Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/505

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८८
लो० टिळकांचे केसरीतील लेख.

आहे. राज्य कमावणें किंवा गमावणे हे शारीरिक बलाचें काम आहे; व इंग्रजां- पूर्वी ज्या लोकानी म्हणजे मुसलमानानीं हिंदुस्थानावर स्वारी करून आपले राज्य येथे स्थापिलें त्याजवरही वेदाताने आपली छाप बसविली होती, आणि अशी छाप बस- विली तेव्हाच अकबरासारखे बादशहा निपजले, ही गोष्ट इतिहासप्रसिद्ध आहे. इग्रजाच्या राज्यातहि असा प्रकार घडून येणे अशक्य नाही. आधिभौतिक शास्त्राच्या प्रगतीनें वेदां- ताची प्रमेये अधिकाधिक बळकट होत चालली आहेत; आणि पाश्चिमात्य राष्ट्रे धर्माची काही शास्त्रसिद्ध तत्त्व आपणास सावडावी अशा उद्योगास लागले आहेत. अशा वेळी आमच्या वेदान्ती धर्माची तत्त्वे "वेदान्त मिशन" काढून ख्रिस्ती मिशनऱ्या प्रमाणे जर सर्व जगात आम्ही शिकविली तर प्राच्य व पाश्चिमात्य विचाराची सागड घालून देऊन सर्व जगाच्या विचाराचे पाऊल आम्ही पुढे टाकल्याचे श्रेय आपणास मिळेल; इतकेच नव्हे तर, त्याचबरोबर आमच्या देशाबद्दल व लोका- बद्दल पाश्चिमात्य लोकात सहानुभूती उत्पन्न होऊन त्यामुळे देशकार्यही सहजरीत्या घडून येईल, असा स्वामींना उपदेश आहे, व त्याचे सर्वास असें सागणे आहे कीं, ही अमूल्य सधि दवडूं नका, आणि राजकीयदृष्ट्या आपले वैभव जरी गत असले तरी जगाच्या बुडाशी जी काही थोर व उदात्त तत्त्वें आहेत त्यांत xx Xx करण्याच्या अपूर्व अध्यात्मिक शक्तीबद्दल आमची जी पूर्वापार ख्याती चालत आली आहे ती बुडवू नका; योगानें व वेदान्तानें बुद्धीला जी काहीं परि- पक्कता यावयाची त्याचे खरे चीज यातच आहे, आणि सध्याच्या परिस्थितींत गृहस्थाचेच नव्हे तर वेदान्त्याचेही हेच कर्तव्य होय.


* महाराष्ट्र भाषेची वाढ.
वाव्यर्था नियताः सर्वे वाङ्मूल्य वाविनिःसृताः ।
तास्तु यस्स्तेनयेद्वाचं सर्वस्तेयकरो हि सः ॥

-- मनु

.

 वरील श्लोकात खोटे बोलणारा किंवा खोटी साक्ष देणारा मनुष्य चोरा- पेक्षाही अधिक गुन्हेगार कसा ठरतो याची मनूने जी उपपत्ति दिली आहे त्या- पेक्षा अधिक बलवत्तर उपपत्ति दुसऱ्या वाङ्मयातून क्वचितच सांपडेल. मनुष्य- जातीचे व्यवहार चालण्यास वाणीखेरीज दुसरे साधन नाहीं, परस्परांची मनें अगर विचार परस्परास कळविण्यास भाषा हा एकच मार्ग आहे, आणि भाषे- पासूनच किवा भाषेच्यायोगे सर्व प्रकारचा व्यवहार उत्पन्न अगर सिद्ध होत असतो तेव्हा अशा पकारच्या सर्व व्यवहारसाधनाचा जो मनुष्य दुरुपयोग करितो किंवा त्याशी प्रतारणा करितो तो एकपक्षी नव्हे तर सर्वस्वी चोर ठरतो,


 * ( केसरी, ता. २९ माहे मे १९०६ इसवी. )