखेरीज इतर भाषेत बाळपणापासून दीर्घकाळ वाढलला व तद्वारा ज्ञान संपादन केलेला अबाधित कायम राहाणे हे देशभाषेच्या दृष्टीनें त्या राष्ट्राचे ढुंदव होय असें आम्ही समजते. त्यातून ही भापा जर देशभाषेहून नुसती भिन्नच नव्हे तर परकी असेल तर बोलावयासच नको. हल्लीं महाराष्ट्रास हीच स्थिती आलेली आहे; पण त्याचा विचार पुढ करूं. सध्या एवढेच सागणें आहे की, शिवाजीमहाराजाचेपूर्वी मुसलमानी अमदानींत संस्कृतात वाढलेल्या विद्वत्समूहाचे विशेष साहाय्य नसता किंवा राज्यकत्यांचा बराच विरोध असताही आमच्या संतमंडळीनें राष्ट्रात एकाचे दोन केंद्र उत्पन्न करून धार्मिक दिशेनें भाषेच्याद्वारें महाराष्ट्रीयत्वाची कल्पना कापम ठेवली इतकंच नव्हे तर महाराष्ट्राच्या म्हणजे मराठी भाषा बोलणाच्याच्या देशाच्या मर्यादा शक्य तितक्या वाढवून कायम ठेवल्या. ही कामगिरी जर त्यानीं बजावली नसती तर ३ ४ शें वर्षांत मुसलमानो अमदानींत भाषेची सरभळ होऊन रामदास किंवा श्रीशिवाजीमहाराज यांस महाराष्ट्रधर्म किंवा महाराष्ट्रदेश कोणता, हें सागण्याची पंचाईत ६२