Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/506

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र भाषेची वाढ.

४८९

असें मनूनें प्रतिपादन केलें आहे. असत्यवादीपणा कां व किती गर्छ अथवा शिक्षा आहे याचे यापेक्षा अधिक सयुक्तिक कारण देणें शक्य नाही. परंतु वरील श्लोकात भाषेच्या उपयुक्ततेसंबंधाने जे विधान केले आहे तें आमच्यामतें अधिक महत्त्वाचें आहे. पशूपासून मनुष्यजाती ओळखण्याची जी थोडीबहुत चिन्हें आहेत, त्यापैकीच भाषा हे एक प्रमुख लक्षण होय, असें बन्याच भाषाकोविदाचे मत आहे; आणि मनुष्याचे आपापसातील व्यवहार जितके अधिकाधिक विस्तृत किवा व्यापक होतात, त्या मानानें भाषेलाही साहजिक अधिकाधिक विस्तृत स्वरूप प्राप्त होते. भाषा ही एक ईश्वरदत्त किंवा डार्विनच्या मताप्रमाणे म्हटले तर उतातिरीत्या सिद्ध झालेली वरिष्ठ पायरीची देणगी होय, आणि एखादा विशिष्ट मानवसमाज ज्या मानाने सुधारलेला असेल त्या मानाने त्या समाजाची भाषाही सुधारलेली किंवा वाढलेली असते. थोडक्यात सागावयाचे असल्यास एखाद्या विशिष्ट राष्ट्राच्या किंवा समाजाच्या परस्परव्यवहाराचे स्वरूप किंवा महत्व दाख- विणारे त्या समाजाची भाषा हैं एक यत्रच होय. मनूने सागितल्याप्रमाणे सर्व व्यवहार भाषामूलक किंवा भांषेच्या योगाने चालत असल्यामुळे एखाद्या भाषेच्या स्वरूपावरून भाषापंडित ती भाषा बोलणाऱ्या समाजाच्या विशेषेकरून असे समाज किंवा राष्ट्रे जेव्हा नष्ट झाली असतात तेव्हा त्याच्या सुधारणेची अटकळ बाधित- अततात. उघड आहे कीं, ज्या भाषेत भाववाचक नामे अधिक किवा आत्मा आणि ईश्वर याच्या कल्पना दाखविणारे शब्द अधिक ती भाषा वापरणाऱ्या लोकाचे तात्विक विचारही त्या मानाने सुधारलेले असले पाहिजेत इतर बाब तीतही हाच न्याय लागू आहे. एखादे राष्ट्र किंवा लोक नष्ट होऊन जरी हजारो वर्षे झाली असली तरी आम्हास जर ते लोक वापरीत असलेल्या भाषेतील शब्द समजतील तर या नष्ट झालेल्या राष्ट्राची प्रगती अथवा सुधारणा कोणत्या स्थितीची होती याचे आम्हास ताबडतोब अनुमान करता येईल. साराश, समाजाचा व्यव- हार, समाजाचे विचार, समाजाचा व्याप आणि समाजाची भाषा याच्यामधील संबंध इतका निकट आणि नित्य आहे की, एकाचे प्रतिबिंब दुसन्यात उमटल्या खेरीज कधीही रहात नाहीं. एकाची वृद्धि तर दुसऱ्याची वृद्धि आणि एकाचा क्षय तर दुसऱ्याचा क्षय हा सिद्धात अबाधित आहे.
 कोणत्याही भाषेची अभिवृद्धि किंवा दास याचा विचार करताना वरील अबाधित सिद्धात लक्षात ठेवला पाहिजे. भाषेची अभिवृद्धि करणे जर इष्ट असेल तर एखाद्या पंडिताने धात्वर्थापासून अनेक काल्पनिक शब्द निर्माण करून त्याचा कोश बनविल्याने कार्यसिद्धि व्हावयाची नाही एखाद्या कृपणाने कोट्यावधि रुपये संग्रह करून पुरून ठेवल्याने देशाच्या संपत्तीची जशी अभिवृद्धि होत नाहीं, त्याप्रमाणेच भाषेतील शब्दाचा प्रकार होय, अर्थशास्त्रातील विनिमयाचा व्यवहार सुरळीत चालण्यास किंवा वाढविण्यास ज्याप्रमाणे व जितकी नाण्याची जरूर लागते त्याप्रमाणें व तितकीच मनुष्यजातीच्या मनोवृत्ति व विचार परस्परास