पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/510

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाराष्ट्र भाषेची वाढ. ४९३ अशक्य आहे. अर्थात् ज्यांच्या अंगांत कांहीं कर्तृत्वशाक्त होती त्यांस आपलें कर्तृत्व दाखविण्यास धार्मिक चळवळ एवढीच काय ती मोकळी बाजू होती; किंवा धार्मिक पुढायांखेरीज इतर पुढारीवर्गास हा काल अनुकूल नव्हता. कसेही म्हणा, आम्हा सर्वांना समाधान व अभिमान बाळगण्यासारखी मुख्य गोष्ट ही आहे कीं, अशा कालांत व परिस्थितीत महाराष्ट्रातील पुढा-यानीं त्यास जी दिशा मोकळी होती तिचा अंगिकार करून भाषा व धर्म अशी जीं एकराष्ट्रीयत्वाचीं प्रधानअर्गे, त्याचे आपत्काली महाराष्ट्रात चागले संगोपन केलें इतकेच नव्हे तर यावच्छक्य अभिवृद्धीही केली. याचा परिणाम काय झाला व पुढ स्थिति काय झाली याचा विचार स्थलसंकोचास्तव आज न करिता पुढील लेखांत करूं.

  • महाराष्ट्र भाषेची वाढ.

नंबर् २. कोणत्याही राष्ट्राचे वाङ्मय त्या राष्ट्रातील लेोकाच्या परिस्थितीवर अवलंबून असृते, आणि ही परिस्थिती ज्याप्रमाणे पालटेल, म्हणजे संकुचित किंवा विस्तृत, मर्यादित अगर व्यापक होईल त्या मानाने वाङ्मयाचाही -हास किवा वाढ होत असत हा सिद्धात महाराष्ट्रात स्वराज्य होण्यापूर्वी मराठी भाषेच्या वाढीस कसा लागू पडतो, याचे गेल्या खेपेस विवेचन कलें आहे. नाडीवरून ज्याप्रमाणे शरीरातील रोगाची किंवा स्वास्थ्याची परीक्षा होते, तद्वतच भाषेवरून राष्ट्राची बरीवाईट स्थिति तज्ज्ञ लोक तेव्हाच ताडतात. श्रीशिवाजीमहाराज जन्मण्यापूर्वी पोवाडे का झाले नाहीत, याचे कारण आता सागण्याची जरूर नाहीं. यादवकुलातील शेवटचा दौलताबाद येथील हिंदु राजा नाहीसा झाल्यानंतर आणि शिवाजीमहाराज जन्मेपर्यंत मुसलमानी राज्यकत्यांनी काही पराक्रम केले नाहीत. पण त्या पराक्रमानीं महाराष्ट्रातील गोंधळ्यास किंवा लोकास कसे स्फुरण येणार ? पण परमेश्वराच्या कृपेने हे रहाटगाडगे जेव्हा फिरलें, तेव्हा गावोगावीं उघड्या मैदानात हजारो लोकापुढे डफावर थाप मारून महाराष्ट्रातील शाहीर * अला मोंगल चढाई करून ' किंवा अखेरीस अखेरीस * खूप शतनेिं राज्य राखिलें यशवंत फडणीस नाना ’ असें आपल्या जेोरदार भाषेनें गाऊं लागले. ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंत झालेल्या कविमंडळात म्लेच्छ राज्याबद्दल खेद आणि स्वराज्याबद्दल अभिमान जागृत नव्हृता असे नाहीं. एकनाथाच्या कवितेपैकी दोन तीन कविता त्याच्या देशभक्तीच्या दर्शक म्हणून रा. पागारकर यानीं पूर्वी केसरींत प्रसिद्ध केलेल्या वाचकास आठवत असतीलच. परंतु त्या वेळची

  • (केसरी, ता. ५ माहे जून १९०६).