पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/503

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

9くa लो० टिळकांचे केसरींतील लेख. जी वाढ खुटली ती हें शास्र पांचपन्नास वर्षापूर्वी पाश्चात्य देशांत प्रसृत होईपर्यंत खुटलेलीच होती. शाब्दिक कोट्या किवा आर्थिक पेच मध्यंतरीं बरेच उदयास आले, व या शास्त्राची छाननी त्यामुळे आमच्या देशात बरीच झाली. तथापि एखाद्या शास्त्राची छाननी आणि वाढ यामध्ये पुष्कळ अंतर आहे. वाढ होण्यास जिवंतपणाची जितकी अपेक्षा आहे तितकीं छाननीस लागत नाही; आणि वाढ खुटली म्हणजे जिवंतपणा कमी होती किंवा जिवंतपणा कमी झाला म्हणजे वाढ खुटते. खिस्ती सनानंतर काहीं शतकानीं हिंदुस्थानांतील शास्रविद्येचा जिवतपणा कमी होऊँ लागला; आणि आमचे पंडित पूर्वाचार्यानीं केलेले सिद्धातच खलीत बसण्याच्या उद्योगास लागले; मग त्याचे कारण काहीही असो; प्रस्तुत त्याचा विचार आपणास कर्तव्य नाही. हिंदुस्थानातील शास्राची ही स्थिति सदर शास्ने युरोपिअन पंडिताच्या हातात पडल्यावर पालटली. पाणिनीच्या शास्त्रानें चकित झालेल्या युरोपिअन पंडितांना आमच्या व्याकरणशास्राचे सिद्धान्त पृथ्वीवरील सर्व भाषास लागू करून त्यांतून फायलॉलजी अथवा शब्दव्युत्पतिशास्र म्हणून एक नवेच पोटशास्र निर्माण केलें आणि त्याच्यायोगें मानव जातीच्या अति प्राचीन काळच्या सुधारणेचे ज्ञान होण्याचा नवा मार्ग दाखविला. व्याकरणशास्त्राची ही गोष्ट झाली. दुसरें उदाहरण पाहिजे असल्यास वेदाचे घ्या. यास्काच्या वेळपासून वेदाथांची मीमासा करण्याचे काम आमच्या देशांत बहुतक बंद पडल्यासारखें झालेले होतें. सायणाचार्यांच्या काळापर्यंत ही परंपरा थेोडीबहुत सुरू होती. परंतु सायणाचार्यानीं जे अवाढव्य प्रयत्न केले त्यानंतर तशा प्रकारचा उद्योग आमच्याकडे कोणी केला नाहीं. वेद ग्रंथ व सायणाचे भाष्य यांची युरोपांतील पंडितोस ओळख झाल्यावर यास्काच्या वेळेपासून बंद पडलेल्या परंपरेस पुन्हा सुरवात झाली, व ती जर्मनी आदिकरून पाश्चात्य राष्ट्रांत अद्याप चालू आहे. आमच्या शास्त्राचीच नव्हे तर आमच्या उद्योगधंद्याची व कलांचीही हीच स्थिति झालेली आहे. उदाहरणार्थ, वस्ने विणण्याची किंवा रंगविण्याची कला ध्या. यांत आम्हीं पुष्कळ प्रावीण्य व कोशल्य संपादन केलेले होतें, परंतु पुढे त्याची वाढ खुटलेली होती. युरोपियन लोकांस आमच्याकडून या क ऍ जे ज्ञान मिळालें ते याच स्थितीतलें होय. परंतु या वेळीं युरोपिअन राष्ट्र जिवत असल्यामुळे त्यानी आमच्याकडून संपादन केलेल्या सदर कलांच्या ज्ञानांत भर घालून त्या-ा प्रवाह पुढे चालू ठेवला. आणि त्या कलाच्या साहाय्यार्ने आपला देश श्र `न करून आम्हांस उलट भिकेस लावले ! सुदैवानें वेदांत शास्राची स्थितैि " प्रकारची होण्याचे दिवस अद्याप आलेले नाहीत. याचे कारण मुख्यत्वेकेरू से की, इतर शास्रांपेक्षां वेदातांवर आमच्याकडील पडितांनीं व तत्त्ववेत्त्यांनीं S1 परिश्रम घेतलेले आहेत. ** तावद्गर्जति शास्राणि 2 xx यावन्न x x दृश्ले बेत् नेसरी ” ही म्हण पुष्कळास माहीत असे लच. याचा परिणाम असा ਬਾਗ ^s की, वेदांतांतील प्रमेये व तत्त्वें हीं