पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/511

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४९४ लो० टिळकांचे केसरींतील लेख. परिस्थिती अशी होती कीं, देशाभिमानाची ज्योत अंतःकरणांत असली तरी, तिची ज्वाला ओठापर्यंत न येण्याची खबरदारी घ्यावी लागत असे. एकनाथाचा काळ व रामदासाचा काळ यात पुष्कळ अंतर आहे; आणि निवृत्ती मार्गाबरोबरच रामदासाप्रमाणें प्रवृत्ती मार्गाचेही तत्पूर्वीच्या संतांनीं प्रचलन केलें नाहीं याबद्दल त्यास दोष देणारानी ही गोष्ट विशेषत: लक्षात ठेवली पाहिजे. इंग्रज सरकारनें आमचे विचार स्पष्टपणे बोलण्याची आम्हास परवानगी दिली आहे, तरीसुद्धा नेमस्त बोला व नेमस्त लिहा म्हणून उपदेश होतो, तर मुसलमानी अमदानींत संतकविमंडळ राजकीय ढवळाढवळीत पडले नाहीं, याबद्दल त्यांस दोष देणें गैराशस्त नव्हे काय ? रामदासास ज्या गोष्टी कळल्या त्या एकनाथास कळत नव्हत्या किंवा कळल्या नसल्या असें नाहीं; त्याच्या लेखात किवा कवित्वांत जेो फरक आहे तो परिस्थितीमुळे झालेला आहे, देशाभिमानाच्या कमतरतेमुळे नव्हे, असें आम्ही समजती. साराश, श्रीशिवाजीमहाराजाचा जन्म होण्यापूर्वीचे महाराष्ट्र वाङ्मय पाहिले तर तें सर्व धार्मिकच आहे आणि परिस्थितीच्या मानाने तें असेंच असावयाचे, असे आढळून येईल. पण याने राष्ट्रीय कार्य काहींच झालें नाहीं असे मात्र कोणी समजूं नये. मुसलमानी कारकीर्द होण्यापूर्वी यादवाच्या राज्यात नुकताच मराठीला कोठे राजाश्रय मिळालेला होता; आणि मराठी भाषेची स्थानिक व्याप्ती किंवा मर्यादा कायमची ठरलेली नव्हती. हा राजाश्रय तुटल्यानंतर मुसलमानी अमदानींत धर्माची जी एक बाजू मोकळी होती त्या दिशेनेच त्या वेळच्या थेर पुरुषानीं धर्म आणि भाषा राखून महाराष्ट्राचे महाराष्ट्रपण कायम ठेविले. विठोबाची पंढरी ही धर्म आणि भाषा या दोन्ही दृष्टीने त्या वेळीं महाराष्ट्राची राजधानी झाली होती. आणि या राजधानीच्या आसपास म्हणजे हल्लीं माँगलाईत असलेल्या औरगाबाद, गुलबर्गा आणि दक्षिणेस विजापूर वगैरे प्रातातून आजमितीस मराठी भाषेची जी व्याप्ति आढळून येते, तिचे श्रय मराठी संत-कविमंडळीसच दिले पाहिजे. हें कविमंडळ जर त्या वेळीं उत्पन्न झाले नसते तर दक्षिणेकडून कानडी भाषेने पुन्हा आपला पगडा कदाचित् महाराष्ट्र भाषेवर बसविला असता. आळेदी आणि पंढरी या दोन धर्मक्षेत्राचा दीर्घवर्तुलातील दोन केद्राप्रमाणे महाराष्ट्रभाषेच्या व्याप्तीवर परिणाम झालेला आहे. अर्थात् महाराष्ट्राच्या मर्यादा आज ज्या आपणास कायम झाल्याशा वाटतात, त्या संत-कवि -मंडळींनीं मुसलमानी अमदानीत धर्माच्या दिशेनें महाराष्ट्र भापावृद्धीचा उद्योग करून स्थापित केलेल्या आहेत. महाराष्ट्रातील लोकाच्या अंगांतील रक्त आर्य आणि द्रवीड लोकाच्या मिश्रणानें बनले आहे, असा हल्लींच्या शोधकाचा सिध्दान्त आहे. पण हाच सिध्दान्त बंगलोर म्हैसुरापर्यंत राहाणाच्या मंडळींसही लागू पडतो. तथापि, महाराष्ट्र देशाची मर्यादा तेथपर्यंत गेलेली नाही. हें लक्षात आले म्हणजे महाराष्ट्राची मर्यादा कायम करण्याचे कामीं पिंडान्वयापेक्षां भाषान्वयच