पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/504

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेदांताची आणि उद्योगाची दिशा. ?くWS आमच्या देशांत जितक्या पूर्ण अवस्थेस आलेली आहेत तितकी त्यांची वाढ दुस-या कोठेही झालेली नाहीं. अर्थात् युरोपियन राष्ट्र आमच्याकडील वेदांताचीं तत्त्वें घेऊन आमच्यापुढे पळतील असें व्हावयाचे नाहीं. आमचीं तत्त्वें बरोबर आहेत असें राजरोस मान्य करण्यास त्यांच्या आधिभैौतिक शास्त्रज्ञांस बरेच दिवस लागतील हें खरै; तथापि ही गोष्ट होणार एवढे निश्चित आहे. सारांश, या बाबतींत पाश्चिमात्याचे गुरुत्व आमच्या वेदांत्याकड येणे शक्य आहे, इतकेंच नव्हे तर आधुनिक आधिभौतिकशास्त्राच्या प्रमेयांची दिशा पाहिली तर वेदाताचीं तत्त्वें तिकडील राष्ट्रांस मान्य होतील अशी आशा बाळगण्यास बळकट कारण आहे. म्हणजे ही गोष्ट शक्य असून साध्यही आहे; व या कामीं जर आपण मनापासून उद्योग केला तर सत्याच्या पायावर एकत्र झालेले पाश्चिमात्य राष्ट्रातून अनेक साह्यकर्ते धर्माखेरीज इतर बाबतीतही आम्हास मिळतील, असें स्वामींचे मत आहे. थिऑसफीविरुद्ध अगम्यगुरूंचा जेो मोठा कटाक्ष आहे तो याचकरितां होय. पाश्चिमान्याचे गुरु होण्याचा ज्या बाबतीत आम्हास अधिकार आहे त्या धर्मीच्या बाबतीतही त्याचे शिष्यत्व आम्हीं पतकरणे हें आम्हास लाजिरवाणे होय,असें ते नेहमीं म्हणत पाश्चिमात्य लोकांस हाताशीं धरू नये असे स्वामींचे म्हणणें नाहीं.पण भलत्याच ठिकाणीं त्यांस गुरुत्व दऊन आम्ही आपल्या विद्येचा व देशाचा उपमर्द करूं नये असे त्यांचे सागणे आहे. वेदात किंवा वेदाताचीं तत्त्वें देशभक्तीस किवा राष्ट्र भक्तीस कधीही आड येत नाहीत, उलट वेदाताच्या परोपकारबुद्धींत देशभक्तीचा अवश्य समावेश होतो, असे नुकतेंच केसरींत प्रतिपादन केले आहे. अगम्यगुरूचे मतही असेंच आहे. योग किंवा वेदात हा केवळ आपल्या आत्म्याच्या उन्नतोंकरिता नव्हे तर सर्व लोकाच्या किंवा देशाच्या आत्म्यांस उन्नति प्राप्त करून देण्याकरिता आहे असा ते उघडपणें उपदेश करीत असतात. ते स्वत: योगी आहेत व साधारण योग्यास अशक्य असे काहीं चमत्कार पाश्चिमात्य लोकास दाखवून त्याची त्यानीं योग व वेदात यांच्या तत्त्वाच्या सत्यतेबद्दल खात्री करून दिली आहे. पण हिंदुस्थानात ते जे फिरत आहेत ते असले चमत्कार दाखविण्याकरितां नव्हे. वेदातांच्या तत्वांचा विपर्यास करून स्वदेशहिताचा उद्येग सोडून देण्याची जी प्रवृत्ती होत चालली आहे तिचा विरोध करावा, स्वार्थदृष्टया आणि परमार्थदृष्टया वेदातांचा किती उपयेोग आहे हैं लेोकाच्या लक्षात भरवावें अाणि विदेशी लोकाची सहानुभूति मिळविण्याच्या कामही या प्रबल शस्राचा कसा उपयोग करतां येईल हें लोकाच्या पूर्णपणें निदर्शनास आणून द्यावें एवढ्याकरिता ते झटत आहेत. योग आणि वेदांत या दोन अमूल्य देणग्या आगच्या पूर्वजांपासून आम्हांस प्राप्त झालेल्या आहेत, त्या लोकाच्या हातात देऊन लोकाच्या तौडाकडे बघू नका, देणग्या तुमच्या आहेत, तुम्ही त्या लोकास वाटा आणि सर्व जगास उदात्त विचाराचे वळण दिल्याचे श्रेय मिळवा, असें स्वामीचे सर्वास सांगणें ६१